fbpx

वैयक्तिक थेरपी विरुद्ध गट थेरपी

माझ्या प्रॅक्टिस मध्ये अनेक डायबिटीस रुग्णांवर उपचार करत असताना माझा जो या रुग्णांच्या बाबतीत अनुभव होता तो म्हणजे ते निराश नसतात पण ते उदासीन असतात. “हे सर्व माझ्या बाबतीतच का घडले किंवा मीच का? अशा तक्रारी स्वतःबद्दल ते करत असतात. जेव्हा मी डायबिटीस च्या रुग्णांवर उपचार करायला सुरुवात केली, तेव्हा सुरुवातीला उपचार फारसे यशस्वी होत नव्हते आणि जे परिणाम हवे होते ते येत नव्हते किंवा आले तर फार उशिरा येत होते. मी याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला; हे का होत आहे? म्हणून मी या माझ्या रूग्णांवर संशोधन आणि सर्वेक्षण सुरू केले, तेव्हा माझ्या लक्ष्यात आले की ते गोंधळलेले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्याकडे प्रेरणेचा अभाव आहे. स्वतः मधे काही सकारात्मक बदल होत आहे की नाही याबद्दल शंका आणि गोंधळामुळे ते औषधोपचार आणि सल्ले नीट पाळू शकत नाहीत आणि महत्वाचा मुद्दा असा की त्यांची या प्रक्रियेवर विश्वासाच्या बाबतीत कमतरता दिसून आली.

खरा प्रॉब्लेम हा आपण अनुसरण करत असलेल्या दृष्टिकोनामध्ये आहे हे मला जाणवले.आपण रुग्णांवर वैयक्तिक उपचार करत आहोत या सिस्टीम मध्ये कुठे तरी बदल हवे आहेत. कारण सर्व रुग्णांना समान समस्या आहेत आणि त्यांच्या चुकांमध्ये देखील साम्यता आहे. त्यामुळे त्यांना समान शिक्षणाची गरज आहे. वैयक्तिक थेरपी चा विचार करता जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा जे काही फरक आहेत ते फार कमी आणि छोटे आहेत जसे की औषधांचे वेगवेगळे डोस इ. परंतु एकंदरीत, मोठी समस्या किंवा समस्यांचा समूह हा समान राहतो. जे भाग समान आहेत ते समान प्रणालीचे अनुसरण करीत आहेत, ते त्याच चुका करत आहेत आणि त्या चुकांवर उपाय देखील सारखेच आहेत, मग गटातील लोकांना शिक्षित करण्याचा प्रयत्न का करू नये, उदाहरणार्थ – मुले शाळेत, गटांमध्ये शिकतात.

ग्रुप थेरपीचा मुख्य फायदा असा आहे की एकाच वेळी मोठ्या संख्येने लोकांना शिक्षित केले जाऊ शकते. कारण जे लोक समूहाचा भाग आहेत त्यांना एकटे वाटत नाही, ते त्यांच्या सभोवतालच्या लोकांना सारख्याच समस्यांनी त्रासलेले पाहतात जे त्यांच्यापेक्षा काही वाईट अनुभवातून जात आहेत. ज्यामुळे त्यांना आत्मविश्वास मिळतो की ते एकटे नाहीत तर आपल्यासारखे समदु:खी लोक देखील आहेत. या लोकांमध्ये एकमेकांना आधार देत असताना एकत्रित असल्याची भावना निर्माण होते आणि सपोर्ट सिस्टीम असल्याने मनाला शांती मिळते. डायबिटीस पूर्ववत करणे हे सर्व लोकांचे ध्येय आहे. त्यामुळे ते एकमेकांना आशीर्वाद आणि सकारात्मक ऊर्जा देण्याचे काम करतात. हे सर्व लक्षयत आल्यानंतर आम्ही व्हॉट्सअॅप, ऑनलाइन सीआरएम, मीटिंग आणि सेमिनारच्या माध्यमातून आम्ही अशी सपोर्ट सिस्टीम तयार केली की त्या गटातील ५% लोकांनी त्यांचा डायबिटीस यशस्वीरित्या बरा केला तरीही इतर ९५% लोक त्यांच्यापासून प्रेरणा घेतात आणि ते त्या प्रक्रियेवर विश्वास ठेवतात. शारीरिकदृष्ट्या त्यांना असे वाटते की जर इतर व्यक्ती हे करू शकतात तर मी का करू शकत नाही. अशी सकारात्मक भावना प्रक्रियेस मदत करते. जे वैयक्तिक थेरपीमध्ये होणार नाही. जर आपण डायबेटिक रिव्हर्सल हे युद्ध समजले तर वैयक्तिक लढण्यापेक्षा संघांच्या ग्रुपमध्ये लढणे हे जास्त परिणामकारक ठरते.

ग्रुपमध्ये थेरपी केल्याने आत्मविश्वास वाढण्यास आणि प्रेरणा मिळण्यास मदत होते आणि त्यांनी या सर्व प्रक्रियेचे पालन केल्यास ते डायबिटीस यशस्वीरित्या बरे करण्यास सक्षम होतात. केवळ डायबिटीस वर नियंत्रण ठेवणे हे एक मोठे आव्हान असते पण जेव्हा लोक ग्रुपमध्ये थेरपी घेतात तेव्हा तुलनात्मक दृष्ट्या ग्रुप थेरपीने आम्हाला या लोकांना मधुमेह मुक्त करण्यास अधिक यश मिळाले आहे. तर, आम्ही तयार केलेल्या या नवीन प्रणालीमध्ये ग्रुप थेरपी, वैयक्तिक सल्लामसलत, ग्रुप वेबिनार, एकमेकांच्या यशोगाथा शेअर करणे, समुदायाचा पाठिंबा आणि कौटुंबिक समर्थन यांचा समावेश आहे. आम्ही तयार केलेली ही प्रणाली डायबिटीस रोगमुक्ती होण्यात खूप प्रभावी ठरली आहे. आम्ही एका महिन्यात १०-१५ लोकांची संख्या १०० पेक्षा जास्त लोकांपर्यंत वाढलेली पाहिली आहे. आणि १००० च्या दशकात वाढतच जाईल हे आमचे ध्येय आहे. आजच्या काळात, माझा विश्वास आहे की ग्रुप कोचिंग आणि ग्रुप थेरपी केवळ डायबिटीस वरच नाही तर थायरॉईड, रक्तदाब अलझायमर यांसारख्या इतर जुनाट विकारांमध्येही खूप प्रभावी ठरते आणि त्याचा वैद्यकीय समुदायाने उपयोग केला पाहिजे. ‘डायबिटीस फ्री फॉरएव्हरच्या’ माझ्या अनुभवात याने चमत्कारिक परिणाम दिले आहेत. हे सर्व या चांगल्या ग्रुप थेरपी पद्धतीमुळे आहे जे समूहाची सकारात्मक ऊर्जा डायबिटीसपासून रोगमुक्ती करण्यासाठी एकत्र आणते.
वेबिनार किंवा ग्रुप थेरपीमध्ये का सामील व्हावे?

डायबिटीस हा एक विकार आहे आणि तो एक समूह म्हणून स्वीकारण्यात लाज नाही. आजच्या डॉक्टरांना लोकांना शिक्षित करायचे आहे पण ते इतके व्यस्त आहेत की, ते वेळेअभावी फक्त औषधोपचार करू शकतात आणि निदान चाचण्या सुचवू शकतात, रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात ज्ञानाचे हस्तांतरण शक्य नाही. बरेच लोक औषधे किंवा आहार घेण्यास तयार नसतात, ते फक्त सल्ल्यासाठी इकडे-तिकडे फिरत असतात. रुग्णांच्या भावना समजून घेणारे कोणीच नाही. म्हणून ग्रुपचा भाग असल्याने एकमेकांसोबत चर्चा होऊन कल्पना आणि भावनांची देवाणघेवाण होते. आणि ते लोकांसमोर सहजपणे आपल्या भावना व्यक्त करू शकतात. समूहाची सकारात्मक ऊर्जा आणि यशोगाथा इतर लोकांना प्रेरित करते त्यामुळे ते प्रक्रियेची अंमलबजावणी सुरू करतात आणि ग्रुप त्यांना वैयक्तिक थेरपीमध्ये शक्य नसलेल्या गोष्टी करण्यास भाग पाडण्यास मदत करते म्हणून आपल्याला यात इतके मोठे यश दिसत आहे आणि हे डायबिटीस रोगमुक्तीचे प्रमुख कारण आहे. जेव्हा तुमची साखरेची पातळी नियंत्रणात येते, तेव्हा ग्रुप मध्ये कौतुक होते परंतु जेव्हा तुमची प्रशंसा होते तेव्हा तुमचा कल तुमचे हे यश कायम ठेवण्याकडे असतो.

परंतू वैयक्तिक थेरपी मध्ये तसे दिसत नाही तिथे मर्यादा येतात तुमच्या प्रयत्नांची प्रशंसा न झाल्यास तुम्हाला अधिक प्रयत्न करण्यास प्रेरणा मिळत नाही. दुर्दैवाने, डायबिटीस च्या रुग्णांमध्ये, त्यांच्या यशाचे कौतुक करण्यासाठी कोणीही नसते, जेव्हा ते त्यांच्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवतात तेव्हा आनंद साजरा करण्यासाठी कोणीही नसते. परंतु ग्रुप थेरपी मध्ये तुम्ही समाजाचा एक भाग असल्याने, जिथे तुमची प्रशंसा केली जाते आणि हाच समुदाय पुढे कायमचा मधुमेह मुक्त निरोगी जीवनाकडे वाटचाल करताना दिसतो, यामुळे दीर्घ कालावधीसाठी निरोगी जीवनशैली जगण्याची शक्यता वाढते. सुरुवातीला, मी देखील संशयास्पद होतो, परंतु बऱ्याच रुग्णांवर उपचार केल्यानंतर मला खात्री पटली आहे की हा ऑनलाइन प्लॅटफॉर्म हे जगातील सर्वोत्तम माध्यम आहे जिथे आपण लोकांना आरामात आणि सहजतेने शिक्षित करू शकतो आणि एकाच वेळी मोठ्या समुहाला शिकवू शकतो. ऑनलाइन प्लॅटफॉर्म तसेच ग्रुप थेरपीचा फायदा असा की केवळ रुग्णालाच शिक्षण मिळते असे नाही तर संपूर्ण कुटुंबाला या आजाराविषयी माहिती मिळते. आम्हाला जो बदल जाणवला तो म्हणजे सम्पूर्ण कुटुंब डायबिटीसचा सामना करण्यासाठी एक संघ होऊन या आजारा विरुद्ध उभे रहाते आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंबास निरोगी जीवनशैली प्राप्त होते.

आपल्या मधुमेह, बी.पी., थायराइड, इत्यादि जीवनशैलीशी निगडित आजारांची मूळ कारणे आणि त्यावरील नैसर्गिक उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये शामिल व्हा. आमच्या वेबसाइट वर जाऊन मोफत आपला नाव रजिस्टर करा|👉🏼 https://drbhagyeshkulkarni.com/dff-free-webinar-hindi/

नियमित अपडेटसाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा!

DFF प्रोग्रॅम बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट https://drbhagyeshculkarni.com ला भेट द्या  

अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबर वर संपर्क करा.  9511218891

Open chat
1
We are available
Hello! How can i help you?