विटामिन्स – कार्य आणि स्रोत
“निरोगी शरीर, तेजस्वी त्वचा आणि सुदृढ रोगप्रतिकारशक्ती यासाठी विविध जीवनसत्त्वांची योग्य प्रमाणात गरज असते. आपल्या शरीराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आजारांपासून संरक्षणासाठी जीवनसत्त्वे (Vitamins) खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. ही जीवनसत्त्वे विविध अन्नपदार्थांत नैसर्गिकरीत्या उपलब्ध असतात. अन्नातून मिळणारी ही जीवनसत्त्वे आपल्या शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया सुरळीत चालवण्यासाठी उपयुक्त ठरतात. चला तर मग, पाहूया विविध जीवनसत्त्वे, त्यांचे कार्य आणि स्रोत.”
विटामिन A:
विटामिन A हे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी फारच महत्त्वाचे आहे. रातांधळेपणा टाळण्यासाठी, तसेच त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि हाडे व दातांची योग्य वाढ होण्यासाठी हे आवश्यक असते. विशेषतः लहान मुलांच्या वाढीमध्ये याची महत्त्वाची भूमिका असते.
स्रोत: अंडी, हिरव्या पानांच्या भाज्या (पालक, मेथी), मासे, माशांचे तेल, पिवळ्या रंगाची फळे (जसं की आंबा, पपई) आणि गाजर.
विटामिन B1 (थायामिन):
हे विटामिन शरीरातील कार्बोहायड्रेट्सना ऊर्जा मध्ये रूपांतरित करते. यामुळे पचनक्रिया सुधारते व मज्जासंस्था (नर्व्हस सिस्टम) सुदृढ राहते.
स्रोत: अंडी, डाळी, संत्री, शेंगदाणे, मच्छी आणि राजमा (किडनी बीन्स).
विटामिन B2 (रायबोफ्लेविन):
हे डोळे, त्वचा आणि मज्जातंतूंना (नर्व्ह्स) पोषण देणारे जीवनसत्त्व आहे. यामुळे त्वचा निरोगी राहते आणि थकवा कमी होतो.
स्रोत: गहू, शेंगदाणे, हिरव्या भाज्या, धान्य, अंडी आणि मासे.
विटामिन B3 (नायासिन):
ऊर्जेची निर्मिती आणि पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी हे महत्त्वाचे असते. मानसिक स्वास्थ्यातही याचे योगदान असते.
स्रोत: अवोकाडो, शेंगदाणे, टोमॅटो आणि हिरव्या पानांच्या भाज्या.
विटामिन B5 (पँटोथेनिक अॅसिड):
हे पेशींमध्ये होणाऱ्या चयापचय क्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. त्वचा, केस आणि आतडी यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त.
स्रोत: अवोकाडो, सुर्यफूल बियाणे, ब्रोकोली, आणि दही.
विटामिन B6 (पायरीडॉक्सिन):
हे झोपेचे चक्र नियंत्रित करण्यास, भूक नियंत्रणास, आणि जैविक घड्याळ संतुलित ठेवण्यासाठी मदत करते.
स्रोत: टोफू, केळी, डाळी, शेंगदाणे, मच्छी, टोमॅटो आणि पालक.
विटामिन B7 (बायोटिन):
हे केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. केसांची गळती, त्वचेवरील डाग कमी करण्यास हे मदत करू शकते.
स्रोत: बदाम, संपूर्ण धान्ये, मच्छी आणि गोड बटाटे.
विटामिन B9 (फोलिक अॅसिड):
लाल रक्तपेशी तयार करणे, पेशींची वाढ व दुरुस्ती यासाठी हे आवश्यक आहे. गर्भवती महिलांसाठी हे विशेषतः महत्त्वाचे आहे.
स्रोत: पालक, ब्रोकोली, डाळी, हरभरा इत्यादी.
विटामिन B12:
हे रोगप्रतिकारशक्ती वाढवते, लाल रक्तपेशी तयार करते आणि पेशींच्या दुरुस्तीत सहाय्य करते. मानसिक स्वास्थ्यासाठीही ते उपयुक्त आहे.
स्रोत: मशरूम, मासे, अंडी, आंबवलेले बाजरीचे पदार्थ (फर्मेन्टेड मिलेट्स), यीस्ट, सफरचंद, केळी, ब्लूबेरी, संत्री, आंबा.
विटामिन C:
हे एक अँटी-ऑक्सिडंट असून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी आहे. तसेच शरीरात लोह (Iron) शोषण्यासाठी देखील मदत करते.
स्रोत: ब्रोकोली, टोमॅटो, पालक, फुलकोबी, शिमला मिर्च (बेल पेपर), लिंबू, आवळा, पेरू, पपई आणि संत्री.
विटामिन D:
हाडांची मजबुती, कॅल्शियम शोषण आणि दातांची वाढ यासाठी हे अत्यावश्यक आहे. सूर्यप्रकाश हे याचे प्रमुख नैसर्गिक स्त्रोत आहे.
स्रोत: सूर्यप्रकाश, सोया, मशरूम, फोर्टिफाइड सीरिअल्स, बदाम दूध, टोफू, अंडीचा बलक, फॅटी मासे (जसे सॅल्मन).
विटामिन E:
हे अँटी-ऑक्सिडंट असून वृद्धत्वाची प्रक्रिया धीमी करण्यास मदत करते. त्वचेचे पोषण, केसांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
स्रोत: सुर्यफूल बियाणे, शेंगदाण्याचे लोणी, बदाम, अवोकाडो, टोफू, पालक आणि कीवी.
विटामिन K:
रक्तातील गाठी तयार करण्याच्या (ब्लड क्लॉटिंग) प्रक्रियेसाठी आणि शरीरात कॅल्शियमचे नियमन करण्यासाठी उपयुक्त.
स्रोत: कोबी, ब्रोकली आणि हिरव्या पानांच्या भाज्या.
ही सर्व जीवनसत्त्वे आपल्या शरीरासाठी आवश्यक असून, त्यांची योग्य प्रमाणात पूर्तता नैसर्गिक आहारातूनच करणे सर्वोत्तम असते. पोषणमूल्यांनी समृद्ध, ताजे, विविध रंगाचे आणि नैसर्गिक अन्नपदार्थ खाल्ल्यास शरीराला आवश्यक असलेली ही सर्व जीवनसत्त्वे सहज मिळवता येतात.
आपल्या मधुमेह, बी.पी., थायराइड, इत्यादि जीवनशैलीशी निगडित आजारांची मूळ कारणे आणि त्यावरील नैसर्गिक उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये शामिल व्हा. आमच्या वेबसाइट वर जाऊन मोफत आपला नाव रजिस्टर करा| https://drbhagyeshkulkarni.com/dff-free-webinar-hindi/
नियमित अपडेटसाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा!
DFF प्रोग्रॅम बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट https://drbhagyeshculkarni.com ला भेट द्या
अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबर वर संपर्क करा. 9511218891