माझे ध्येय आणि माझे संकल्प
परिचय
भारतात किंवा जगभरात चिंताजनक दराने डायबिटीसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे अनेक उपाय आणि बरे करणारी औषधे तसेच इन्सुलिनचे समर्थन करणारे अनेक अभ्यास असूनही मूळ समस्या काही सुटलेली दिसत नाही. कोणत्याही नवीन शोधाने समस्या सोडवण्यास हातभार लावला पाहिजे पण डायबिटीस बरा करणाऱ्या औषधांच्या बाबतीत असे घडत नाही. आज जगभर अधिक संख्येने आणि विविध प्रकारच्या औषधांची निर्मिती केली जात आहे कारण डायबिटीस कमी होणे गरजेचे आहे परंतु याउलट जगभरातील डायबिटीस चा प्रभाव वाढत आहे. हे माझ्यासाठी विचार करायला लावणारे कारण होते, कारण डायबिटीस निर्मूलनाच्या पारंपारिक पद्धतींमध्ये खूप मोठी दरी दिसते आणि ही दरी येथे भरून काढण्याचे काम करणे हे माझे अंतिम ध्येय आहे.
भारत हा डायबिटीस फ्री फॉरएव्हर असावा असा आमचा संकल्प आहे आणि या संकल्पाने माझ्या कारकिर्दीची बरीच रचना केली आहे आणि या मोहिमेला त्याच्या सर्वोच्च स्तरावर घेऊन जाण्याचे माझे ध्येय आहे. मी माझ्या डायबिटीस फ्री फॉरएव्हर या ब्रीदवाक्याचा पाठपुरावा करत असताना, डायबिटीस हा एक दीर्घकाळ आजार आहे जो कधीही लवकर बरा होत नाही.असा गैरसमज लोकांच्या मनात सतत वावरत असल्याचे मी ऐकले आणि पाहिले होते. सुमारे २,००,००० पेक्षा अधिक रुग्णांना पाहिल्यानंतर, मी असा निष्कर्ष काढला की, नवीन औषधांचा कोर्स आणि लोकांचा त्यांच्या दैनंदिन औषधोपचाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन हे या त्रासामागील प्रमुख कारण आहे. ‘डायबिटीस हा आयुष्यभराचा त्रास आहे’ असा लोकांचा समज आहे परंतु हे देखील सत्य आहे की, सत्य नसलेली कोणतीही गोष्ट ही जर अनेक लोकांनी वारंवार सांगितली तर ती शेवटी तुम्हाला खरी वाटायला लागते. पारंपारिक पद्धतींचा अवलंब करून, माणूस हा समज नक्कीच मिटवू शकतो कारण माझ्या रुग्णांनी हे यशस्वीरित्या केले आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही देखील करू शकता. डायबिटीसशी संबंधित गैरसमज दूर करण्यासाठी आणि या विकारापासून कायमचे मुक्त करण्यासाठी एक उपचारात्मक आणि सर्वांगीण दृष्टीकोन निर्माण करणे हे डायबिटीस फ्री फॉरएव्हर या संस्थेचे उद्दिष्ट आहे
माझे ध्येय – जगातून डायबिटीस निर्मूलन करणेः
माझे मिशन डायबिटीस फ्री फॉरएव्हर का आहे आणि या मिशन बद्दलची माहिती अधिकाधिक लोकांना का पोहचवायची आहे याबद्दल बोलूया. ज्यांना डायबिटीस आणि त्यासंबंधित विकार आहेत अशा लोकांच्या जीवनात नैसर्गिकरित्या, म्हणजे औषधांशिवाय नैसर्गिक उपायांनी आनंद परत आणणे हे माझे ध्येय आहे. लोकांच्या जीवनातून डायबिटीस पूर्णपणे काढून टाकण्यासाठी सोपे, परवडणारे, औषधांशिवाय नैसर्गिक उपाय वापरण्यासाठी डायबिटीस फ्री फॉरएव्हर ही एक सर्वांगीण दृष्टीकोन आधारित मोहीम आहे जी आमच्या रुग्णांच्या शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्यावर केंद्रित आहे. जेव्हा डायबिटीस चा विचार केला जातो, तेव्हा रुग्णांची पण मनाची तयारी असते की, डॉक्टर त्यांना अनेक महागड्या औषधांची यादी देतील, ज्यामुळे त्यांचा डायबिटीस १००% दूर होणार नाही परंतु केवळ लोकांना सावधगिरीचा उपाय असा वाटतो की, ते त्यांच्या डायबिटीसची तपासणी स्वतः करतील किंवा ते डॉक्टरांकडे गेल्यावर डॉक्टर त्यांना वेगवेगळे प्रतिबंधात्मक उपाय सुचवतील.
डायबेटोलॉजी फक्त शारीरिक लेवलपुरते मर्यादित नाही तर हे भावनिक, शारीरिक आणि आध्यात्मिक पैलूंशी देखील संबंधित आहे. मी पाहिले आहे की जेव्हा डायबिटीस रोगमुक्तीचा विचार केला जातो तेव्हा या सर्व बाबींचाही विचार केला जातो. आजच्या जगात डायबिटीस असलेल्या लोकांची आपण थेट भगवत गीतेच्या अर्जुनाशी तुलना करू शकतो. मी नुकताच टाईम्स ऑफ इंडियामध्ये एक लेख वाचला, ज्यात अर्जुन युद्धात अडकल्याबद्दल सांगितले होते आणि आज डायबिटीसशी लढणाऱ्या लोकांची स्थिती अर्जुनासारखीच आहे. अर्जुन जसा युद्ध जिंकण्यासाठी योग्य मार्ग शोधण्यात अडकला होता, तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांना वाचवण्यासाठी आले होते. डायबिटीस असलेले लोक देखील विविध प्रकारचे उपचार, पर्याय आणि अभ्यासक्रम यांच्यामध्ये अडकले आहेत आणि त्यांना देखील भगवान कृष्णाच्या रूपात कोणीतरी येईल, जो त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी मार्गदर्शक म्हणून काम करेल असे वाटते. मला असे वाटते की, प्रत्येक माणसाला १०० वर्षे आरोग्य आणि समृद्धीसह जगण्याचा अधिकार आहे. केवळ संपत्ती असणे आवश्यक नाही तर संपत्ती आणि योग्य आरोग्य हे ध्येय असणे गरजेचे आहे आणि जर माझ्या कन्सल्टन्सी द्वारे आणि या पुस्तकाद्वारे डायबिटीस असलेल्या लोकांना किमान काही आनंद मिळू शकला तर माझे जीवन ध्येय आणि माझे डायबिटीस फ्री फॉरएव्हर हे ब्रीदवाक्य सफल झाले असे मला वाटेल. माझे संकल्प – स्थानिक ते जागतिक सेवेपर्यंतचा माझा प्रवासः मी डॉक्टरांच्या कुटुंबात जन्मलो. माझे आई आणि वडील दोघेही डॉक्टर आहेत. मी त्यांची प्रॅक्टिस आणि कार्य नैतिकता पाहिली, ज्यामुळे मला या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळाली. माझे शिक्षण झाल्यानंतर माझ्या आई बाबांप्रमाणेच नियमितपणे प्रॅक्टिस करण्याच्या माझ्या सध्याच्या स्वप्नापासून दूर होतो. त्या वेळी मला नेहमी वाटायचे की चांगला डॉक्टर होण्याचा अर्थ पैसा आणि संपत्तीशी जोडला जाणे असा नाही. मला काहीतरी वेगळे करायचे होते, काही काळानंतर मला या दृष्टीचा मार्ग स्पष्ट झाला. जेव्हा मी माझे ग्रॅज्युएशन पूर्ण केले आणि वैद्यकीय व्यवसायात प्रवेश केला, तेव्हा माझे लक्ष डायबिटीस नियंत्रित करण्यावर अधिक करणे होते आणि जेंव्हा मी डायबिटीस फ्री फॉरएव्हर सुरू केले तेव्हा या विकाराला प्रतिबंध करणे हे माझे ध्येय झालेले होते. आपण सतत ऐकतो की काहीही झाले तरी डायबिटीस हा आजार डायबिटीस झालेल्या व्यक्तींला आयुष्यभर सोडणार नाही. आमच्याकडे अनेक प्रतिबंधात्मक मोहिमा, प्रतिबंधात्मक आरोग्य शिबीर आणि त्या संबंधी सर्व गोष्टी होत्या पण त्या दरम्यान माझ्या लक्षात आले की अनेक लोक या सारख्या जुनाट विकारांनी त्रस्त आहेत. ते सतत कठोर आहाराचे पालन करत होते आणि मिठाई किंवा आंबा, केळी यांसारखी फळे देखील न खाऊन त्यांनी डायबिटीस वर नियंत्रण ठेवले आहे तरीही त्यांची औषधे अजूनही वाढत आहेत.
VISION
या लोकांशी सुरू झालेले संभाषण माझ्यासाठी अधिक ज्ञान देणारे होते. ती एक महत्त्वाची चर्चा होती. विशेषतः डायबिटीस सारखे जुनाट आजार असलेले रुग्ण, त्यांच्या उपचारात डॉक्टर बदलत नाहीत हे मला जाणवले. जसजसे मी हे अधिकाधिक लोकांच्या बाबतीत हे अनुभवु लागलो, तसतसे मला जाणवले की त्यांची ही चर्चा मला माझ्या भविष्याकडे घेऊन जात आहे. आणि मग मी माझा संकल्प तयार करण्यास सुरुवात केली आणि मला काय करायचे आहे याबद्दल मला अधिक स्पष्टपणे समजले. लोकांना आनंदी जीवन जगण्यासाठी या जीवनशैली विकारांपासून मुक्ती मिळणे गरजेचे आहे हे मला प्रकर्षाने जाणवले आणि तेव्हाच माझे ध्येय हे स्पष्ट झाले. तज्ञ डॉक्टरांकडे अजूनही रुग्ण त्यांच्या त्याच त्याच आजाराबाबत तक्रार करत असतात. कुठेतरी ते त्यांच्या डॉक्टरांचा आदर करतात, पण ते त्यांना आशिर्वाद देत नाहीत हे लक्षात आल्यावर मी असा संकल्प केला की,मला माझ्या रूग्णांकडून आशिर्वाद पण मिळवायचे आहे मग त्यानंतर डायबिटीस फ्री फॉरएव्हर या चेहऱ्याला आकार दिला गेला जसे आपण आता पाहतो.
आपल्या मधुमेह, बी.पी., थायराइड, इत्यादि जीवनशैलीशी निगडित आजारांची मूळ कारणे आणि त्यावरील नैसर्गिक उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये शामिल व्हा. आमच्या वेबसाइट वर जाऊन मोफत आपला नाव रजिस्टर करा|
नियमित अपडेटसाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा!
DFF प्रोग्रॅम बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट https://drbhagyeshculkarni.com ला भेट द्या
अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबर वर संपर्क करा. 9511218891