fbpx

डायबिटीस नियंत्रित करणे आणि तो बरा करणे यातील फरक?

Blog image 08 08 |

डायबिटीसच्या दृष्टीने ‘नियंत्रण’ हा शब्द वाळवंटातील मृगजळासारखा आहे. ‘डायबिटीस नियंत्रित करणे ‘हा एक गैरसमज आहे. जेव्हा तुमचा प्रयत्न हा डायबिटीस बरा कसा होईल असा असेल आहे, तेव्हा तुम्हाला त्या दृष्टीने नक्कीच मार्ग सापडतील.

 
२००८ मधील एका सर्वेक्षणातील धक्कादायक निष्कर्षांमुळे आपल्या कालबाह्य दृष्टिकोनावर किंवा आज अनेकजण वापरत असलेल्या दृष्टिकोनावर अनेक प्रश्न निर्माण झाले. २००८ मध्ये, न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये, एक ACCORD अभ्यास होता, जो जगातील सर्वात मोठा अभ्यास होता. हा स्टडी १०,००० डायबिटीस रूग्णांवर केला गेला होता. ज्यांना त्यांची रक्तातील साखर कमी करण्यासाठी किंवा नियंत्रित करण्यासाठी किंवा डायबिटीस थेरपी घेण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. या रूग्णांवर त्यांच्या हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि मृत्यूच्या जोखमीसाठी निरीक्षण केले गेले. परिणाम असा होता की, जे रुग्ण औषधोपचार प्रक्रियेचे काळजीपूर्वक पालन करतात म्हणजेच औषध नियंत्रित ठेवण्यासाठी ज्यांचा प्रयत्न होता त्यांना हृदयविकाराचा झटका, पक्षाघात किंवा मृत्यूचा धोका कमी दिसून आला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या रूग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक औषधे घेतल्याने कमी होते म्हणजेच फक्त औषध उपचार पद्धती कडे ज्यांचा कल अधिक होता त्यांना हृदयविकाराचा झटका आणि मृत्यूचा धोका वाढलेला दिसून आला. या विषयांवर असे स्पष्ट झाले की अचानक रक्तातील साखर कमी केल्याने रुग्णांमध्ये अधिक मृत्यू आणि हृदयविकाराचा झटका यांचा धोका वाढतो. निरोगी आणि समृद्ध जीवन हे आपले ध्येय असले पाहिजे.


औषधांचा कालबाह्य दृष्टीकोन केवळ रक्तातील साखर कमी करण्याचा प्रयत्न करतो, परंतु तरीही तो तसे करण्यात यशस्वी होत नाही. ACCORD स्टडी मुळे हे सिद्ध झाले की रक्तातील साखरेचे आक्रमकपणे कमी होणे हे मृत्यूचे प्रमाण वाढण्याचे प्राथमिक कारण आहे. होय, कागदावरील साखरेची पातळी त्या जड औषधाने (heavy medication) कमी होते, परंतु त्यामुळे मृत्यू किंवा हृदयविकाराचा धोका कमी होत नाही. अशा प्रकारे, जेव्हा हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णांचा मृत्यू होतो, तेव्हा डॉक्टर आणि नर्स त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत रक्तातील साखर नियंत्रणात असल्याचा दावा करतात.पण अशा स्थितीचा उपयोग काय? रक्तातील साखर कमी करणे आणि त्यामुळे मृत्यूचा धोका जास्त असणे हा खरं तर विचार करायला लावणारा विषय आहे.


इन्सुलिन रेझिस्टन्स हे या समस्येचे मुख्य कारण आहे ज्यामुळे सूज, लठ्ठपणा आणि साखरेच्या समस्या उद्भवत आहेत. तर, आपण मुख्य प्रश्नाकडे जात आहोत. डायबिटीस वर नियंत्रण ठेवता येत नसेल तर तो बरा कसा होणार? जर एखाद्या रुग्णाला समजले की त्यांच्या डायबिटीस चे मुख्य कारण इन्सुलिन रेझिस्टन्स आहे तर माझ्या मते, ते आधीच डायबिटीस बरा करण्याच्या मार्गावर आहेत. मग त्या व्यक्तीला ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’ म्हणजे नेमके काय आहे, आणि मग इन्सुलिनचा रेझिस्टन्स वाढण्याची कारणे काय आहेत, आणि शेवटी, त्या रुग्णाला त्यांच्या शरीरातील इन्सुलिनचा रेझिस्टन्स कसा कमी करायचा हे जाणून घेणे आवश्यक आहे.जर एखाद्या रुग्णाला या तीन गोष्टी समजल्या तर तो डायबिटीस वर नियंत्रण ठेवण्याऐवजी आपला डायबिटीस कायमचा बरा करण्याच्या मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न करेल.


दुर्दैवाने, अॅलोपॅथी किंवा होमिओपॅथी किंवा इतर कोणतेही औषध नाही ज्यामुळे ही इन्सुलिनची रेझिस्टन्स समस्या कमी होते. आता येथे लक्षात ठेवण्यासारखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली इन्सुलिन रेझिस्टन्स क्षमता पूर्णपणे काढून टाकणे हा काय पर्याय असु शकत नाही. जेव्हा डायबिटीस आढळून येतो, तेव्हा आपल्या सर्व पेशींपैकी किमान ८०% फॅट्स आणि ऍसिडने आधीच व्यापलेल्या असतात, त्या ८०% पर्यंत पोहोचल्यानंतर, आपले शरीर साखरेची पातळी राखण्यासाठी सतत झगडत असते. परंतु तुम्ही केवळ ४०- ५०% इन्सुलिन रेझिस्टन्स क्षमता कमी करून तुमचा डायबिटीस बरा करू शकता.

 
इन्सुलिनच्या रेझिस्टन्समुळे आपल्या स्वतःच्या शरीरातील इन्सुलिन शरीराच्या वापरासाठी शरीराद्वारे शोषून घेण्यास शरीर असमर्थ ठरते. त्यामुळे या इन्सुलिन रेझिस्टन्स हाताळण्यापासूनच महत्त्वाचा उपाय सुरू होऊ शकतो आणि हेच आपण ‘डायबेटिस फ्री फॉरएव्हर मध्ये करतो. आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या चाव्या आणि कुलूप शोधण्याऐवजी, आपण त्या च्युइंगम मिटवण्याचा प्रयत्न करतो. जीवनशैलीतील बदल आणि डीएफए प्रोटोकॉलसह, आम्ही शरीरातील या विषारीपणाचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे हा विषारीपणा आपल्या पचन तंत्रात समाविष्ट करण्यापासून रोखण्याचे मार्ग देखील शोधतो.


तुम्हाला प्रामाणिकपणे दररोज डॉक्टरांकडे जाऊन तुमची साखर तपासायला आणि तुमच्या औषधांसाठी अधिक डोस घ्यायला आवडेल का? हे भावनिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या थकवणारे आणि वेदनादायक आहे. डायबिटीसमुळे कोणालाच नकारात्मक आणि चिडचिडे राहायचे नाही किंवा इतरांवर अवलंबून राहणे कोणालाही आवडणार नाही.. या समस्येवर औषधोपचार हा एकमेव उपाय आहे हे आतापर्यंत आपल्या मनाला माहीत होते परंतु आता आपल्याला माहित आहे की अतिऔषधोपचार केल्याने उपाय होण्याऐवजी समस्या वाढतात. काही सर्वे, अभ्यास कालबाह्य औषधांच्या मार्गावर गंभीरपणे प्रश्नचिन्ह देतात आणि नैसर्गिक आणि पारंपारिक पद्धतींकडे अधिक झुकतात.

 
आपल्याला फक्त ते बदल स्वीकारण्याची मानसिकता तयार करायची आहे. तुम्ही तुमचा डायबिटीस बरा होऊ शकतो यावर विश्वास ठेवण्यासाठी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करणे आवश्यक आहे

आपल्या मधुमेह, बी.पी., थायराइड, इत्यादि जीवनशैलीशी निगडित आजारांची मूळ कारणे आणि त्यावरील नैसर्गिक उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये शामिल व्हा. आमच्या वेबसाइट वर जाऊन मोफत आपला नाव रजिस्टर करा|👉🏼 https://drbhagyeshkulkarni.com/dff-free-webinar-hindi/

नियमित अपडेटसाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा!

DFF प्रोग्रॅम बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट https://drbhagyeshculkarni.com ला भेट द्या  

अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबर वर संपर्क करा.  9511218891

Open chat
1
We are available
Hello! How can i help you?