ऊर्जेचा स्त्रोत की आजारांचे कारण? कार्बोहायड्रेट्सचं शास्त्र

Al-Source-of-energy

आपल्या दैनंदिन आहारातील कार्बोहायड्रेट्स हे एक असे पोषणतत्त्व आहे जे एकीकडे शरीराला ऊर्जा पुरवते, तर दुसरीकडे त्याचे अतिरीक्त आणि चुकीचे सेवन अनेक गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकते. त्यामुळे हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं की कार्बोहायड्रेट्स खरोखरच आपल्यासाठी किती आवश्यक आहेत, आणि त्यांचे कोणते प्रकार शरीरासाठी फायदेशीर किंवा हानिकारक ठरू शकतात?हे शरीरातील पेशी, स्नायू आणि मेंदूच्या कार्यासाठी अत्यावश्यक असते.
कार्बोहायड्रेट्स दोन प्रकारचे असतात 

 साधे (Simple) आणि जटिल (Complex):-

साधे कार्बोहायड्रेट्स: हे साखरेवर आधारित असून ते सहज पचतात व शरीराला झपाट्याने ऊर्जा देतात. मात्र, ही ऊर्जा अल्पकालीन असते आणि रक्तातील साखरेची पातळी तात्काळ वाढवते. अशा प्रकारच्या कार्ब्समध्ये बटाटे, मैदा, रवा, ब्रेड, बिस्किट्स, पांढरा तांदूळ, पास्ता आणि विविध पॅकबंद गोड पदार्थांचा समावेश होतो. या अन्नपदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास टाइप 2 डायबेटीस, स्थूलता, PCOD, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढ व हृदयविकार यांसारखे जीवनशैलीजन्य आजार उद्भवू शकतात.

जटिल कार्बोहायड्रेट्स: हे स्टार्च व फायबरवर आधारित असतात. हे शरीरात हळूहळू पचतात, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते व दीर्घकाळ ऊर्जा मिळते. यामध्ये खपली गहू, ब्राउन राईस, डाळी, कडधान्ये व हिरव्या पालेभाज्यांचा समावेश होतो. फायबरमुळे पचनक्रिया सुधारते व पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते. योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्स घेतल्याने झोप सुधारते, मूड सकारात्मक राहतो, स्मरणशक्ती वाढते व शरीराला फायबर मिळते. विशेषतः खेळाडूंना दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा आणि स्टॅमिना मिळतो.

परंतु, आहारातून कार्बोहायड्रेट्स पूर्णतः वगळल्यास थकवा, डोकेदुखी, गरगरणे, हृदयाची धडधड, स्नायूंचे नुकसान आणि हायपोग्लायसेमिया होऊ शकतो. हायपोग्लायसेमिया ही स्थिती शरीरातील ग्लुकागॉन हॉर्मोन कार्यरत न झाल्यामुळे निर्माण होते, जिथे रक्तातील साखरेची पातळी खूप कमी होते. त्यामुळे चक्कर येणे, घाम येणे व अस्वस्थता यांसारखी लक्षणे दिसतात.

म्हणूनच, निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित प्रमाणात व योग्य प्रकारचे कार्बोहायड्रेट्स सेवन करणे आवश्यक आहे. झटपट मिळणाऱ्या चविष्ट पण शरीरासाठी हानिकारक साध्या कार्ब्सपेक्षा नैसर्गिक, कमी प्रक्रिया केलेले, जटिल कार्ब्स निवडणं आरोग्यदृष्ट्या लाभदायक ठरते. आजार टाळण्यासाठी आणि शरीर, मन दोन्ही निरोगी ठेवण्यासाठी ‘कार्बोहायड्रेट्सचे शहाणपणाने सेवन’ ही एक अत्यावश्यक गोष्ट ठरते. कार्बोहायड्रेट्स हे ऊर्जा देणारे असले तरी, अतिरेक किंवा अज्ञानामुळे ते आजारांचे कारण ठरू शकतात. म्हणूनच, संतुलित, नैसर्गिक आणि फायबरयुक्त जटिल कार्बोहायड्रेट्सचा समावेश आपल्या आहारात करून आपण निरोगी शरीर आणि सकारात्मक मनाकडे वाटचाल करूया.”

आपल्या मधुमेह, बी.पी., थायराइड, इत्यादि जीवनशैलीशी निगडित आजारांची मूळ कारणे आणि त्यावरील नैसर्गिक उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये शामिल व्हा. आमच्या वेबसाइट वर जाऊन मोफत आपला नाव रजिस्टर करा|👉🏼 https://drbhagyeshkulkarni.com/dff-free-webinar-hindi/

नियमित अपडेटसाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा!

DFF प्रोग्रॅम बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट https://drbhagyeshculkarni.com ला भेट द्या  

अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबर वर संपर्क करा.  9511218891