जीवनसत्त्व D : लपलेली शक्ती, उघडलेले सत्य!

आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी अनेक जीवनसत्त्वे आवश्यक असतात, त्यापैकी जीवनसत्त्व D हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि बहुपयोगी जीवनसत्त्व आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सूर्यप्रकाशाचा अभाव, चुकीच्या खाण्याच्या सवयी, आणि बंद वातावरणात जास्त वेळ घालवण्यामुळे जीवनसत्त्व D ची कमतरता ही एक सामान्य समस्या झाली आहे. विशेषतः मधुमेहासारख्या वाढत्या आजारांशी याचा थेट संबंध असल्याने, याबद्दल अधिक जागरूकता आणि योग्य माहिती असणे गरजेचे आहे.
जीवनसत्त्व D हे एक अत्यंत महत्त्वाचे चरबीमध्ये विरघळणारे जीवनसत्त्व आहे, जे शरीरात अनेक मूलभूत कार्यांसाठी आवश्यक असते. याचे दोन मुख्य प्रकार आहेत
1) व्हिटॅमिन D3 – हे प्राणीजन्य अन्नातून मिळते, जसे की फॅटी फिश (विशेषतः फिश लिव्हर ऑइल), अंड्याचे पिवळे बलक इत्यादी.
2) व्हिटॅमिन D2 – हे वनस्पती, मशरूम आणि यीस्टमध्ये आढळते.
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शरीरात जीवनसत्त्व D स्वतःहून तयार होऊ शकते, जेव्हा आपल्या त्वचेवर सूर्यप्रकाशातील UVB किरणांचा संपर्क येतो, तेव्हा त्वचेतील कोलेस्ट्रॉलपासून हे जीवनसत्त्व निर्माण होते. म्हणूनच, सकाळचा सौम्य सूर्यप्रकाश म्हणजे एक नैसर्गिक औषध आहे.
जीवनसत्त्व D चे आरोग्यदायी फायदे:
जीवनसत्त्व D हाडांचे आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक आहे. ते कॅल्शियम आणि फॉस्फरसचे शोषण व्यवस्थित करण्यास मदत करते. त्यामुळे हाडे मजबूत आणि लवचिक राहतात. लहान मुलांमध्ये रिकेट्स आणि वृद्ध व्यक्तींमध्ये ऑस्टिओपोरोसिस टाळण्यासाठी हे आवश्यक आहे. तसेच, हे स्नायूंच्या कार्यक्षमतेसाठी, शरीरातील ऊर्जेच्या पातळीला स्थिर ठेवण्यासाठी आणि इम्युन सिस्टमला बळकट करण्यासाठी मदत करते. त्याशिवाय, हे मेंदूच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त असून, अल्झायमर, स्मृतिभ्रंश, झोपेचे विकार, नैराश्य आणि पार्किन्सन्स सारख्या विकारांपासून संरक्षण करते.
मधुमेह (Diabetes) आणि जीवनसत्त्व D यातील नातं:
जीवनसत्त्व D चा आपल्या शरीरातील इन्सुलिन उत्पादन आणि इन्सुलिनच्या कार्यक्षमतेशी थेट संबंध आहे. हे जीवनसत्त्व अग्न्याशयातील बीटा पेशींना (Beta Cells) इन्सुलिन तयार करण्यात मदत करते. जेव्हा शरीरात जीवनसत्त्व D ची कमतरता होते, तेव्हा हे पेशी इन्सुलिन योग्य प्रमाणात तयार करू शकत नाहीत. शिवाय, जीवनसत्त्व D ची कमतरता झाल्यास शरीराची इन्सुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमता म्हणजेच इन्सुलिन रेसिस्टन्स वाढते.
यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे कठीण होते आणि टाईप 2 मधुमेहाचा धोका वाढतो. अनेक संशोधनांनी दाखवले आहे की, जीवनसत्त्व D चे योग्य प्रमाण मधुमेह टाळण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते. मधुमेही व्यक्तींमध्ये बऱ्याचदा थकवा, स्नायू दुखी, हाडदुखी, झोपेचा अभाव आणि मानसिक अस्वस्थता दिसते – जे सर्व जीवनसत्त्व D च्या कमतरतेशी संबंधित असू शकतात. त्यामुळे, मधुमेह असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या व्हिटॅमिन D पातळीवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
जीवनसत्त्व D ची कमतरता झाल्यास होणारे दुष्परिणाम:
• जीवनसत्त्व D च्या अभावामुळे शरीरात अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात. यामध्ये समाविष्ट आहेत:
• सततचा थकवा व अशक्तपणा
• नैराश्य, झोपेचे विकार
• केसगळती
• हाडे व सांधेदुखी
• स्नायूंची वेदना आणि कमकुवतपणा
• पाठीचा व गुडघ्याचा त्रास
• त्वचा कोरडी होणे आणि अधिक घाम येणे
• अपचन व पचनसंस्थेचे विकार
• मधुमेहाचा वाढता धोका
• हृदयविकार, मेंदू विकार, कर्करोग आणि वारंवार सर्दी-खोकला यामध्ये समाविष्ट आहेत
जीवनसत्त्व D कसे वाढवावे?
सकाळी ३० मिनिटे सूर्यप्रकाशात बसणे, आठवड्यातून किमान ४ वेळा हे सर्वात नैसर्गिक आणि सोपे उपाय आहे. आठवड्यातून दोन वेळा, संपूर्ण शरीराला तीळ तेलाने मालिश करून, त्यानंतर सूर्यप्रकाशात ३० मिनिटे बसल्यास त्वचेतील जीवनसत्त्व D चे शोषण अधिक प्रभावी होते.
जीवनसत्त्व D चे स्रोत:
आपल्या आहारात खालील अन्नघटक समाविष्ट करून जीवनसत्त्व D मिळवता येते:
• फोर्टिफाईड (Vitamin D added) सोया दूध
• मशरूम
• फोर्टिफाईड ब्रेकफास्ट सीरिअल्स
• फोर्टिफाईड बदाम दूध
• फोर्टिफाईड राईस दूध
• संत्री, केळी यांसारखी फळे
अशा प्रकारे, जीवनसत्त्व D केवळ हाडांच्या आरोग्यापुरते मर्यादित न राहता, मधुमेहासारख्या गंभीर आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कार्यांसाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे जीवनसत्त्व D ची नियमित तपासणी, पुरेशी सूर्यप्रकाशातील सान्निध्यता, आणि योग्य आहार यावर लक्ष देणे ही काळाची गरज आहे. योग्य जीवनशैलीच्या माध्यमातून आपण केवळ मधुमेहच नव्हे, तर अनेक आरोग्य समस्यांपासून स्वतःचे संरक्षण करू शकतो. निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणजे ‘पुरेसे जीवनसत्त्व D आणि सजग आरोग्याची जाणीव!’
आपल्या मधुमेह, बी.पी., थायराइड, इत्यादि जीवनशैलीशी निगडित आजारांची मूळ कारणे आणि त्यावरील नैसर्गिक उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये शामिल व्हा. आमच्या वेबसाइट वर जाऊन मोफत आपला नाव रजिस्टर करा| https://drbhagyeshkulkarni.com/dff-free-webinar-hindi/
नियमित अपडेटसाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा!
DFF प्रोग्रॅम बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट https://drbhagyeshculkarni.com ला भेट द्या
अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबर वर संपर्क करा. 9511218891