fbpx

१०० वर्षे निरोगी आयुष्य जगण्याचे सूत्र

1 03 |

पुर्वीचे लोक शंभर वर्षे किंवा त्यापेक्षाही जास्त निरोगी आयुष्य जगत असत. मग आजकाल असं काय झालं की, लोक शंभर वर्षे तर नाहीच पण चाळीशी नंतर बहुतेकांच्या मागे जीवनशैलीशी निगडित आजार लागतात आणि त्यानंतर जे काही आयुष्य जगतात तेही त्या रोगासोबत रडतखडत जगावे लागते. पुर्वीचे लोक असे काय करत होते? किंवा त्यांची जीवनशैली कशी होती? आणि आजकाल असे काय बदल झालेले आहेत की ज्यामुळे आजार तर वाढीस लागलेले आहेतच पण त्यासोबतच आयुर्मान देखील कमी झाले आहे कुठेतरी या सर्व गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. मधुमेहाचा विचार करता तुमचे ध्येय फक्त मधुमेहमुक्त होणे नसावे. मधुमेह मुक्ती शेवटची पायरी नसावी तर ती पहिली पायरी असावी. शंभर वर्षे निरोगी आयुष्य जगणे हे तुमचे अंतिम ध्येय असले पाहिजे. माझ्या पुस्तकांमध्ये किंवा माझ्या डीएफएफ संस्थेमध्ये जे काही उपाय आणि सल्ले दिलेले आहेत ते केवळ मधुमेह रोगमुक्तीसाठी नाहीत तर तुम्ही या तत्त्वांचे, नियमांचे पालन केले तर तुम्ही आपोआप आणि सहजतेने शंभर वर्षांचे पूर्ण दर्जेदार आयुष्य नक्कीच जगू शकाल.

मधुमेह असला तरीही प्रत्येकाला या पृथ्वीतलावर १०० वर्षे जगण्याचा अधिकार आहे. तुम्हाला डायबिटीस रिव्हर्सचे ज्ञान देणे आणि तुम्हाला डायबिटीस मुक्त करणे हा माझा उद्देश आहे, आणि जे काही आयुष्य उरले आहे, ते आयुष्य वेदना, मतभेद आणि दुःखाने न जगता पूर्ण क्षमतेने निरोगी आणि आनंदाने जगावे हा त्यामागील हेतु आहे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही निरोगी आणि रोगमुक्त राहता. माझ्या पुस्तकांमध्ये सांगितलेले उपाय तुम्हाला आरोग्याशी संबंधित योग्य आणि चुकीच्या गोष्टींबद्दल शिक्षित करण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. औषधे किंवा आहार योजना देऊन तात्पुरता आराम देण्याऐवजी ही पुस्तके तुम्हाला या आजाराबद्दल किंवा त्याचे मूळ कारण काय आहे याबद्दल ज्ञान देण्यास समर्थ आहेत. मला असे वाटते की औषधोपचारापेक्षा रोगाबद्दलचे ज्ञान आणि त्याची मूळ कारणे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे त्यामुळे रोगाची भीती दूर होते. ज्यांना डायबिटीस रिव्हर्सल करायचे आहे त्यांनी १०० वर्षे निरोगी आयुष्याचे ध्येय ठेवले पाहिजे आणि याची सुरुवात डायबिटीसच्या रोगमुक्तीपासून होते असे मला इथे नमूद करावेसे वाटते.

डायबिटीस रिव्हर्स करणे हे काही कंटाळवाणे काम नाही, उलट ते अगदी सोपे आहे, असे मी म्हणेल. मला माहीत आहे हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल पण हे खरे आहे माझ्या पुस्तकां मध्ये सुचवलेले बदल किंवा डीएफएफ ला जॉइन करून ती सर्व तत्वे समजून घेऊन हे प्रत्येकजण करू शकतो. उपचारासाठी आवश्यक असलेल्या ९०% गोष्टी तुमच्या स्थानिक सुपरमार्केटमध्ये उपलब्ध आहेत. डायबिटीस रोगमुक्ती ही कठीण प्रक्रिया नाही. जर योग्य पद्धतीने समजून घेऊन योग्य ते बदल केले तर हीच प्रक्रिया निरोगी आयुष्यासाठी सुखावह होऊ शकते. आपल्याला ते अशक्य वाटते कारण की आपल्याला त्याचे योग्य ज्ञान नाही आणि ते मार्ग अद्याप समजून घेतले गेलेले नाहीत, परंतु प्रत्यक्षात तत्त्वे अंमलात आणण्यास सुरुवात केलीत, तर तुम्हाला त्याचे परिणाम दिसू लागतात. हे शंभर वर्षांच्या निरोगी आयुष्याकडे नेणारे प्रवेशद्वार आहे असे मी म्हणेल.

गैरसमज आणि काही समजांमुळे आपण त्याच त्याच चुका करत राहतो, जर आपल्याला आरोग्य जीवनात सकारात्मक बदल किंवा चांगले परिणाम प्राप्त करायचे असतील तर आपल्याला चौकटी बाहेर जाऊन सारासार विचार करून काही वेगळ्या गोष्टींची सुरुवात करणे गरजेचे आहे. डीएफएफ चा उद्देश तुम्हाला योग्य ज्ञान आणि योग्य पद्धती प्रदान करण्याचा आहे ज्यांचे पालन करून तुम्ही निरोगी जीवन जगू शकता. तर तुमच्यापैकी किती जण बदलायला तयार आहात? तुमच्यापैकी किती जण माझ्या पुस्तकांमध्ये किंवा डीएफएफने दाखवलेल्या मार्गावर जाण्यास तयार आहात? आरोग्य पुनर्प्राप्तीसाठी आणि कायमच्या निरोगी जीवनाच्या प्रवासासाठी आपण खरंच तयार आहेत का?

शंभर वर्षे जगणे ही सर्वांची इच्छा असते, पण फार कमी जण हे लक्ष्य गाठतात. आपले पूर्वज १०० वर्षांपेक्षा अधिक वर्षे जगू शकले. कारण ते त्या काळात जे अन्न खायचे ते भेसळयुक्त किंवा मशीनवर प्रक्रिया केलेले नव्हते. आज बाजारात उपलब्ध असलेल्या प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी डेट असते, याचा अर्थ ती केवळ ठराविक कालावधीत किंवा त्यापूर्वीच वापरता येते. जर एखाद्याने रोजच्या जेवणात ७५% कच्चे अन्न जरी घेण्यास सुरुवात केली तरी आजूबाजूच्या सर्व गोष्टी बदलू लागतील. त्यासाठी आपल्याला आपल्या मुळांकडे परत जावे लागेल आणि त्या गोष्टींचे अनुसरण करावे लागेल. कच्या अन्नाच्या सेवनाने मिळणारे फायदे लक्ष्यात घेऊन योग्य पोषक तत्वांनी आहार समृद्ध करावा लागेल. योग्य मार्गदर्शन तसेच आहारासोबतच जीवनशैली मध्ये योग्य बदल, मानसिक आरोग्याची काळजी घेणे सुरू केले, तर आजूबाजूच्या सर्व गोष्टी बदलू लागतील. हे सूत्र, गुपीत १०० वर्षे जगण्यास नक्कीच मदत करेल अशी मला खात्री आहे.

आपल्या मधुमेह, बी.पी., थायराइड, इत्यादि जीवनशैलीशी निगडित आजारांची मूळ कारणे आणि त्यावरील नैसर्गिक उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये शामिल व्हा. आमच्या वेबसाइट वर जाऊन मोफत आपला नाव रजिस्टर करा|👉🏼 https://drbhagyeshkulkarni.com/dff-free-webinar-hindi/

नियमित अपडेटसाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा!

DFF प्रोग्रॅम बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट https://drbhagyeshculkarni.com ला भेट द्या  

अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबर वर संपर्क करा.  9511218891

Open chat
1
We are available
Hello! How can i help you?