पारंपरिक चहा: चव की सवय?

आपल्या प्रत्येक सकाळची सुरुवात कशाने होते? बहुतेक जण उत्तर देतील, “चहा झालाय का?” सकाळच्या धावपळीच्या क्षणात, ऑफिसच्या गप्पांमध्ये, जेवणानंतर येणाऱ्या थकव्याच्या क्षणी किंवा संध्याकाळच्या विश्रांतीत आपला हात नकळत एक कप चहा शोधतो.
चहा हा केवळ एक गरम पेय नाही, तो आपल्या संस्कृतीचा, भावनांचा आणि नात्यांचा भाग झालाय. पण याच चहामध्ये एक साखरयुक्त, कॅफिनयुक्त आणि आपल्या नकळत मेंदूला सवयी लावणारी गोष्ट दडलेली आहे, जी आपल्याला थोडाफार आनंद देत असली, तरी शरीराच्या पातळीवर हळूहळू त्रासदायक ठरत असते. आपण बहुतेकदा मानतो की चहा आपल्याला “एनर्जी” देतो. पण खरंच विचार केला तर ही ऊर्जा किती टिकते? काही वेळासाठी तरतरी येते, पण लवकरच थकवा, चिडचिड, अॅसिडिटी, अनिद्रा अशा तक्रारी सुरू होतात.
दीर्घकाळ चहा घेत राहिल्यास शरीरात इन्सुलिन रेसिस्टन्स वाढू शकतो, मधुमेहाची शक्यता निर्माण होते, आणि हार्मोनल असंतुलनाचा धोका वाढतो. साखर हा यातील सर्वात मोठा धोका आहे. दररोज दोन ते तीन कप चहात आपण जेवढी साखर घालतो, ती आपल्या शरीराला अतिरिक्त रिकाम्या कॅलरीज देते. त्यातून वजनवाढ, फॅटी लिव्हर, आणि इतर अनेक लपलेले आजार वाढू शकतात. याशिवाय दूध चहा घेतल्याने चहातील नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्सचे फायदे कमी होतात, कारण दूधातील केसीन प्रथिन यांचे कार्य अडथळते. कॅफिन कोर्टिसोल (तणाव निर्माण करणारा हार्मोन) वाढवतो, ज्यामुळे झोपेवर परिणाम होतो आणि रक्तातील साखर नियंत्रणाबाहेर जाते.
इतकंच नव्हे तर चहा आतड्यांतील जंतुसंतुलनही बिघडवतो, ज्यामुळे पचनशक्ती आणि मेटाबॉलिझम कमजोर होतो. आणि सर्वात महत्वाचे, चहा शरीरातील लोहाचे शोषण रोखतो. त्यामुळे अनेकांना दीर्घकाळात थकवा, अॅनिमिया आणि हाडांची कमजोरी जाणवू लागते. मग प्रश्न उरतो, “चहा सोडायचा का?”
उत्तर आहे, चहा सोडायचा नाही, पण त्याचा पर्याय निवडायचा आहे. चहा हा केवळ साखर, दूध आणि पाण्याचं मिश्रण नाही, तो एक अनुभव आहे – स्वतःसाठी थांबण्याचा, विश्रांतीचा. पण त्या अनुभवात आपण आरोग्याची भर घालू शकतो.
- हर्बल टी किंवा आयुर्वेदिक काढे: हे त्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहेत. तुळस, आलं, दालचिनी, हळद, मेथी, लिंबू आणि काळीमिरी यांचा वापर करून बनवलेले पेय रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, शरीरातील सूज कमी करतात आणि साखरेवर नियंत्रण ठेवतात. मेथीचा चहा मधुमेहावर विशेष प्रभावी ठरतो. हळद, लिंबू आणि काळीमिरीच्या मिश्रणामुळे लिव्हर डिटॉक्स होते आणि त्वचाही उजळते.
- ग्रीन टी आणि व्हाईट टी: यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे दोन्ही पेय वजन कमी करण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी आणि त्वचेचा तवंग वाढवण्यासाठी फायदेशीर आहेत. त्यात साखर नसते, आणि दुधासारखी कोणतीही अडथळा करणारी गोष्टही नाही.
- लेमनग्रास आणि तुळशीचा चहा: हा देखील एक स्वादिष्ट आणि नैसर्गिक पर्याय आहे. त्यामध्ये कॅफिन नसल्यामुळे झोपेवर परिणाम होत नाही आणि तो शरीरातील दाहही कमी करतो.
- गोल्डन टी: रात्री झोपण्यापूर्वी घेतलेला “गोल्डन टी”, म्हणजे नारळाच्या दुधात उकडलेली हळद, थोडी काळीमिरी आणि इतर हर्ब्स, मनाला शांतता देते, झोप सुधारते आणि संपूर्ण शरीराला विश्रांती मिळते.
चहा म्हणजे केवळ शरीरासाठी नाही, तर मनासाठीदेखील एक विश्रांतीचा क्षण असतो. आणि त्यामुळेच “माइंडफुल टी टाइम” ही कल्पना समोर येते. चहा पिताना श्वासावर लक्ष केंद्रित करून, हळूहळू चहा प्यायल्यास, त्या क्षणात पूर्णपणे उपस्थित राहिल्यास, तो अनुभव अधिक सकारात्मक ठरतो. हे केवळ मानसिक आरोग्यासाठी नव्हे, तर तणाव नियंत्रण आणि रक्तदाबासाठीही उपयुक्त आहे.
दिवाळी म्हणजे नवचैतन्य, नवसंकल्प आणि आनंदाचा उत्सव. घर स्वच्छ करतो, नवीन कपडे घेतो, पण शरीर आणि मन यांचं काय? यंदा फक्त बाह्य प्रकाश नव्हे, तर आरोग्याचाही एक नवा दीप पेटवा. पारंपरिक चहा हळूहळू आरोग्यावर घात करत असेल, तर का नाही आपण हर्बल, सेंद्रिय आणि कॅफिनविरहित पर्याय निवडायचा? दिवसातून फक्त एक सवय बदलली तरी ते शरीरात मोठं परिवर्तन घडवू शकतं, साखरेवर नियंत्रण, झोप सुधारणा, त्वचेचा तजेला, आणि एक सकारात्मक ऊर्जा असे अनेक फायदे मिळू शकतात.
शेवटी, आपल्या हातातला चहाचा कप एक निवड असतो. तो आरोग्याकडे नेणारा असावा की आजाराकडे?
दररोज सकाळी 5 मिनिटे काढून एक हर्बल चहा बनवा. ऑफिसमध्ये चहा ब्रेकसाठी ग्रीन टीचा पर्याय ठेवा. रात्री झोपण्याआधी “गोल्डन टी” घ्या आणि स्वतःला एक शांत, गुणकारी झोप द्या. या दिवाळीत स्वतःला एक नवी भेट द्या, साखरमुक्त, नैसर्गिक, आरोग्यदायी चहाचा अनुभव. चहा सोडणे म्हणजे जीवनातला आनंद नाहीसा होणे नाही; तो आरोग्याचा नवा अध्याय सुरू करण्याचा क्षण असतो. चहा बदलला की दिवस बदलतो; दिवस बदलला की सवय बदलते; आणि सवय बदलली की आयुष्यच बदलतं. या दिवाळीत आरोग्याची नवी सवय आत्मसात करूया.
आपल्या मधुमेह, बी.पी., थायराइड, इत्यादि जीवनशैलीशी निगडित आजारांची मूळ कारणे आणि त्यावरील नैसर्गिक उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये शामिल व्हा. आमच्या वेबसाइट वर जाऊन मोफत आपला नाव रजिस्टर करा| https://drbhagyeshkulkarni.com/dff-free-webinar-hindi/
नियमित अपडेटसाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा!
DFF प्रोग्रॅम बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट https://drbhagyeshculkarni.com ला भेट द्या
अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबर वर संपर्क करा. 9511218891