चरबी आणि मधुमेह : आहाराचे सजग समीकरण

आपल्या आहारातून मिळणाऱ्या पोषणतत्त्वांचे शरीरात रूपांतर विविध स्वरूपात होते. कार्बोहायड्रेट्सपासून शरीराला तात्काळ ऊर्जा देणारा ग्लुकोज, प्रथिनांपासून शरीरबांधणीसाठी आवश्यक असलेले ॲमिनो ॲसिड्स, आणि चरबीयुक्त अन्नामधून फॅटी ॲसिड्स तयार होतात. यामध्ये चरबी ही एक महत्त्वाची पण काळजीपूर्वक हाताळण्याची बाब आहे, कारण ती शरीरात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचे परिणाम घडवू शकते.
चरबी दोन प्रकारांची असते:
आहारातील चरबी (Dietary Fat) आणि आंतरउदर चरबी (Visceral Fat):
आहारातील चरबी ही आपण अन्नातून घेतो आणि ती शरीराला ऊर्जा देण्यासाठी, जीवनसत्वांचे (A, D, E, K) शोषण करण्यासाठी उपयुक्त असते. मात्र, ही चरबी जर गरजेपेक्षा अधिक प्रमाणात, विशेषतः चुकीच्या स्वरूपात घेतली गेली, तर ती शरीरात आंतरउदर चरबीच्या स्वरूपात साठते. ही आंतरउदर चरबी विशेषतः पोटाभोवती साठते आणि ती हृदयविकार, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि मधुमेह यासारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देते.
विशेषतः मधुमेहाच्या संदर्भात पाहिल्यास, आंतरउदर चरबी शरीरात इन्सुलिन प्रतिकारक्षमतेत (Insulin Resistance) वाढ घडवून आणते. याचा अर्थ, शरीरात तयार होणारे इन्सुलिन पेशींवर प्रभावीपणे काम करू शकत नाही, आणि त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. हीच प्रक्रिया टाइप 2 मधुमेहाचा मुख्य आधार बनते.
संपृक्त व ट्रान्स फॅट्स – मधुमेहाचे मूक शत्रू:
आपण आपल्या दैनंदिन आहारात जर संपृक्त चरबी (Saturated Fats) आणि ट्रान्स फॅट्स (Trans Fats) अधिक प्रमाणात घेत असू, तर त्याचे दुष्परिणाम निश्चितपणे आरोग्यावर दिसून येतात. या फॅट्सचे स्रोत म्हणजे – लोणी, साजूक तूप, चीज, नारळ तेल, पिझ्झा, फास्ट फूड, बेकरी पदार्थ, डीप फ्राय अन्नपदार्थ आणि प्रक्रिया केलेले तेल. हे अन्नपदार्थ शरीरात वाईट कोलेस्टेरॉल (LDL) आणि ट्रायग्लिसराईड्स वाढवतात, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात, हृदयाचे आजार होतात आणि इन्सुलिनचा परिणामकारकपणा कमी होतो. परिणामी, रक्तातील साखर नियंत्रित राहात नाही आणि मधुमेहाचा धोका वाढतो. शिवाय, ही चरबी पोटाभोवती साठून वजन वाढवते, जे मधुमेहाचा आणखी एक जोखीम घटक ठरतो.
असंपृक्त चरबी – मधुमेहावर नैसर्गिक उपाय:
दुसरीकडे, असंपृक्त चरबी (Unsaturated Fats) आणि ओमेगा 3 व 6 फॅटी ॲसिड्स हे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. हे फॅट्स आपल्याला मोनो-असंपृक्त आणि पॉली-असंपृक्त प्रकारांमध्ये मिळतात. अशा फॅट्सचे मुख्य स्रोत म्हणजे – ऑलिव्ह तेल, शेंगदाणा तेल, अॅवोकाडो, सोया दूध, सुर्यफूल तेल, अक्रोड, फ्लॅक्ससीड्स, तीळ, आणि फिश ऑईल. हे फॅट्स शरीरातील इन्सुलिन सेंसिटिव्हिटी सुधारतात, म्हणजेच शरीर इन्सुलिनला चांगला प्रतिसाद देते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. तसेच, हे चांगले फॅट्स HDL (चांगले कोलेस्टेरॉल) वाढवतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे फॅट्स शरीरातील सूज (inflammation) कमी करतात, जी मधुमेहासोबत येणाऱ्या गुंतागुंतींचे एक प्रमुख कारण असते.
योग्य फॅट्सचे महत्त्व – मधुमेह नियंत्रणासाठी एक सोपी युक्ती:
प्रकार स्रोत फायदे:
मोनो-असंपृक्त फॅट्स- ऑलिव्ह तेल,अॅवोकाडो इन्सुलिन सेंसिटिव्हिटी वाढवतात
पॉली-असंपृक्त फॅट्स – सुर्यफूल तेल, सोया दूध, अक्रोड वाईट कोलेस्टेरॉल कमी करतात
ओमेगा 3 व 6 फॅटी ॲसिड्स – फ्लॅक्ससीड्स, फिश ऑईल, तीळ साखर नियंत्रण हृदयसंवर्धन
हे योग्य फॅट्स केवळ मधुमेहावर परिणाम करत नाहीत, तर शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतात, महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण करतात आणि अन्नाची चवही सुधारतात. मधुमेह हा केवळ गोड खाल्ल्यामुळे होणारा आजार नसून, तो आपल्या आहारशैलीतील असंतुलन, विशेषतः चुकीच्या चरबीच्या सेवनामुळे होतो.
जर आपण आपल्या आहारातून संपृक्त व ट्रान्स फॅट्स दूर ठेवून, असंपृक्त फॅट्स आणि आवश्यक फॅटी ॲसिड्स यांचा समावेश केला, तर आपण केवळ मधुमेहाचे नियंत्रणच नाही, तर संपूर्ण आरोग्य सुधारू शकतो. यासोबतच नियमित व्यायाम, योग्य झोप, तणावाचे व्यवस्थापन आणि नियमित आरोग्य तपासणी हीदेखील मधुमेहावर नियंत्रणासाठी तितकीच महत्त्वाची आहेत.
स्मरण ठेवा: ‘फॅट’ वाईट नाही – चुकीचा फॅट वाईट असतो!
योग्य फॅट्स = संतुलित साखर + मजबूत हृदय + चांगली प्रतिकारशक्ती
म्हणून, मधुमेहासारखा आजार टाळण्यासाठी फक्त साखरेवर नव्हे, तर आपल्या आहारातील चरबीच्या प्रकारावर देखील लक्ष देणे अनिवार्य आहे. योग्य फॅट्सचा विचारपूर्वक आणि मोजका वापर म्हणजेच आरोग्याकडे जाणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
आपल्या मधुमेह, बी.पी., थायराइड, इत्यादि जीवनशैलीशी निगडित आजारांची मूळ कारणे आणि त्यावरील नैसर्गिक उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये शामिल व्हा. आमच्या वेबसाइट वर जाऊन मोफत आपला नाव रजिस्टर करा| https://drbhagyeshkulkarni.com/dff-free-webinar-hindi/
नियमित अपडेटसाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा!
DFF प्रोग्रॅम बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट https://drbhagyeshculkarni.com ला भेट द्या
अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबर वर संपर्क करा. 9511218891