fbpx

मधुमेहासंबंधित औषधांविषयी समज-गैरसमज

misconceptions about diabetes medications

मधुमेहाने ग्रस्त असलेल्या अनेक लोकांचा असा समज आहे की औषधे म्हणजेच सर्व गोष्टींचा इलाज आहे. त्यांना असे वाटते की हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे त्यांचा मधुमेह बरा होईल. डॉक्टर तसेच रूग्णांचा असा विश्वास आहे, परंतु कोणतेही विज्ञान त्याला समर्थन देत नाही. अनेक अभ्यासातून,संशोधनातून असे दिसून आले आहे की औषधे चांगल्यापेक्षा जास्त हानी करतात.

आपण हे जाणतो की, जर आपण कोणतीही गोष्ट त्याच्या मूळ कारणापासून दूर केली तर ती कायमची निघून जाते.पेन किलर, फॅक्चरसाठी औषधे किंवा खोकल्याच्या आणि शिंकण्याच्या आजारामध्ये सर्वांसाठी प्रभावी औषधे आहेत. पण मधुमेहासारख्या जीवनशैलीच्या आजारासाठी असे कोणतेही औषध नाही जे पूर्णपणे बरे करते. मधुमेहावर नियंत्रण ठेवणारी औषधेच आहेत पण केवळ मधुमेहावरील औषधोपचाराने तुमचा मधुमेह कायमचा बरा होणार नाही.

जेव्हा तुम्ही मधुमेहा वर औषधोपचार करत असता, आणि तुम्ही तुमचे औषध फक्त एक दिवस घेतले नाही, तरी तुमची साखरेची पातळी आणि रक्तदाब लगेच वाढतो.म्हणूनच लोकांना वाटते की हे औषध त्यांना त्यांच्या साखरेच्या पातळीत मदत करत आहे.

 
औषधे काय करतात?
औषधे तुमच्या रक्तातून ती साखर काढून टाकतात, पण ही काढून टाकलेली साखर कुठे जाते हा प्रश्न आहे. आपल्याला वाटते की औषधे काहीतरी विलक्षण करत असतील. ते जास्तीची साखर जाळून किंवा ती जास्तीची साखर आपल्या लघवीद्वारे किवा मलाद्वारे बाहेर टाकून जादू करत असतील. तुम्ही कधी विचार केला आहे का, जेव्हा तुमची साखरेची पातळी २५० वरून १५० किंवा ३०० ते १५० पर्यंत घसरते तेव्हा कमी झालेल्या साखरेचे १०० गुण कुठे जातात? म्हणूनच औषधे काय करतात हे समजून घेणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या गोळ्या घेता तेव्हा तुमच्या रक्तातील वाढलेली साखर काढून टाकली जाते. विधान पुन्हा वाचा. तुमच्या शरीरातून नाही तर तुमच्या रक्तातील वाढलेली साखर काढून टाकली जाते, आणि ती तुमच्या शरीराच्या इतर भागांतील इतर ऊतींमध्ये किंवा पेशींमध्ये टाकली जाते.

समजा, जर माझ्या खोलीत मेलेला उंदीर आहे. त्या मेलेल्या उंदराचा कुजण्याचा वास येत आहे, त्यामुळे तो वास दूर करण्यासाठी मला तो माझ्या खोलीतून बाहेर फेकून द्यावा लागेल. पण जर मी ते उचलून फेकून देण्याऐवजी, मी तो बाजूच्या खोलीत ठेवला आणि, मग माझे दार बंद केले तरी काही वेळाने मला तो कुजलेला वास येणार नाही का? नक्कीच, माझ्या खोलीबरोबरच शेजारच्या खोलीलाही या गोष्टीमुळे दुर्गंधी येऊ लागेल. माझ्या औषधांबाबतही नेमके हेच केले जाते. ते रक्तातील साखर काढून टाकतात आणि दुसऱ्या भागात टाकतात, जेव्हा त्या दुसऱ्या भागात साखर वाढते तेव्हा ते दुसऱ्या भागात टाकतात आणि त्यामुळे आपले संपूर्ण आंतरिक वातावरण विस्कळीत होते. जरा कल्पना करा, जर तुमच्या शरीराचा एक भाग आधीच धोक्यात असेल, कदाचित डायबिटीस मुळे थायरॉईड किंवा उच्च रक्तदाब सारख्या संबंधित आजारामुळे, तर त्या इतर भागांमध्ये साखर टाकणे तुमच्यासाठी किती धोकादायक असु शकते?

समस्या एवढीच आहे की, तुमच्या रक्तातील साखरेची वाढलेली पातळी काही महिन्यांत किंवा १-२ वर्षांत आढळून येते, परंतु तुमच्या शरीराच्या इतर भागांमध्ये वाढलेली साखर शोधण्यासाठी किमान पाच ते सहा वर्षे लागतात आणि औषधे काय करतात तर ते आपल्या शरीरांवर होणारे घातक परिणाम पुढे ढकलत असतात.
काहीवेळा असे होते की लोक औषधे घेणे सुरू करतात आणि वर्षभरानंतर त्यांच्या साखरेची पातळी बऱ्यापैकी नियंत्रणात आल्यानंतर ती पुन्हा वाढू लागते. मग तुमचे डॉक्टर औषधांचे डोस वाढवतील आणि त्यामुळे तुमची साखरेची पातळी नियंत्रणात येईल. पण पुन्हा अनेक महिने किंवा दोन वर्षांनी आपली साखरेची पातळी पुन्हा वाढू लागते. असे घडते कारण आपल्या शरीराला त्या औषधांची सवय होत आहे. म्हणूनच जेव्हा औषधे शरीराला परिचित व्हायला लागतात तेव्हा त्याचा शरीरावर कोणताही परिणाम होत नाही आणि साखरेची पातळी वाढते.

अशा परिस्थितीत सर्वसामान्य लोकांचा औषधांवरचा विश्वास उडत चालला आहे. विज्ञान म्हणून अॅलोपॅथीला आजपर्यंत कधीही वाईट प्रतिमा दिली गेली नाही. मी डॉक्टर असल्याने माझ्या वाचकांपर्यंत योग्य तो संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. औषध खाणे चुकीचे आहे असे मी म्हणत नाही. पण तो आपला शेवटचा पर्याय असावा. या मागचे खरे कारण हे आहे की औषधे आपल्याला आपल्या विकारातुन बरे होण्यास मदत करतात, पण ते अर्थसत्य आहे. ही संकल्पना आम्ही आधीच स्पष्ट केली आहे.
काही औषधे त्वरित दुष्परिणाम देतात जे आपल्या शरीरावर लगेच दिसून येतात. त्याच वेळी, इतर औषधांचे दुष्परिणाम दिसत नाहीत परंतु आपल्या शरीरावर लक्षणीय परिणाम करतात. येथे मुख्य मुद्दा असा आहे की आपण आपल्या शरीरातील बदल ओळखू शकत नाही. पाच इंद्रिये जे आपल्याला फरक ओळखण्यास मदत करतात तसे सिग्नल ते देत असतात। परंतु सहसा ते आपल्या लक्ष्यात येत नाही.

 
मी माझ्या रूग्णांना रोज टॉफीसारखी औषधे खाताना पाहिले आहे. दररोज औषधे घेतल्याने त्यांना बरे वाटेल असा त्यांच्या मनाचा विश्वास आहे. कधी जर ते औषध घ्यायला विसरले तर त्यांना दिवसभर त्रास होतो. हे सर्व मनाचे खेळ असतात हा भाग वेगळा पण आपण औषधांचा आपल्या दैनंदिन दिनचर्येवर परिणाम होऊ देऊ नये. जर तुम्ही औषधांच्या सापळ्यात अडकला असाल, तर तुम्ही थेरपीसाठी योग्य तज्ञांचा सल्ला घ्यावा. औषधे आपल्यासाठी चांगली आहेत. परंतु आवश्यकतेनुसारच त्यांचे सेवन केले पाहिजे. नको असलेली औषधे घेऊन तुम्ही तुमच्या स्वतःच्या शरीराचे नुकसान करू नये अशी आमची इच्छा आहे. डीफफ मध्ये आम्ही रुग्णांना जीवन शैलीतील योग्य बदल आणि रुटीन लाईफ सुधारून या विकारावर मात करण्यास मदत करतो.

आपल्या मधुमेह, बी.पी., थायराइड, इत्यादि जीवनशैलीशी निगडित आजारांची मूळ कारणे आणि त्यावरील नैसर्गिक उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये शामिल व्हा. आमच्या वेबसाइट वर जाऊन मोफत आपला नाव रजिस्टर करा|👉🏼 https://drbhagyeshkulkarni.com/dff-free-webinar-hindi/

नियमित अपडेटसाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा!

DFF प्रोग्रॅम बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट https://drbhagyeshculkarni.com ला भेट द्या  

अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबर वर संपर्क करा.  9511218891

Open chat
1
We are available
Hello! How can i help you?