मधुमेह जिंकण्यासाठी आध्यात्मिक सवयी
मधुमेह हा फक्त रक्तातील साखरेचा आजार नाही, तर तो आपल्या मन, भावना आणि जीवनशैलीशी थेट जोडलेला आहे. केवळ औषधांनी नव्हे, तर मन शांत करून, विचार बदलून आणि आतून बरे होण्याची प्रक्रिया सुरू केली, तरच मधुमेह खऱ्या अर्थाने जिंकता येतो. मधुमेहावर उपचार म्हणजे फक्त गोळ्या घेणे नाही, तर मन, शरीर आणि आत्मा यांचा समतोल साधणे आहे. जेव्हा मन शांत होते, तेव्हा शरीरही बरे होण्याच्या दिशेने चालू लागते. त्या दृष्टीकोनातून काही महत्वाचे मुद्दे आपल्यासमोर मांडण्याचा हा सर्व प्रपंच.
मन शांत ठेवणे ही उपचारांची पहिली पायरी आहे
डॉ. भाग्येश कुलकर्णी सांगतात की सतत तणाव, भीती, चिंता, राग किंवा अपराधभावना मनात असल्यास शरीर कायम stress mode मध्ये राहते. अशा अवस्थेत इन्सुलिन योग्यरीत्या काम करत नाही आणि साखर नियंत्रणात येत नाही. म्हणूनच मधुमेह नियंत्रणासाठी सर्वात आधी मन शांत करणे आवश्यक आहे.
ध्यान व श्वसनामुळे साखरेवर थेट परिणाम होतो
नियमित ध्यान व खोल श्वसन केल्याने नर्व्ह सिस्टीम शांत होते, हॉर्मोन्स संतुलित राहतात आणि शरीराला “सुरक्षित” असल्याचा संदेश मिळतो. यामुळे ब्लड शुगरचे चढ-उतार कमी होतात. डॉ. भाग्येश कुलकर्णी यांच्या मते, ध्यान हा पर्याय नाही तर मधुमेह उपचारांचा एक भाग असायला हवा.
कृतज्ञता तणाव कमी करणारे नैसर्गिक औषध आहे
“माझ्याबरोबरच हे का झाले?” हा विचार साखर वाढवतो, तर “जे आहे त्याबद्दल धन्यवाद” हा विचार मन हलके करतो. कृतज्ञतेमुळे नकारात्मक विचार कमी होतात, मानसिक दबाव कमी होतो आणि उपचारांना शरीर चांगला प्रतिसाद देते. म्हणून रोज किमान काही क्षण कृतज्ञतेचा सराव करणे महत्त्वाचे आहे.
निसर्गाशी जोडले गेल्याने शरीर आपोआप बरे होण्याच्या दिशेने जाते
निसर्गात चालणे, सूर्यप्रकाश घेणे, झाडांमध्ये वेळ घालवणे यामुळे मन शांत होते, झोप सुधारते आणि शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. डॉ. भाग्येश कुलकर्णी यांच्या मते, निसर्ग हा silent healer आहे आणि मधुमेह रुग्णांनी निसर्गाशी नाते जोडणे फार आवश्यक आहे.
राग, द्वेष आणि नात्यांतील तणाव साखर वाढवतात
मनात साठलेला राग, मत्सर किंवा नात्यांमधील तणाव शरीरावर दीर्घकाळ ताण निर्माण करतो. हा ताण साखरेच्या नियंत्रणाला अडथळा आणतो. त्यामुळे क्षमाशीलता, दया आणि सेवा भाव अंगीकारल्यास मन हलके होते, भावनिक ओझे कमी होते आणि साखर नियंत्रणास मदत होते.
सकारात्मक विचार आणि श्रद्धा ही दीर्घकालीन औषध आहे
“माझा मधुमेह कधीच नियंत्रणात येणार नाही” हा विचार शरीराला हरवण्याचा संदेश देतो. त्याउलट “मी हळूहळू सुधारतोय” हा विचार शरीराला बरे होण्याची दिशा देतो. सकारात्मक विचारांमुळे रुग्ण औषध, आहार आणि व्यायामही अधिक प्रामाणिकपणे पाळतो.
मधुमेह जिंकणे म्हणजे आजाराशी नाही, स्वतःशी मैत्री करणे
डॉ. भाग्येश कुलकर्णी यांच्या मते मधुमेह हा शत्रू नाही, तर जीवनशैली सुधारण्याचा संदेश आहे. जेव्हा रुग्ण स्वतःच्या मनाला समजून घेतो, शांत करतो आणि सकारात्मक ठेवतो, तेव्हा मधुमेह आपोआप नियंत्रणात येण्यास सुरुवात होते.
मधुमेह नियंत्रण म्हणजे फक्त गोळ्या घेणे नाही.
औषध + आहार + व्यायाम + मनाची शांतता + सकारात्मक विचार = Winning Diabetes
आपल्या मधुमेह, बी.पी., थायराइड, इत्यादि जीवनशैलीशी निगडित आजारांची मूळ कारणे आणि त्यावरील नैसर्गिक उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये शामिल व्हा. आमच्या वेबसाइट वर जाऊन मोफत आपला नाव रजिस्टर करा| https://drbhagyeshkulkarni.com/dff-free-webinar-hindi/
नियमित अपडेटसाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा!
DFF प्रोग्रॅम बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट https://drbhagyeshculkarni.com ला भेट द्या
अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबर वर संपर्क करा. 9511218891