उत्तम आरोग्यासाठी मार्गदर्शकाची आवश्यकता
प्रत्येकाला आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या वळणावर मार्गदर्शकाची गरज असते. जर जीवन जगणे ही एक कला आहे, शास्त्र आहे तर तेथे मग गुरु हा असलाच पाहिजे. संत ज्ञानेश्वर माउलींनी देखील गुरुचे महात्म्य त्यांच्या एक अभंगाद्वारे सांगितलेले आहे. ‘गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन। दर्शनी समाधान, आथी जैसे।‘ असे हे गुरु, मार्गदर्शक असतील तर आपला जीवनाचा प्रवास सोपा होतो आणि लवकर इच्छित ध्येय साध्य होते.
गुरू हा आपला मित्र, तत्त्वज्ञ आणि मार्गदर्शक असतो. कामे करताना आपण कितीही अडखळलो तरी एक मार्गदर्शक म्हणून नेहमीच तो आपले प्रयत्न तपासण्यात मदत करतो. गुरूची इच्छा असते की आपण जितके जिंकू इच्छितो त्यापेक्षाही जास्त आपण जिंकावे आणि तो आपल्या मनात त्याप्रकारची पुरेशी ताकद निर्माण करतो की ज्यामुळे आपण कोणतीही लढाई लढण्यासाठी नेहमीच तयार असतो. गुरू ही अशी व्यक्ती असते जी आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवते आणि आपल्याला आपल्या दृष्टीच्या पलीकडे विचार करण्यास मदत करते. आपण जगाला सिद्ध करावे, ‘होय आपण करू शकतो!’ ही भावना, हा विश्वास एक गुरू निर्माण करतो. आपल्यात बदल घडवून आणण्यास मदत करतो जो बदल आपल्याला पुढील स्तरावर अपग्रेड करू शकतो. पण जर आपले हेतू शुद्ध असतील तर आपण निश्चितच आपले ध्येय गाठु तरीही एकट्याने प्रवास केला तर हे अंतर अगणित तासांचे, कठोर परिश्रमाचे असेल आणि आपण आपल्या मुक्कामाला कधी पोहोचू याची शाश्वती नसते. परंतु एक मार्गदर्शक आपल्याला योग्य मार्गावर मार्गदर्शन करतो, आपल्या वेदना समजतो आणि आपल्याला आपल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी प्रेरणा देतो त्यामुळे आपल्या जीवनाचा प्रवास सोपा होतो आणि लवकर इच्छित ध्येय साध्य होऊन प्रवास सोपा होतो.
आपल्याला आपल्या आयुष्यासाठी, व्यवसायासाठी जशी मार्गदर्शकाची गरज असते अगदी तशीच आपल्या आरोग्यासाठीही मार्गदर्शकाची गरज असते. एक डॉक्टर म्हणून माझ्या रुग्णांना पूर्ण आरोग्य समाधान देण्यावर माझा विश्वास आहे. ज्यांना नंतर ‘डायबिटीस फ्री फॉरएव्हर’ असे संबोधले जाते. माझा १० वर्षापेक्षा जास्त या वैद्यकीय क्षेत्रात अनुभव आहे आणि मी एक माईंड ट्रेनर देखील आहे. त्या अनुभवातून मला मोठे परिणाम आणि अनेक गोष्टी अनुभवायला देखील मिळाल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेव्हा माझे रुग्ण पूर्णपणे बरे होतात तेव्हाच मी यशस्वी होतो असे मी मानतो. जर त्यांनी कोणत्याही कारणास्तव तसे केले नाही तर माझ्या मध्ये अस्वस्थतेची भावना निर्माण होते कारण कुठे तरी माझे पण ते अपयश असते. ‘डायबिटीस फ्री फॉरएव्हर’ मध्ये आम्ही डायबिटीस बरे होण्यासाठी आवश्यक ती मदत करतोच पण त्याच सोबत रुग्णांच्या जीवनशैलीशी संबंधित सर्व समस्यांवर उपचार देखील करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमच्याकडून सतत प्रयत्न करून आणि प्रोटोकॉलचे पालन करूनही तुम्ही बरे न झाल्यास आम्ही मनी बँक गॅरंटी देतो. मी आधीच नमूद केले आहे की ही तुमची मानसिकता आहे जी तुम्हाला तुमच्या पुनर्प्राप्ती प्रवासाच्या पहिल्या टप्प्यावर जाण्यास मदत करेल आणि तसेच डीएफएफचे कार्यक्रम, उपचार आणि उपाय, हे सर्व अतिशय खात्रीशीर आहे आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या पुनर्प्राप्ती प्रवासाचे परिणाम नक्कीच दिसतील.
आम्ही ‘डायबिटीस फ्री फॉरएव्हर’ मध्ये आमच्या रुग्णांची काळजी घेतो आणि तसेच ते बरे झाल्यानंतरही आम्ही सतत त्यांच्या संपर्कात असतो. हा काही देणे-घेणे व्यवसाय नाही; आम्ही ‘डायबिटीस फ्री फॉरएव्हर’ एका जवळच्या कुटुंबासारखे आहोत जे सर्व प्रकारच्या जीवनशैलीतील विकारांपासून बरे होण्यावर आणि तसेच १०० वर्षांहून अधिक काळ उत्तम आरोग्याने आनंदाने जगण्यावर विश्वास ठेवतात. जर तुम्हाला जीवनशैलीतील कोणताही विकार असेल, तुम्हाला किंवा तुमच्या प्रियजनांपैकी काहींना डायबिटीस असेल किंवा सतत इतर प्रकारच्या आजारांनी भरलेले आयुष्य तुम्ही आतापर्यंत जगत असाल आणि आता तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांसाठी खात्रीशीर उपाय हवे आहेत ज्यामुळे तुम्ही हे पुस्तक विकत घेतले आहे आणि ते शेवटपर्यंत वाचलेले आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा खात्री देतो की, डायबिटीज फ्री फॉरएव्हर’ मधील मी आणि माझी टीम तुम्हाला डायबिटीस आणि त्याच्याशी संबंधित आजारांपासून पूर्णपणे बरे होईपर्यंत या सर्व गोष्टींमध्ये मदत करण्यासाठी येथे आहोत परंतु प्रथम, तुम्हाला तुमची समस्या काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. मी फक्त तुमच्या आरोग्याबद्दल बोलणार नाही, मी आणि माझी टीम तुम्हाला अशा प्रणालीमध्ये मदत करणार आहे जी तुम्हाला त्या जीवनशैलीतील विकार आणि आजारांपासून मुक्त होण्यास मदत करेल आणि नक्कीच एक चांगल्या मार्गदर्शकाची भूमिका पार पाडेल.
जेव्हा आपल्याला मार्गदर्शक मिळतो, तेव्हा आपल्याला एक योग्य असा मार्ग मिळतो ज्याद्वारे आपण तणावमुक्त प्रवास करू शकतो आणि त्रासमुक्त मागनि आपल्या निश्चित स्थानावर पोहोचू शकतो. याचे कारण असे की आपला गुरू आपल्याला फक्त मार्गदर्शन करत नाही, तर ज्या मार्गाने खूप कमी समस्या येतील असा मार्ग ते आपल्याला दाखवत असतात आणि लवकर आपण यशापर्यंत कसे पोहचु यासाठी ते प्रयत्न करत असतात. आम्ही आमच्या पुस्तकाच्या अगदी सुरुवातीला भगवान कृष्ण आणि अर्जुन यांच्या कथेबद्दल बोललेलो आहोत. मी त्यांचा उल्लेख का केला? कारण अनेक रुग्णांची परिस्थिती रणांगणावरील अर्जुनासारखीच असते परंतु ते भगवान श्रीकृष्णाची मदत घेण्यात अपयशी ठरतात. तसेच आणखी अनेक रुग्णांची स्थिति ही अभिमन्यू सारखी झालेली आहे कारण ते सतत ‘चक्रव्यूहात’ अडकलेले असतात, म्हणजेच एका दुष्टचक्रात अडकलेले असतात. आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की अभिमन्यूला देखील एक गुरू होता, परंतु त्याला अर्धे ज्ञान होते.
आपली देखील ही समस्या आहे. आपल्याला या चक्रव्यूहातुन बाहेर पडायचे असेल तर अर्जुनासारखे जसे भगवान श्रीकृष्ण गुरू होते, तसेच आपल्यालाही त्या त्या क्षेत्रात निष्णात,ज्ञानी गुरू असणे आवश्यक आहे आणि त्यांचे सम्पूर्ण मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. आजकाल आपण पहातो की, अनेक लोक अनेक आरोग्यच्या समस्यांनी हैरान झालेले आहेत त्यामुळे त्यांची जगण्याची आस नष्ट झालेली आहे. या लढाई मध्ये हार न मानता आपल्या उत्तम आरोग्यासाठी आपल्याला पण एका अनुभवी, ज्ञानी अशा गुरुची आवश्यकता असते की जो आपल्याला वेळोवेळी उत्तम आरोग्यासाठी आणि सकारात्मक दृष्टिकोणासाठी मार्गदर्शन करेल. ‘डायबिटीस फ्री फॉरएव्हर’ ही संस्था देखील अनेक लोकांना जीवनशैलींच्या विकारातुन बाहेर पडण्यास मदत करते आणि सकारात्मक दृष्टिकोण प्रदान करुन एका चांगल्या मार्गदर्शकाची भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे हे सांगताना मला विशेष अभिमान वाटतो.
आपल्या मधुमेह, बी.पी., थायराइड, इत्यादि जीवनशैलीशी निगडित आजारांची मूळ कारणे आणि त्यावरील नैसर्गिक उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये शामिल व्हा. आमच्या वेबसाइट वर जाऊन मोफत आपला नाव रजिस्टर करा|
नियमित अपडेटसाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा!
DFF प्रोग्रॅम बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट https://drbhagyeshculkarni.com ला भेट द्या
अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबर वर संपर्क करा. 9511218891