शिक्षण, संशोधन आणि समाजसेवा: माझ्या करिअरचा मार्ग

माझे बालपण महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एका छोट्या गावात गेले त्याच सोबत माझं प्राथमिक शिक्षण सरकारी शाळेत झाले. माझे आईवडील माझ्या गावातील नामांकित डॉक्टर होते. लहानपणापासूनच माझ्यावर त्यांच्या प्रगल्भ विचारधारेचा, कामाच्या प्रामाणिकतेचा आणि कुटुंबाच्या जडणघडणीचा मोठा प्रभाव होता. ते प्रसिद्ध डॉक्टर असल्याने प्रत्येकजण त्यांचा आदर करत असे. त्यामुळे माझ्या मित्रांसोबत खेळताना किंवा भेटताना, मला नेहमीच असं म्हटलं जायचं की “तु खूप भाग्यवान आहेस तुझे कुटुंब खूप छान आहे, त्यामुळे तु हवं ते साध्य करू शकतोस .”काही मित्रांनुसार, मी “चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेलो होतो. त्यांचे असे म्हणणे होते कि मला असे पालक मिळाले म्हणून मी खूप नशीबवान आहे. आणि हो ते तितकच खरं देखील आहे. माझे आई-वडील माझे गुरू आहेत. लहानपणी मी त्यांच्याकडून जे काही शिकलो ते मला शब्दात मांडता येणार नाही परंतु माझ्या आईवडिलांची शिक्षण आणि संशोधनातील रुची मला अनमोल शिकवण देत गेली. माझ्या जीवनातील मूलभूत मूल्ये आणि कार्यपद्धती हे सर्व त्यांच्याच शिकवणीतून आले. माझ्या आईवडिलांचा प्रामाणिकपणा आणि त्यांची कार्यक्षमता नेहमीच मला प्रेरणा देत राहिली. दोघेही जनरल फिजिशियन होते आणि त्यांची गावातच प्रॅक्टिस चालू होती. आपल्या गावातून बाहेर जाऊन दुसऱ्या ठिकाणी जाण्यापेक्षा, गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यांचं कल्याण करणं आणि त्यांची सेवा करणे यालाच त्यांनी महत्त्व दिलं. माझ्या आईवडिलांचा विश्वास होता की, हे त्यांच्या जीवनाचं कर्तव्य आहे, ज्यासाठी देवाने त्यांना निवडलं आहे. हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांनी मला देखील डॉक्टर बनवले.
परंतु नियतीला काही वेगळे अभिप्रेत असावे,जेव्हा मी मेडिकल कॉलेजमधून बाहेर आलो, तेव्हा माझ्यावर मोठा दबाव होता – माझ्या पालकांनी स्थापन केलेल्या क्लिनिकमध्ये सामील होऊन त्याची जबाबदारी स्वीकारावी. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना विश्वास होता की माझ्या मदतीने त्यांचा प्रवास पुढे चालू राहील आणि मी त्यांनी स्थापन केलेल्या दवाखान्याची जबाबदारी सांभाळावी ज्यामध्ये दररोज १०० रुग्णांवर उपचार केले जात होते. त्यांचा प्रवास पुढे चालू ठेवण्यासाठी त्यांनी माझी निवड केली होती परंतु वास्तव काहीसे वेगळे होते कारण माझे स्वप्न काही वेगळे होते. मला स्वतःची फार्मास्युटिकल (औषध) कंपनी सुरू करायची होती. माझ्या मते, डॉक्टरांचं मुख्य कार्य औषध लिहून देणे हे असले तरी, औषधांचा सखोल अभ्यास करून जगभरात वापरता येणारी औषधे तयार करणे हे माझं मोठं ध्येय होतं. माझी उत्सुकता मला रात्री झोपू देत नव्हती. मी तासन्तास ऑनलाइन संशोधन करायचो. काही महिन्यांच्या कठोर प्रयत्नांनंतर मला हे समजले की औषध शास्त्र शिकण्यासाठी अमेरिकेतील कॉलेज हे सर्वोत्तम संधी आहे. मी जीआरई (ग्रॅज्युएट रिकॉर्ड एक्सामिनेशन) दिला आणि अमेरिकेतील एका नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी तयारी केली. मी पूर्णपणे ठरवलं की, औषधांबाबत योग्य शिक्षण घेऊन, स्वतःची फार्मास्युटिकल कंपनी सुरू करण्यास मदत होईल. परंतु आयुष्यात अनेक स्वप्ने असतात आणि काही वेळा काही गोष्टींना मागे ठेवावे लागते. माझ्या या महत्त्वाकांक्षी ध्येयाला एक अडथळा आला. यूएसए कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी एक पात्र वैद्यकीय व्यावसायिक असणे आवश्यक होते. मी प्रमाणित डॉक्टर होतो, परंतु माझा वैद्यकीय अनुभव मात्र शून्य होता. माझ्याकडे फक्त पुस्तकी ज्ञान होते आणि मी प्रत्यक्ष रुग्णावर उपचार केलेले नव्हते. मी कधीच कोणत्याही रुग्णालयात काम केले नव्हते किंवा रुग्णांच्या उपचारांत वेळ घालवलेला नव्हता, त्यामुळे मला व्यावहारिक संशोधनाचा अनुभव आवश्यक होता आणि ते मी त्या वेळी मिळवू शकत नव्हतो.
नंतर मी हिंदुजा हॉस्पिटल, मुंबई येथील संशोधन विभागात काम सुरू केले. त्या वेळचे संशोधन विभागाचे प्रमुख, डॉ. बी. आर. जोशी, हे ७८ वर्षांचे होते आणि त्यांना या संस्थेत ३३ वर्षांचा अनुभव होता. त्यांच्यासोबत रुग्णांशी व्यवहार करताना मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, त्यांनीच मला डायबिटीसवर संशोधन करण्यासाठी प्रेरित केले आणि मी डायबिटीवरील अनेक आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेदिक पुस्तके वाचली परंतु, ज्या पुस्तकांनी माझे जीवन बदलून टाकले, त्यात डॉ. नील बर्नार्ड, डॉ. गैब्रिएल कॉन्सेन्स, डॉ. मॅकडोवेल, डॉ. कॉलिन कॅम्पबेल आणि “चायना स्टडी” हे लेखक डॉ. जेसन फुंग यांनी लिहिले होते. हे डॉक्टर्स २००९ ते २०१२ दरम्यान १००० पेक्षा अधिक रुग्णांवर डायबिटीस टाइप १ आणि टाइप २ चे उपचार करत आहेत. त्यांच्या कामाने मला खूप प्रेरणा दिली आणि मी प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी आणि डायबेटोलॉजी मध्ये डिप्लोमा पूर्ण केला. मी प्रत्यक्ष अनुभव मिळवण्यासाठी २ ते ३ फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये काम केले. डायबिटीसवर उपचार करण्याची प्रक्रिया शोधण्याची माझी उत्सुकता वाढली आणि लोकांचे जीवन वाचवण्यास मदत करू शकेल अशी उपचार पद्धती जाणून घेण्यासाठी मी खूप उत्साही विद्यार्थी बनलो. हा खरं तर माझ्या करिअरचा टर्निंग पॉइंट होता.
आज मी एक डायबिटीस फ्री फॉरेवर संस्था चालवत आहे जी डायबिटीस रुग्णांना या जुनाट आजारातून मुक्त होण्यास मदत करते तसेच महाराष्ट्रातील अनेक जिल्हयांमध्ये माझी संस्था कार्यरत आहे आणि त्यात माझे गाव देखील समाविष्ट आहे. आज हजारो लोकांना आम्ही या डायबिटीस सारख्या जुनाट आजारांवर मात करण्यास मदत केली आहे आणि मी आजही कधीच माझे शिक्षण थांबवलं नाही. मी नियमितपणे अभ्यास करत राहिलो आणि मी माझा पदव्युत्तर डिप्लोमा इन क्लिनिकल रिसर्च पूर्ण केला. त्याचबरोबर, मी एक प्रमाणित योग प्रशिक्षक असून, NLP (न्यूरो-लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग) प्रशिक्षण घेतले आहे आणि NLP प्रॅक्टिशनर प्रमाणपत्र देखील मिळवले आहे. वैकल्पिक औषधोपचारांमध्ये मी प्रभुत्व मिळवले आहे आणि अलीकडेच मी प्रमाणित माइंड ट्रेनर म्हणूनही पात्र ठरलो आहे.
आपल्या मधुमेह, बी.पी., थायराइड, इत्यादि जीवनशैलीशी निगडित आजारांची मूळ कारणे आणि त्यावरील नैसर्गिक उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये शामिल व्हा. आमच्या वेबसाइट वर जाऊन मोफत आपला नाव रजिस्टर करा|
नियमित अपडेटसाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा!
DFF प्रोग्रॅम बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट https://drbhagyeshculkarni.com ला भेट द्या
अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबर वर संपर्क करा. 9511218891