fbpx

मधुमेहा संबंधित समज गैरसमज

Blog image 04 04 |

दिवसेंदिवस मधुमेहाचे प्रमाण हे वाढत आहे. भारतातील सुमारे 77 दशलक्ष लोकांना मधुमेह आहे म्हणजेच हा आजार हा खूप सामान्य झाला आहे तरीही अनेकांना या बद्दल गांभीर्य दिसत नाही. बर्याच मधुमेहींना देखील याबद्दल जागरूकता दिसत नाही. रुग्ण जेव्हा कोणताही उपचार घेतात तेव्हा त्यांच्या मनात आधीपासून असलेले गैरसमज आणि चुकीच्या कल्पना काढून टाकणे हे खरं तर आव्हान असते परंतु जर नवा मार्ग शोधायचा असेल सकारात्मक उपचार करायचे असतील तर मार्गातील अडथळे हे मागे सोडावे लागतात. आणि खरं तर रुग्णांच्या डायबिटीस मुक्त होण्यात सर्वात मोठा अडथळा म्हणजे आधीपासून असलेले गैरसमज आणि चुकीच्या कल्पना असतात. मधुमेह प्रतिबंधासाठी नावीण्यपूर्ण उपचारांची कास धरण्याची आणि सत्य स्वीकार करण्याची मानसिकता असणे आवश्यक आहे. मधुमेहाचे खूप सारे गैरसमज आहेत आणि जोपर्यंत हे गैरसमज आपण दूर करत नाही तोपर्यंत मधुमेहमुक्तीची दिशा आपल्याला सापडणार नाही. मधुमेहाशी निगडित प्रमुख चार गैरसमज आहेत त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत.

गैरसमज १ – मधुमेह हा अनुवांशिक असतो
मी जेव्हा जेव्हा रुग्णांना भेटतो तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया असते की, मधुमेह हा त्यांच्या कुटुंबामध्ये अनुवांशिक आहे. डायबेटोलॉजिस्ट देखील सर्वप्रथम त्यांच्या रूग्णांना मधुमेहाचे निदान किती दिवस झाले आणि त्यांच्या कुटुंबातील किती सदस्यांना मधुमेह आहे किंवा होता याबद्दल विचारणा करतात. पण माझे असे ठाम मत आहे की, तुमचा मधुमेह १००% तुमच्या अनुवांशिकतेतून उद्भवत नाही. तुमच्या कुटुंबातील काही सदस्यांना मधुमेह आहे किंवा होता याचा अर्थ असा नाही की तुम्हालाही मधुमेह होईल.


पुरावा:- चला आत्मपरीक्षण करू आणि तुमच्या बालपणाकडे परत जाऊ. जर तुम्ही तुमच्या आजी-आजोबांचा विचार केला तर त्यांच्या आजूबाजूला किती लोकांना मधुमेह झाला असेल याचा विचार करा. ते तुम्हाला सांगतील की अगदी कधी तरीच त्यांच्या जवळच्या व्यक्तीला मधुमेह झाल्याची बातमी यायची. त्या वेळी संपूर्ण गावात किंवा शहरात १०-१२ लोकांनाच मधुमेह होता. कोणतीही गोष्ट बदलण्यासाठी किमान १००० वर्षे लागतात. १०० वर्षांच्या कालावधीत किंवा फक्त ३-४ दशकांमध्ये, जीन्स बदलत नाहीत. म्हणजेच अनुवांशिक सिद्धांत घ्या, त्यात हे सर्व सिद्ध झाले आहे की, आपल्या DNA स्ट्रक्चर बदलण्यासाठी किमान १००० ते ५००० वर्षे लागतील. म्हणून तुम्ही तुमच्या DNA ला दोष देणे थांबवलं पाहिजे कारण मधुमेह DNA मध्ये नसून तुमच्या वातावरणाचा प्रभाव असलेला मधुमेह आहे. चुकीची जीवनशैली, संतुलित आहाराकडे दुर्लक्ष, वाढते वजन, बैठी कामे करण्याची पद्धत, लठठपणा अशी विविध कारणे त्यामागे असतात. त्यामुळे फक्त जेनेटिक या कारणाला दोष न देता इतर कारणे पण लक्ष्यात घेतली पाहिजे.

गैरसमज 2 – वाढलेली साखरेची पातळी नेहमीच मधुमेह असते
हे समजून घेणे खूप महत्वाचे आहे की, जेव्हा कधी तुमची साखर पातळी वाढते, तेव्हा तो नेहमीच मधुमेह असतो असे नाही. असे अनेक वेळा घडते कारण माझ्याकडे येणारे रुग्ण मला सतत सांगतात की त्यांची साखर पातळी वाढली आहे. गमतीने मी त्यांना एक प्रश्न विचारतो की, माझ्याकडे एक औषध आहे ज्यामुळे तुमची साखरेची पातळी शून्य होईल. तुम्हाला ते करून पहायचे आहे का? आणि मग रुग्ण हसतात आणि मला सांगतात की जर ते शून्यावर पोहोचले तर ते वाचणार नाहीत. जसे काही प्रमाणात रक्तदाब, आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहे. अगदी तसेच काही प्रमाणात साखर असणे हे देखील गरजेचे असते. जर कोणतीही गोष्ट तुमच्या शरीरात अस्थिर मर्यादेत वाढत असेल तर ती तुमच्यासाठी हानिकारक असते. साखरेची समस्या हे लक्षण नसून त्याचा परिणाम आहे. साखरेच्या समस्येमुळे आपल्या शरीरात गुंतागुंत वाढते आणि त्या गुंतागुंतीमुळे रुग्णांचा मृत्यू होतो. केवळ साखर समस्या हे मृत्यूचे मूळ कारण नसून त्या साखरेच्या समस्येतून निर्माण होणाऱ्या त्या गुंतागुंतीच्या समस्या आहेत. वाढलेली साखर, म्हणजे जसे आपण साखरेची समस्या म्हणत आहोत, त्यामुळे आपले रक्त घट्ट होते आणि रक्तवाहिन्यांची लवचिकता बाधित होते आणि आपल्या महत्वाच्या अवयवांना पुरेसे रक्त मिळत नाही ज्यामुळे अवयव निकामी होतात. अनेकांचा असा समज आहे की, मधुमेह हा गंभीर आजार नाही. परंतु वस्तुस्थिती: अशी आहे की, मधुमेह ही एक प्रकारची वाढती महामारी आहे ज्याचा आपल्या देशाला विनाशकारी असा शारीरिक, भावनिक आणि आर्थिक फटका बसत आहे. एड्स आणि कर्करोगापेक्षा मधुमेहामुळे दरवर्षी अधिक लोकांचा बळी जात असताना दिसत आहे.

गैरसमज ३ – मधुमेह हा असाध्य आहे.
तुम्हाला जर मुंबई ला प्रवास करायचा आहे, मग तुम्ही एखाद्या दिवशी मुंबईला पोहचाल या आशेने बंगळुरूच्या ट्रेनमध्ये बसलात, तर तुम्ही मुंबईला कसे पोहोचाल? तुम्हाला तुमची ट्रेन बदलावी लागेल; कारण मुंबईला जाण्यासाठी तुम्हाला मुंबईचीच ट्रेन पकडावी लागेल. लोक फक्त त्यांच्या साखरेची समस्या कमी करण्याचा विचार करतात, परंतु त्यांना त्यांच्या सवयींचा शोध घ्यायचा नसतो ज्यामुळे त्यांच्या समस्या वाढत आहेत. मधुमेहापासून मुक्ती हवी आहे तर त्याचा अर्थ औषधांची लांबलचक यादी घेणे नव्हे. १०,००० पेक्षा अधिक रूग्णांना मधुमेह मुक्त होण्यास मदत केल्यानंतर, आम्हाला ‘डायबिटीस फ्री फॉरएव्हर’ ला लक्षात आले की जर एखाद्याने त्यांच्या मधुमेहाच्या मूळ कारणांवर कार्य केले आणि योग्य ते बदल केले तर नक्कीच मधुमेहावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

गैरसमज ४ – शुगर फ्री टॅब्लेट किंवा ग्रीन शुगर सेवन केल्याने ‘आपली साखर नियंत्रित’ होईल.
तिखट भाजी खाल्ली तरीही ती शुगरच होईल कारण ग्लुकोज आपल्या शरीराला जगण्यासाठी आवश्यक आहे. तुम्ही जे काही खाता ते ग्लुकोजमध्ये बदलते त्यामुळे तुम्हाला धक्का बसू शकतो कारण ती तिखट भाजी देखील “तुमची साखर वाढवते!” (साखर ही ‘समस्या नाही) कारण जेव्हा ती ग्लुकोज बनते तेव्हा ती तुमच्या शरीरातील एन्झाइम्सद्वारे खंडित होते.
मुख्य दोषी म्हणजेच ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’ (विशेषतः ९५% लोकांबद्दल, ज्यांना टाइप २ मधुमेह आहे). आपले शरीर इन्सुलिनला जितके जास्त प्रतिरोधक असेल तितकेच आपले शरीर मधुमेह प्राप्त करेल आणि त्यामुळे आपल्या उपचारांचे ध्येय साखर कमी करणे नसून इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करणे हे असले पाहिजे म्हणून फक्त गोड पदार्थांच्या सेवनाने मधुमेह होतो हा गैरसमज काढून टाकणे गरजेचे आहे तरीही गोड पदार्थांचे सेवन कमी करावे कारण त्यामुळे वजन वाढू शकते आणि मधुमेह होण्याचा धोका वाढतो.
त्यामुळे मधुमेह होण्यामागील इतर कारणांचा देखील शोध घेणे तितकेच गरजेचे असते.

आपल्या मधुमेह, बी.पी., थायराइड, इत्यादि जीवनशैलीशी निगडित आजारांची मूळ कारणे आणि त्यावरील नैसर्गिक उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये शामिल व्हा. आमच्या वेबसाइट वर जाऊन मोफत आपला नाव रजिस्टर करा|👉🏼 https://drbhagyeshkulkarni.com/dff-free-webinar-hindi/

नियमित अपडेटसाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा!

DFF प्रोग्रॅम बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट https://drbhagyeshculkarni.com ला भेट द्या  

अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबर वर संपर्क करा.  9511218891

Open chat
1
We are available
Hello! How can i help you?