डायबिटीस रिव्हर्सल फॉर्म्युला

जेव्हा जेव्हा आपण एखाद्या रोगमुक्तीचा विचार करतो तेव्हा आपले प्रयत्न हे संपूर्ण आत्मविश्वासाने असले पाहिजे. तिथे किंतु परंतुला जागा नसावी आणि अर्धवट प्रयत्न करून आपले काम होणार नाही. त्यासाठी आपल्याला सकारात्मक मानसिकता असणे खूप गरजेचे आहे. डायबिटीस रिव्हर्स करण्यासाठी सर्वात महत्वाचा फॉर्म्युला म्हणजे मन आहे यासाठी आपल्याला डायबिटीस बद्दल सकारात्मक दृष्टीकोन असणे आवश्यक आहे.
मी माझ्या वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये २ लाखांहून अधिक लोक पाहिले आहेत, त्यामध्ये दहा हजारांहून अधिक लोकांचा डायबिटीस पूर्णपणे बरा करण्यात मला यश मिळाळे आहे. माझ्या अनुभवातुन सांगायचे झाले तर ते म्हणजे रूग्ण वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे असूनही ते करत असलेल्या चुका सारख्याच आहे. डायबिटीस बरा करण्यासाठी आपल्याला १०० वेगवेगळ्या गोष्टी करण्याची गरज नाही तर त्यासाठी आपल्याला फक्त विशिष्ट प्रक्रियेचे पालन करावे लागेल. डायबिटीसमध्ये डायबिटीस रुग्णांशी संबंधित विकार आणि रोग तसेच बरे होण्याचे एक स्वरूप आहे. ही एक आटोपशीर उपचार प्रणाली आहे त्यामुळे तुम्हाला ही सिस्टीम नीट समजून घ्यावी लागेल.
डायबिटीस नियंत्रण आणि डायबिटीस रिव्हर्सल या दोन वेगळ्या प्रणाली आहेत. त्यामध्ये डायबिटीस नियंत्रण ही एक पारंपारिक प्रणाली आहे. साखरेची पातळी तपासणे, औषधे घेणे आणि साखर नियंत्रणात ठेवणे, यावर लक्ष्य केंद्रित असते. यामध्ये रोग वाढतो किंवा वाढतच जातो. तर याउलट डायबिटीस रिव्हर्सलमध्ये, योग्य डॉक्टरांकडून योग्य मूल्यांकन करून मूळ कारणावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. रुग्ण आणि डॉक्टर दोघांचीही डायबेटिक रिव्हर्सल मानसिकता असली पाहिजे, दोघांनीही असा विश्वास ठेवला पाहिजे की डायबिटीस रोगमुक्ती शक्य आहे. त्याचप्रमाणे योग्यरित्या उपचार करण्यासाठी मूळ कारण शोधणे महत्त्वाचे असते. एकदा का आपण कारण शोधू शकलो आणि त्यावर लक्ष केंद्रित करू शकलो की डायबिटीस रिव्हर्सल प्रक्रिया जलद होते.
जेव्हा आपण म्हणतो की योग्य निदान महत्वाचे आहे, याचा अर्थ आपल्याला काही वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्यांवर लक्ष केंद्रित करावे लागेल.
या महत्त्वाच्या चाचण्या आवश्यक आहेतः
- शरीरात चरबीचे वस्तुमान किती आहे, पोटाचा घेर
- बॉडी मास इंडेक्स
- शरीराचा PH
- फास्टिंग इन्सुलिन
- HSCRP व्हिटॅमिन ए
- व्हिटॅमिन डी व बी १२
योग्य मूल्यमापन तर महत्वाचे आहेच पण योग्य डॉक्टर देखील महत्वाचा आहे की जो डायबिटीस रिव्हर्सलवर विश्वास ठेवतो. ज्याप्रमाणे इंद्रधनुष्यात ७ रंग असतात किंवा जसे संगीतात ७ नोट्स असतात, त्याचप्रमाणे डायबिटीस रोगमुक्तीच्या आपल्या ७ पायऱ्या आहेत. आम्ही अनेक डायबिटीस रुग्णांना निराशेत जीवन जगताना पाहिले आहे आणि म्हणून आम्हाला त्यांना मधुमेहमुक्ति साध्य करण्यास मदत करायची आहे आणि त्यांचा गेलेला आनंद त्यांच्या आयुष्यात परत आणायचा आहे.
जर तुम्ही या ७ पायऱ्या तुमच्या जीवनात अंतर्भूत केल्या तर तुमचा डायबिटीस उलटून जाण्यास मदत होईल.
- मन आणि शरीर डिटॉक्स-
५०% मधुमेहमुक्ति डिटॉक्सवर अवलंबून असते. डिटॉक्ससाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोट स्वच्छ ठेवणे. त्यासाठी तुम्ही (गंधर्व हरीतकी) एरंडेल तेलाची पावडर किंवा टॅब्लेट रात्री झोपताना एक ग्लास कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. जर तुम्हाला अपचन किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर तुम्हाला पोट साफ ठेवण्यापासून सुरुवात करावी लागेल. आम्ही घरगुती डिटॉक्स किट विकसित केले आहे. जे आमच्या निवासी कार्यक्रमाला उपस्थित राहतात, त्यांना आम्ही त्यांचा वापर कसा करायचा आणि त्यांचे पोट साफ कसे ठेवायचे हे शिकवतो.
तुमचे शरीर डिटॉक्स आणि ऍसिडिक मुक्त ठेवण्यासाठी, तुमचा सकाळचा चहा घेणे थांबवावे लागेल. जर तुम्ही चहा पीत असाल तर तुम्ही तुमच्या शरीरात अम्लीय घटक जोडत आहात हे लक्ष्यात ठेवावे. आम्ही शिफारस करतो की तुम्ही तुमचा दिवस अल्कलाइन पेयाने सुरू करावा म्हणजेच तुम्ही कोमट पाण्यात लिंबू, हळद आणि दालचिनी पावडर टाकून घेऊ शकता. अश्या अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आमच्या प्रोग्राम्समध्ये शिकवल्या जातात आणि विशेषतः ऍडव्हान्स कोर्समध्ये होम-बेस्ड डिटॉक्स किट्स डिझाइन केल्या जातात.
- शरीरदाह कमी करा –
अँटीग्रॅव्हिटी व्यायाम जसे की जिना वर चढणे, सायकल चालवणे, जॉगिंग सोबतच साधे चालणे जे तुमच्या स्नायूंवर काम करण्यास मदत करते. दररोज २०० टाळ्या वाजवा, ज्यामुळे तुमचे एक्यूप्रेशर पॉइंट दाबले जातील, हात आणि तळवे कोरडे घासल्यामुळे हृदयाशी संबंधित आजार टाळण्यास आणि शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होईल. - ABSORPTION वाढवा–
यामुळे दाह कमी होण्यास आणि आम्लता कमी होण्यास मदत होईल. हे एक साधे सूत्र आहे; प्रथम जेवणापूर्वी तुम्हाला ५०% कच्चे नैसर्गिक अन्न खावे लागेल आणि केवळ २५% नॉन-रिफाइंड धान्य खावे लागेल. नाष्टयाआधी ३ ते ४ वेगवेगळ्या रंगांची फळे खा. किमान २०० ग्रॅम सॅलडचे वेगवेगळे प्रकार आणि वेगवेगळे रंग, म्हणजे प्रत्येक जेवणापूर्वी १ मोठी वाटी किंवा २०० मिली सूप, यामुळे फायबरचे सेवन करण्यात मदत होईल ज्यामुळे तुमची तीव्र आणि सतत खाण्याची इच्छा कमी होण्यास मदत होईल आणि कॅलरीजचा वापर कमी होईल यामुळे तुमची पचनक्रिया सुधारेल आणि तुमचे शरीर अल्कधर्मी होईल. - पोषण वाढवा-
पुरेशा प्रमाणात वनस्पती-आधारित प्रादेशिक आणि नैसर्गिक भाज्या आणि फळे यांचा समावेश असलेल्या नैसर्गिक पूरक आणि शाकाहारी आहारासह पोषण वाढवा. - मूळ कारणांवर उपचार करा-
योग्य चिकित्सक आणि मार्गदर्शक तुम्हाला समस्येचे मूळ कारण समजून घेण्यास मदत करतात. आणि ओळखलेल्या मूळ कारणासाठी लक्ष्यित उपचार प्रदान करतात. - शिक्षण-
आमचा विश्वास आहे की औषधोपचारापेक्षा शिक्षण अधिक आवश्यक आहे. आतापर्यंत आपण औषधोपचाराबद्दल बोललो नाही तर रोगाबद्दल माहिती दिली आहे. डायबिटीस च्या आजच्या युगात लोकांचे सर्वाधिक शोषण होत आहे, बरेच लोक काय करू नये हे सांगतात, पण योग्य गोष्ट काय आहे हे सांगत नाहीत. आम्ही तुम्हाला सोपे, अनुसरण करता येण्यासारखे बदल सांगतो. जे तुम्हाला करायला आवडते आणि ज्याची तुम्ही दीर्घकालीन अंमलबजावणी करू शकता अशा सोपे असलेल्या शिक्षणावर माझा विश्वास आहे. - तणावमुक्ती –
येथे आपण विशेषतः नकारात्मक तणावाबद्दल बोलत आहोत, उदाहरणार्थ, एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू, कुटुंबातील काही घटस्फोट,कार्यालयीन तणाव, न्यायालयीन प्रकरण. नकारात्मक ताण हा असा ताण असतो जो आपण व्यक्त करू इच्छितो पण करू शकत नाही. अशा प्रकारच्या तणावातून मुक्त होण्यास आपण शिकले पाहिजे. दुर्दैवाने, आपल्या शिक्षण व्यवस्थेत तणावाचे व्यवस्थापन कसे करावे हे कोणीही शिकवत नाही, जो एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. आमच्या कोर्समध्ये, आम्ही नकारात्मक तणावाचे व्यवस्थापन कसे करावे याबद्दल आम्ही १० पेक्षा जास्त तंत्रे शिकवतो. परंतु येथे मी तुम्हाला त्यापैकी दोन तंत्राबद्दल सांगू इच्छितो. - अ) नेहमी कृतज्ञतेच्या भावनेत राहा आणि तुमच्या जीवनातील पश्चाताप काढून टाका. तुम्हाला जे काही खेद वाटत असेल ते कागदावर लिहा आणि व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एकांतात बसू शकता, तुम्ही रडू शकता, तुम्ही मंदिरात बसू शकता. तुम्हाला इतरांना क्षमा करावी लागेल आणि सर्वात महत्वाचा भाग, तुम्ही स्वतःला माफ केले आहे हे लिहावे लागेल. याला रिग्रेट व्यायाम म्हणतात.
-
ब) आता उद्यापासून तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करावी लागेल. तुमच्या आयुष्यात घडलेल्या ५ चांगल्या गोष्टी सांगा आणि ५ व्यक्ती ज्यांनी तुम्हाला तुमच्या आयुष्यात मदत केली आहे त्यांचे मनापासून आभार माना. ज्या देवाने तुम्हाला दुसरा दिवस दिला आहे त्याचे आभार माना. काल रात्री झोपलेल्या अनेकांना आज सकाळी जाग आली नाही म्हणून, आम्हाला दिलेल्या २४ तासांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आयुष्यात ९५% गोष्टी चांगल्या असतात, फक्त ५% समस्या असतात. तर कुठे लक्ष्य केंद्रित करायचे हे तुम्हालाच ठरवायचे आहे.
वरील ७ पायऱ्या आपल्या जीवनात अंतर्भूत केल्या तर डायबिटीस रिव्हर्सल नक्कीच शक्य आहे.
आपल्या मधुमेह, बी.पी., थायराइड, इत्यादि जीवनशैलीशी निगडित आजारांची मूळ कारणे आणि त्यावरील नैसर्गिक उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये शामिल व्हा. आमच्या वेबसाइट वर जाऊन मोफत आपला नाव रजिस्टर करा|
नियमित अपडेटसाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा!
DFF प्रोग्रॅम बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट https://drbhagyeshculkarni.com ला भेट द्या
अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबर वर संपर्क करा. 9511218891