प्राचीन ज्ञान आणि आधुनिक जीवनशैलीचा मेळ

आपले संपूर्ण जीवन हे आपल्या विचारांवर उभे असते. आपण दररोज ज्या विचारांना महत्त्व देतो, तेच आपल्या वागणुकीचे आणि निर्णयांचे आधारस्तंभ बनतात. निसर्गात पसरलेले सकारात्मक विचार जेव्हा आपल्या मनात रुजतात, तेव्हा ते एक सकारात्मक मानसिकता घडवतात. त्याचप्रमाणे, नकारात्मक विचारांचे वारंवार पुनरावर्तन आपल्याला हळूहळू नकारात्मकतेच्या विळख्यात ओढते. जर एखादी व्यक्ती सकारात्मक विचारसरणीला आत्मसात करते, तर ती स्वतःच्या नकारात्मक विचारांच्या कल्पनेनाही थारा देत नाही.
मात्र, आजकाल बहुतांश लोक ‘स्थिर मानसिकता’ (Fixed Mindset) बाळगून जीवन जगतात. ते ना संपूर्णपणे सकारात्मक असतात, ना संपूर्ण नकारात्मक, पण कायम गोंधळात असतात. काय योग्य आणि काय अयोग्य याबद्दल त्यांना निश्चितता नसते. त्यामुळे अनेक वेळा ते अशा गोष्टी करतात, ज्यांचा त्यांच्या आयुष्यावर कोणताही सकारात्मक परिणाम होत नाही. अनेकांना जुन्या, समजुती बदलायला भीती वाटते. त्यांना वाटते की परंपरा, रुढी, ह्याच गोष्टी त्यांच्या यशाचे खरे कारण आहेत. त्यामुळे ते नवीन विचार, नवीन मार्ग, नव्या सवयी स्वीकारण्यास नकार देतात.
एक डॉक्टर किंवा उपचारक म्हणून मला अनेक वेळा असा अनुभव येतो की, लोकांना शारीरिक हालचाली किंवा व्यायामाचे महत्त्व पटते. ते त्या बदलासाठी तयारही होतात. पण जेव्हा मी त्यांच्या जीवनशैलीतील मानसिक आणि भावनिक बदलांची गरज सांगतो, तेव्हा मात्र फारच थोडे लोक असे असतात जे हे आव्हान स्वीकारतात. बहुतेक लोकांचा विश्वास असतो की, फक्त औषध घेतल्याने ते बरे होतील. त्यांना वाटते की, बदल म्हणजे फक्त बाह्य स्वरूपातील बदल, आहार, चालणे, झोपेचे वेळापत्रक. पण मनावर, विचारांवर, भावनांवर काम करणे हे खरे आरोग्याचे मूळ आहे, हे ते मान्य करत नाहीत.
१९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात American Association of Studies ने एक अभ्यास केला आणि हे अधोरेखित केले की दैनंदिन नकारात्मकता, मानसिक तणाव आणि भावनिक असंतुलन यांचा आपल्या शरीरावर थेट परिणाम होतो, विशेषतः दीर्घकालीन, म्हणजेच क्रॉनिक आजारांवर. या निष्कर्षाला ब्रिटिश मेडिकल जर्नल (2003) नेही दुजोरा दिला आहे. पण हे काही आजच्या काळातच लक्षात आलेले नाही. आयुर्वेदासारख्या प्राचीन भारतीय शास्त्रांनी हजारो वर्षांपूर्वीच मानसिक ताण, भावनात्मक असंतुलन आणि रोग यांच्यातील संबंध अधोरेखित केला होता.
आज आपल्यापैकी अनेक जण स्वतःच्या आजारांवर मात करण्यासाठी उत्तम उपचार शोधत असतात, पण कितीजण इतरांना बदल घडवण्यासाठी प्रेरणा देतात? किंवा स्वतःच्या भावनिक आरोग्यावर सजगपणे काम करतात? जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केले तर लक्षात येईल की आपल्या भावनांचा आपल्या शरीराशी अतूट संबंध आहे. शत्रुत्व, राग, निराशा, मत्सर, या भावना केवळ मानसिक त्रास देत नाहीत, तर शरीरात ऍसिड वाढवतात, रक्तदाब असंतुलित करतात, साखरेची पातळी वाढवतात आणि झोपेचे विकार निर्माण करतात. याउलट, प्रेम, करुणा, सामाजिक आधार आणि समाधान या सकारात्मक भावना रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, मानसिक शांतता देतात आणि शरीराला बरे होण्याची ताकद देतात. आज अनेक जण आरोग्याच्या समस्यांसाठी औषधांवर अवलंबून असतात. औषधं आवश्यक असली तरी ती पूर्ण उपाय नाहीत. खरा उपाय आहे, तुमच्या जीवनशैलीत, विचारांत आणि भावनांमध्ये बदल घडवणे. डॉक्टर तुमचं निदान करू शकतात, औषधं देऊ शकतात, पण जीवनशैली सुधारणे आणि अंतर्गत परिवर्तन घडवणे हे तुमच्या हातात असतं. “तुमचं मन जसं असेल, तसंच तुमचं शरीर तयार होतं.”
म्हणूनच, Ultimate Health Mindset, एक अशी मानसिकता तयार करणे आवश्यक आहे जी तुम्हाला आरोग्याकडे अंतर्मुख होऊन बघायला शिकवते. ही मानसिकता केवळ शरीरातील रोगांवर नव्हे, तर त्यांच्या मुळाशी असलेल्या भावनांवर उपचार करते. आपल्याला डॉक्टर आजारावर उपचार देतात, पण निरोगी जीवन कसं जगायचं हे शिकवत नाहीत. हे त्यांचं अपयश नाही, हे त्यांच्या प्रशिक्षणातच नसतं. मात्र काही डॉक्टर या मर्यादेपलीकडे जाऊन काम करतात. उदाहरणार्थ, डॉ. भाग्येश कुलकर्णी आपल्या संस्थेत डायबेटीस मुक्त जीवन जगणाऱ्या रुग्णांना केवळ औषधमुक्त करीत नाहीत, तर त्यांना एक सकारात्मक, तणावमुक्त जीवनशैली अंगीकारायला शिकवतात. ते रुग्णांना तीव्र मानसिकतेपासून स्वतःला मुक्त करण्यासाठी मार्गदर्शन करतात. आपल्याला एखादी गोष्ट हवी असते आणि ती मिळवण्यासाठी आपण स्वतःवर प्रचंड ताण देतो. पण जर ती गोष्ट आपल्या अपेक्षेनुसार मिळाली नाही, तर आपण नैराश्यात जातो. त्यानंतर सुरू होते तुलना, इतर काय करत आहेत, किती यशस्वी आहेत. आणि तिथूनच सुरू होते मत्सर, एक अशी भावना, जी शरीरात अनेक मानसिक व शारीरिक त्रास निर्माण करते. अपेक्षा, लोभ, नैराश्य, या सगळ्यांचा शेवट दीर्घकालीन आजारांमध्ये होतो. आणि या आजारांचा फटका केवळ आपल्याला नाही, तर आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही बसतो.
आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण कृतज्ञतेच्या मनोवृत्तीने जगायला हवं होतं, पण प्रत्यक्षात आपण भीती, असुरक्षितता, असमाधान आणि तणाव या भावनांच्या विळख्यात अडकून गेलेलो आहोत. आपल्याला वाटतं की एखादी गोळी घेतली, झोप घेतली, थोडा आराम केला, की समस्या सुटेल. आणि खरंच, मानसशास्त्रज्ञही त्या दिशेने सल्ला देतात, “मन शांत करा, औषधं घ्या, झोप पुरेशी घ्या.” पण प्रश्न असा आहे की ही तात्पुरती विश्रांती खरी उपचारपद्धती ठरू शकते का?
एका ब्रिटिश अभ्यासानुसार, जेव्हा मानसिक समस्यांवर रासायनिक गोळ्यांनी तात्पुरते नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा अशा लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका अधिक प्रमाणात दिसून येतो. यासोबतच, कोलेस्ट्रॉलच्या गोळ्यांमुळे टाइप 2 डायबेटीसचा धोका वाढतो, तर वेदनाशामक औषधांच्या सतत सेवनामुळे मूत्रपिंडांवर गंभीर परिणाम होतो. हे स्पष्ट दाखवून देतात की आधुनिक औषधपद्धती अनेक वेळा साइड इफेक्ट्सचे दुष्टचक्र निर्माण करते.
पूर्वी गुरुकुलांमध्ये शरीर, मन, भावना आणि आत्मा यांचा समतोल शिकवला जात होता. विद्यार्थ्याला जीवनशैली, संयम, मनन, ध्यान याचे महत्त्व समजवले जात होते. आजच्या आधुनिक शिक्षणपद्धतीमध्ये मात्र मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे शिक्षण पूर्णपणे हरवले आहे. आपण पाश्चात्य ज्ञानाच्या अंधानुकरणात एवढे गुंतलो आहोत की आपले मूळ मूल्य विसरून गेलो आहोत. आपल्या प्राचीन भारतीय परंपरेने आपल्याला केवळ उपचार दिले नाहीत, ती आपल्याला आतून मजबूत करत गेली. आपल्या आरोग्याचा खरा पाया फक्त शरीरात नाही, तो आपल्या विचारांमध्ये, भावनांमध्ये, आणि श्रद्धेत आहे.
मी एक डॉक्टर आहे. पण त्याचबरोबर, प्रमाणित माइंड ट्रेनरही आहे. हा प्रवास सहज साधा नव्हता. तो सुरु झाला जेव्हा मी स्वतःच्या अडचणी, माझे ताण, माझे अपयश – यांचा सामना केला. त्या टप्प्यावर मला जाणवलं की मनावर काम न करता केवळ शरीरावर उपचार करणं म्हणजे अर्धवट आरोग्य देणं. म्हणूनच, मी माइंड ट्रेनिंग शिकलं, स्वतःसाठी, आणि मग रुग्णांसाठी. आज, रुग्णांना औषध देण्याबरोबरच, त्यांना त्यांच्या ‘आरोग्यविषयक विचारांमध्ये मध्ये’ बदल घडवण्यासाठी मार्गदर्शन करतो. जेणेकरून ते केवळ आजारमुक्तच नाहीत, तर त्यांचे सर्वोत्तम रूप उजेडात येईल, शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या जलद उपाय म्हणजे तात्पुरती मलमपट्टी.खरं आरोग्य निर्माण होतं जेव्हा तुम्ही मनाशी संवाद साधता, भावनांना समजून घेतता, आणि शरीरासोबत आत्म्यालाही पोसता. आज आपल्याला औषधांपेक्षा अधिक समजूतदारपणाची गरज आहे; उपचारांसोबतच मानसिकतेत परिवर्तन हवे आहे.
आपल्या मधुमेह, बी.पी., थायराइड, इत्यादि जीवनशैलीशी निगडित आजारांची मूळ कारणे आणि त्यावरील नैसर्गिक उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये शामिल व्हा. आमच्या वेबसाइट वर जाऊन मोफत आपला नाव रजिस्टर करा| https://drbhagyeshkulkarni.com/dff-free-webinar-hindi/
नियमित अपडेटसाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा!
DFF प्रोग्रॅम बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट https://drbhagyeshculkarni.com ला भेट द्या
अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबर वर संपर्क करा. 9511218891