Diabetic Breakfast Blueprint | डॉ. भाग्येश कुलकर्णी

diabetic blueprint

डॉ. भाग्येश कुलकर्णी नेहमी सांगतात की, मधुमेह नियंत्रणासाठी नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्त्वाचा आहार आहे कारण सकाळी घेतलेले अन्न रक्तातील साखरेवर दिवसभर परिणाम करते.

प्रोटीनयुक्त नाश्ता का आवश्यक?
डॉ. भाग्येश यांच्या मतानुसार प्रोटीन घेतल्यावर रक्तातील साखर हळूहळू वाढते, भूक कमी लागते, दिवसभर cravings कमी होतात, शरीराची ऊर्जा स्थिर राहते, मसल्स टिकतात, इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते. प्रत्येक नाश्त्यात १८–२५ ग्रॅम प्रोटीन असणे आवश्यक असते.

डॉ. भाग्येश यांचे टॉप ५ नाश्ता :
1) अंड्यांचे ऑम्लेट / स्क्रॅम्बल अंडी
१–२ अंडी, पालक, कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची,१ टीस्पून तूप किंवा ऑलिव्ह ऑईल सोबत ४–५ बदाम किंवा थोडे सॅलड
फायदा: प्रोटीन, फायबर आणि चांगले फॅट्स, साखर हळूहळू वाढते, ३–४ तास भूक लागत नाही

2) भाज्यांचा दालिया / मल्टीग्रेन उपमा
ब्राउन दालिया / ज्वारी / बाजरी / ओट्स रवा
त्यात गाजर, शेंग, मटार, टोमॅटो,हलके मसाले
फायदा: हे low GI कार्ब्स आहेत, फायबर जास्त → साखर नियंत्रित, वजन नियंत्रणास मदत

3) मूगडाळ चिला / बेसन चिला
भिजवलेली मूगडाळ किंवा बेसन, त्यात कोथिंबीर, गाजर, हिरवी चटणी, वरून १ टीस्पून फ्लॅक्ससीड पावडर
फायदा: भारी प्रोटीन, GI कमी, जास्त तेलाची गरज नाही

4) ओट्स बाऊल (लो-शुगर आवृत्ती)
स्टील-कट किंवा रोल्ड ओट्स, त्यात बदाम, अक्रोड, चिया/फ्लॅक्ससीड
फळात: ½ सफरचंद किंवा काही बेऱ्या
फायदा- साखर वाढवणारे instant oats टाळले जातात, ऊर्जा दीर्घकाळ टिकते

5) Unsweetened दही / Greek Yogurt बाऊल
सेट दही किंवा ग्रीक योगर्ट (गोड नसलेले), त्यात चिया सीड्स
छोटे फळाचे तुकडे
फायदा: प्रोटीन + प्रोबायोटिक्स, पचन सुधारते, सकाळी sugar spike कमी

फळे कधी आणि कशी खावीत? (डॉ. भाग्येश नियम) :
फळे रिकाम्या पोटी खाऊ नयेत कारण साखर झपाट्याने वाढते.
फळ नेहमी यांसोबत घ्यावे: दही, ओट्स, चिला, काही बदाम
चालणारी फळे- सफरचंद, पेरू, कीवी, बेऱ्या
कमी घ्यावीत- द्राक्ष, आंबा, चिकू, पिकलेली मोठी केळी

सकाळी नाश्त्यात हे टाळा
पातळे पोळी / पराठा, बेकरी पदार्थ, टोस्ट, ब्रेड, गोड चहा / कॉफी, जूस, साधा पोहे / साधा उपमा,बिस्कीट
हे सर्व पदार्थ साखर झपाट्याने वाढवतात.

डॉ. भाग्येश यांचा PPF Formula” (नाश्त्याचे संतुलन)
P – Protein (प्रोटीन)
P – Plants (भाज्या/फळे)
F – Fat (चांगले फॅट – तूप/नट्स)

उदा. :
अंडे + भाजी + बदाम
दालिया + भाजी + दही
ओट्स + चिया + फळे
चिला + चटणी + फ्लॅक्ससीड
या प्रकारे नाश्ता केल्यास साखर स्थिर रहाते, भूक कमी लागते, वजन कमी होते, थकवा कमी जाणवतो, insulin resistance सुधारतो.

डॉ. भाग्येश स्टाइल – नाश्त्याचे सविस्तर उदाहरण :
Option A (Non-veg)
२ अंड्यांचे मोठे ऑम्लेट
१ छोटा सॅलड बाऊल
४ बदाम
कोमट पाणी + दालचिनी

Option B (Veg)
दालिया उपमा (भरपूर भाज्या)
१ बाऊल दही
½ सफरचंद

Option C (High Protein Veg)
२ मूगडाळ चिला
हिरवी चटणी
१ टीस्पून फ्लॅक्ससीड
½ पेरू

डॉ. भाग्येश यांचे सुवर्ण वाक्य :
“जितकं अनप्रोसेस्ड जेवण, तितकी साखर स्थिर.
जितकं प्रोसेस्ड, तितका मधुमेह बिघडतो.”

आपल्या मधुमेह, बी.पी., थायराइड, इत्यादि जीवनशैलीशी निगडित आजारांची मूळ कारणे आणि त्यावरील नैसर्गिक उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये शामिल व्हा. आमच्या वेबसाइट वर जाऊन मोफत आपला नाव रजिस्टर करा| https://drbhagyeshkulkarni.com/dff-free-webinar-hindi/

नियमित अपडेटसाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा!

DFF प्रोग्रॅम बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट https://drbhagyeshculkarni.com ला भेट द्या  

अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबर वर संपर्क करा.  9511218891

Scroll to Top