जगणं नव्याने – मन, शरीर आणि आत्म्याचा समतोल साधणारा प्रवास

Al-New beginning mind-body soul

आजच्या घाईगडबडीत अनेक लोक वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त आहेत. यामागचं एक मुख्य कारण म्हणजे त्यांच्या खाण्याच्या सवयी. भरपूर लोकांना माहिती असतं की बाहेरचं, तेलकट, तळलेलं खाणं आरोग्यासाठी अपायकारक आहे. पण तरीही ते हे खाणं टाळू शकत नाहीत. हे केवळ खाण्याबद्दल नाही, तर त्यांच्या मानसिकतेबद्दल आहे. काही लोक सतत म्हणतात की ते आरोग्य सुधारायचं ठरवत आहेत, पण त्यांच्या कृतीत त्याचा मागमूसही नसतो. त्यांच्या जीवनशैलीवर त्यांच्या आजूबाजूच्या लोकांचाही मोठा प्रभाव असतो. जसं, “थोडंसं खाल्लं तर काही बिघडत नाही,” असं म्हणणारे मित्र किंवा नातेवाईक हे लोक नकळत चुकीचे निर्णय घेण्यास भाग पाडतात.

दुसरीकडे, काही लोक असे असतात जे एकदा ठरवलं की आरोग्यदायी खाणं सुरू करायचं, तर ते त्यावर ठाम राहतात. त्यांना कोणी काही जंक फूड देऊ केलं, तरी ते नम्रपणे नकार देतात. कारण त्यांचं ध्येय स्पष्ट असतं ते म्हणजे निरोगी आयुष्य. पण असेही लोक असतात जे अजून ठाम निर्णय घेऊ शकलेले नसतात. अशा लोकांना कुणी काही दिलं की ते लगेचच “एकदा खाल्लं तर काय होतं?” असं म्हणून जंक फूडकडे वळतात. मग ते रोजचं होऊन जातं आणि आरोग्य हळूहळू बिघडत जातं. जे खरोखर आरोग्यदायी जीवन जगतात, ते दररोज ताजं, नैसर्गिक आणि संतुलित अन्न खातात. ते फक्त खाण्यावर लक्ष देत नाहीत, तर ती त्यांची जीवनशैली बनलेली असते.

आता खर्च करा आणि उद्या वाचवा :
 ही केवळ म्हण नाही, तर जीवनशैलीबद्दलचा एक गंभीर विचार आहे. निरोगी राहण्यासाठी फक्त व्यायाम किंवा औषधोपचार पुरेसे नाहीत, तर महत्त्वाची गरज असते ती जाणीवपूर्वक निवडीची, विशेषतः आहाराच्या बाबतीत. आज बाजारात सहज मिळणारे स्वस्त अन्न चविष्ट वाटते, पण तेच अन्न भविष्यात आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण करू शकते. याउलट, शुद्ध, पोषक आणि संतुलित अन्न किंचित महाग असले तरी तेच तुम्हाला दीर्घकाळ निरोगी ठेवते. म्हणूनच आता थोडा अधिक खर्च करा, पण उद्याच्या हॉस्पिटलच्या बिलांपासून स्वत:ला वाचवा. डायबेटिक रिव्हर्सल ही एक प्रक्रिया आहे जी तुम्हाला तुमच्या शरीराला सुरुवातीस अस्वस्थता देते कारण ती आपल्या नेहमीच्या जीवनशैलीत बदल घडवून आणते.

परंतु सातव्या दिवसापासून किंवा फारतर तीन आठवड्यांच्या आतच शरीर नवीन दिनचर्येशी जुळवून घेतं. एकदा तुम्ही संपूर्ण प्रक्रियेला आत्मसात केलं, की तुमच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनातच आमूलाग्र बदल घडतो. निरोगी जीवनशैली ही एक वेळची कृती नसून, ती एक सतत शिकण्याची आणि स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याची प्रक्रिया आहे. अस्वस्थ वृत्तीला निरोगी वृत्तीत बदलण्यासाठी केवळ शरीराची नव्हे, तर मानसिकतेची तयारीही गरजेची आहे. ज्ञान मिळवणे हे केवळ सुरुवात आहे ते ज्ञान तुमच्या दैनंदिन जीवनात उतरवणे, त्यावर कृती करणे आणि ते सवयींमध्ये रूपांतरित करणे हेच खरे आरोग्याचे सूत्र आहे. एकदा या सवयी अंगीकारल्या की, आरोग्य हा तुमच्या आयुष्यातील सर्वोच्च प्राधान्याचा विषय बनतो.

जेव्हा तुमच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडतात, तेव्हा ते केवळ तुमच्यासाठीच मर्यादित राहत नाहीत तर ते इतरांनाही प्रेरणा देतात. म्हणूनच, तुमची ही बदललेली वृत्ती सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर शेअर करा. स्वतःला मदत करा आणि तुमच्या उदाहरणातून इतरांनाही मदत होईल. तुमचं एक छोटंसं पाऊल समाजात मोठ्या परिवर्तनाची सुरुवात करू शकतं. जेव्हा आपण एकत्र प्रयत्न करतो, तेव्हा आपण एक सशक्त, आरोग्यदायी आणि सकारात्मक जग घडवू शकतो. पण लक्षात ठेवा जर तुम्ही स्वतःत बदल घडवला नाही, तर तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमतेने जगूच शकणार नाही. १००% जगा, म्हणजे मनापासून, शरीराने आणि आत्म्याने!

बाह्य जग विरुद्ध आंतरिक जग :
“लोक काय म्हणतील?” या भीतीच्या फंदात पडू नका. भौतिक जग आपल्याला एक तात्पुरती ओळख देईल, पण आंतरिक जग मनाची शांती, आत्मविश्वास आणि आरोग्य देईल आणि हेच आपलं खरं सामर्थ्य आहे. तुमच्या दैनंदिन आयुष्याला एक शिस्तबद्ध आणि सुसंगत दिशा देण्यासाठी एक मार्गदर्शक किंवा ट्रेनर नियुक्त करा. तो तुम्हाला निरीक्षण, प्रेरणा आणि मार्गदर्शन देईल. दैनंदिन विधींना काटेकोरपणे पाळा, ती तुमची स्वतःशी असलेली बांधिलकी दर्शवतात. आरोग्यदायी जीवनशैली ही केवळ स्वतःपुरती मर्यादित नसते तर ती आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी असते. आज केलेली मेहनत, त्याग, आणि बदल ही आपल्या प्रियजनांसाठी मोठं सुरक्षित भविष्य तयार करतात.

अल्पकालीन उद्दिष्टे – यशाची पहिली पायरी :
लांबचा प्रवास लहान पावलांनीच सुरू होतो.सुरुवातीला फक्त ७ दिवस, एवढाच विचार करा. या सात दिवसांत तुमचं लक्ष फक्त एका गोष्टीवर असावं: आज अधिक चांगलं जगणं.

एक सकारात्मक दिनचर्या
आपला प्रत्येक दिवस आनंदात जावा यासाठी, जीवनात विविध आरोग्यदायी आणि मनाला सुखावणाऱ्या सवयींचं मिश्रण करा. स्वतःची सॅलड तयार करा, व्यायाम करताना आवडतं संगीत ऐका, मित्रांसोबत आरोग्यदायी गोष्टी शेअर करा, नवीन हेल्दी रेसिपीज ट्राय करा, मेडिटेशन आणि श्वसन तंत्र वापरातुमच्या दृष्टीकोनात बदल घडवा आणि उज्वल भविष्य घडवा
.
भूतकाळ मागे सोडा, भविष्य घडवा : 
तुम्ही आज जे निर्णय घेता, तेच उद्याचं तुमचं आयुष्य ठरवतात. नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला आधी भूतकाळातील अनुभव, सवयी आणि मानसिकतेपासून मुक्त व्हावं लागेल. बरेच लोक बदलायला तयार नसतात. ते जुन्या सवयींना, विचारांना आणि आठवणींना चिकटून राहतात. परंतु फक्त काही निवडक लोकच नव्या जीवनाचं स्वागत करतात, शिकतात, समजून घेतात आणि स्वतःचा पुनर्जन्म करतात. प्रत्येक माणसाची मानसिकता वेगळी असते, पण त्या मानसिकतेतील अडथळे विशेषतः दुःखद आठवणी आपल्याला सध्या जगण्यात अडथळा निर्माण करतात. वाईट सवयींना चिकटून राहणं म्हणजे स्वतःच्या पुनर्जन्मावर बंदी घालणं.

जर तुम्हाला निरोगी, आनंदी आणि यशस्वी जीवन जगायचं असेल, तर तुम्हाला स्वतःला पुन्हा घडवायचं आहे आणि त्यासाठी आवश्यक असते योग्य कृती, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि बदल स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे. बहुतेक लोक त्यांच्या सवयी बदलत नाहीत कारण त्यांना वाटतं की ते जे जगत आहेत तेच सर्वोत्तम आहे. पण जेव्हा त्यांच्या शरीरात वेगळी लक्षणं दिसू लागतात जसे की थकवा, आजारपण, मानसिक अस्वस्थता तेव्हाच त्यांना जाग येते. ते मनाने भावनिक असले तरी त्यांच्या वाईट सवयी, विलंब, नकारात्मक विचार, आळस हे त्यांना मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या खालच्या पातळीवर नेतात हे सगळं एका ‘जगण्यातल्या नरकासारख्या’ अवस्थेत बदलतं.

आनंदातून निरोगी होण्याची प्रक्रिया ही एक आनंदी, सकारात्मक आणि आंतरिक समाधानाची वाटचाल आहे. पण या मार्गावर चालताना एक महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे लोक काय म्हणतील? या विचाराला शेवटचा निरोप देणं. तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा. तुमच्या दैनंदिन दिनचर्येतून समाधान मिळवा. तुमचं मानसिक वय तुमच्या शारीरिक वयाच्या निम्मं आहे, हे लक्षात ठेवा. उदाहरणार्थ, जर तुम्ही ५० वर्षांचे असाल, तर तुमचं मानसिक वय २५ असेल. दर पाच वर्षांनी ते १ वर्षाने वाढेल. म्हणून जरी तुमचं शारीरिक वय १०० असलं, तरी मानसिक वय फक्त ४० असावं तेवढंच निष्पाप, जिज्ञासू आणि उत्साही! तुमच्यातल्या मुलाला कधीही मरू देऊ नका. बाळसदृश मन म्हणजे नितळ मन जिथे कोणताही राग नाही, कुठलाही द्वेष नाही आणि तेच मन हवयं, जे सहज माफ करतं, सतत शिकतं आणि नेहमी आनंदात राहतं. तुमचं मन उत्साही ठेवण्यासाठी काही क्रीडा क्रियाकलापांमध्ये भाग घ्या. खेळ आपल्याला स्पर्धात्मक ठेवतात, मित्र जोडतात, शरीर सक्रिय ठेवतात आणि मन प्रसन्न करतं. एक लहान मूल जसं खेळताना सर्व काही विसरतं तसंच आपल्यालाही मनापासून खेळायला आणि जगायला शिकवा.
आजपासून स्वतःला एक वचन द्या – बदल घडवण्याचं, पुन्हा जन्म घेण्याचं म्हणजेच नव्यानं अर्थपूर्ण आनंदी निरोगी जगण्याचं.

आपल्या मधुमेह, बी.पी., थायराइड, इत्यादि जीवनशैलीशी निगडित आजारांची मूळ कारणे आणि त्यावरील नैसर्गिक उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये शामिल व्हा. आमच्या वेबसाइट वर जाऊन मोफत आपला नाव रजिस्टर करा|👉🏼 https://drbhagyeshkulkarni.com/dff-free-webinar-hindi/

नियमित अपडेटसाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा!

DFF प्रोग्रॅम बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट https://drbhagyeshculkarni.com ला भेट द्या  

अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबर वर संपर्क करा.  9511218891