सहानुभूती आणि उपचार: एक प्रभावी उपचार दृष्टिकोन
मी अँलोपॅथीक ग्रॅज्युएशन केले आहे, परंतु माझ्या कडे एक टीम आहे जी विविध प्रकारच्या चिकित्सा पद्धतींमध्ये प्रवीण आहे – अँलोपॅथी , निसर्गोपचार, आयुर्वेद, होमिओपॅथी इत्यादी. यातील प्रत्येक पद्धतींच्या विशिष्ट मर्यादा आणि फायदे आहेत, आणि प्रत्येक पद्धत जुनाट आजारांवर उपचार करण्याच्या वेगळ्या दृष्टिकोनावर आधारित आहे. माझ्याकडे येणारे रुग्ण नेहमी विचारतात की मी त्यांना कोणत्या उपचार पद्धतीचा वापर करून उपचार करणार आहे? आणि त्यांना माझं उत्तर नेहमीच असं असतं की सर्व पद्धती एकत्र केल्यास जुनाट विकारांवर अधिक परिणामकारक उपचार करता येऊ शकतात. मी त्यांना सांगतो की प्रत्येकजण वेगळा असतो आणि उपचार स्वीकारण्याची आणि प्रतिक्रिया देण्याची त्यांची पद्धतही वेगळी असते काही रुग्ण माइयावर विश्वास ठेवतात, तुम्ही ठीक होणार आहात असे सांगतो. त्यामुळे ते स्वत:कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतात आजारीपणा ते निरोगीपणा पर्यंत स्वतः ला पूर्णपणे बदलतात आणि सकारात्मक दृष्टीकोन घेतात, ज्यामुळे त्यांचे मानसिकतेत सुधारणा होते आणि ते शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी होतात. परंतु काही रुग्ण असे असू शकतात जे कायमच बदलण्यास तयार नसतात, आणि दुसऱ्यांना बदलण्यासाठी प्रेरित देखील करत नाहीत. या लोकांना सहानुभूती आणि समर्थन देणं आवश्यक असतं. जो व्यक्ती शारीरिक आणि मानसिकपणे असुरक्षित असतो तो तोच असुरक्षितपणा इतरांना दाखवू इच्छित नाही. मात्र, जो व्यक्ती सशक्त आहे आणि इतरांकडून थोडेसे लक्ष वेधून घ्यायचं असतं, तो सहानुभूती शोधतो. सहानुभूती या शब्दाचे हे फक्त शाब्दिक भाषांतर होते. परंतु आपल्या व्यवसायात, सर्व रुग्ण डॉक्टरांकडे आल्यावर मुलांसारखे होतात त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांना डॉक्टरांची सहानुभूती हवी असते.व्यवसायाच्या दृष्टिकोनातून, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. डॉक्टरांच्या सहानुभूतीने रुग्णांमध्ये मानसिक शांती आणि आत्मविश्वास निर्माण होतो. संशोधनानुसार, ८०% वेळेस प्लासिबो इफेक्ट आणि २०% औषधे रुग्णांना रोगांपासून बरे होण्यास मदत करतात आणि उपचार प्रक्रियेची गती वाढते. डॉक्टरांनी रुग्णांना दिलेला आत्मविश्वास आणि सहानुभूती, औषधे घेण्यापूर्वीच त्यांची मानसिक स्थिती सुधारतात, ज्यामुळे रुग्णांच्या उपचारांवर सकारात्मक परिणाम होतो. या प्रक्रियेला “सांत्वन” म्हणता येईल. जेव्हा आपण रुग्णाला सांत्वन देतो आणि त्याला योग्य सल्ला देतो, तेव्हा त्यांना उपचाराच्या प्रक्रियेत सहकार्य आणि विश्वास मिळतो, ज्यामुळे उपचार अधिक प्रभावी होतात.
-A good doctor console always and educate every time but cure rarely. “एक चांगला डॉक्टर आजारपणाबद्दल योग्य ज्ञान देतो, रुग्णांशी सहानुभूतीने वागतो आणि उपचारासाठी कमीत कमी औषधांचा वापर करतो. हा दुर्मिळ फॉम्र्युता तुम्हाला कोणी शिकवणार नाही. स्वतःच्या अनुभवातून शिकलोय म्हणून मी ते या पुस्तकात शेअर केले आहे. रुग्ण हे फक्त उपाय शोधत नाहीत, तर त्यांना डॉक्टरांचा सहकार्य आणि समजून घेणारा दृष्टिकोन हवा असतो. रुग्णांना असं वाटतं की डॉक्टरांनी त्यांना हे सांगावं, “मी तुमची काळजी घेईन, आणि तुम्हाला एक सर्वांगीण, पूर्ण उपचार देईन.” रुग्ण या गोष्टी लक्षात ठेवतात आणि त्यांचे जीवन स्वतंत्रपणे स्थिर आणि निरोगी होते. जेव्हा डॉक्टर ऑपरेशन थिएटरमध्ये काम करत असतात, तेव्हा ते रुग्णांचे प्राण वाचवतात. या कार्यामध्ये त्यांच्यातील गुण, त्यांचे वर्तन आणि कौशल्य हे त्यांना देवासमान किंवा देवाच्या बरोबरीचे दर्जा देतात. रुग्ण त्यांच्या जीवनाची गुणवत्ता आणि निरोगीतेची काळजी घेत असतात, आणि त्या विश्वासानेच ते डॉक्टरांकडे परत परत जातात. कॉर्पोरेट जगतात, हे ‘क्लायंट रिटेन्शन’ म्हणून ओळखले जाते. जर ग्राहक तुमच्याकडे एकदा आले, तर त्यांना तुम्ही दर वेळेस काहीतरी नवीन आणि मूल्यवान ऑफर करत राहता. हे असेच असते, जेव्हा ते परत येतात किंवा ते त्यांची निवड परत तुमच्याकडून करतात, तोपर्यंत तुम्ही त्यांना सेवा देत राहता, कधीही त्यांचा अनुभव उत्तम करत राहता. स्टॉक संपेपर्यत ही प्रक्रिया सर्व ग्राहकांसोबत चालू राहते.
“कॉर्पोरेट जगात ‘क्लायंट रिटेन्शन’ ही एक सामान्य रणनीती आहे, परंतु जेव्हा मोठ्या, खाजगीकरण केलेल्या आणि कॉर्पोरेट रुग्णालयांबद्दल बोलतो, तेव्हा ते ‘भीतीचा व्यवसाय’ करत आहेत. यामध्ये, डॉक्टर आणि रुग्णालये रुग्णांना हवे असलेल्या उपचारांपेक्षा त्यांना गरजेची नसलेली उपचारं किंवा तपासणी करण्यास भाग पाडतात, जरी ते पूर्णपणे फिट आणि निरोगी असले तरी. मी अशा अनेक केसेस पाहिल्या आहेत, आणि हे पाहून मला आश्चर्य वाटते की एक डॉक्टर म्हणून ते कशा प्रकारे एखाद्याच्या जीवाशी खेळू शकतात. त्यामुळे आजच्या काळात, डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवाद बदलला आहे. गूगल आणि इतर ऑनलाइन स्त्रोतांमुळे रुग्णांना सर्व काही माहिती आहे असे वाटते, जरी प्रत्यक्षात त्यांना खूपच कमी माहिती असते. उदाहरणार्थ, ‘माझं डोकं दुखत आहे, मला कॅन्सर आहे का?’ असे प्रश्न आता सामान्य झाले आहेत. रुग्ण डॉक्टरांकडे येण्याआधीच गूगलवर शोध घेतात आणि त्यानुसार त्यांच्या समस्या समजून घेतात. यामुळे डॉक्टरांना अधिक काळजी घ्यावी लागते, आणि त्यांना त्या रुग्णांच्या भ्रामक समजुतींना समजावून सांगण्यासाठी अधिक वेळ आणि प्रयत्न करावे लागतात. अनेक रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्यापेक्षा ऑनलाइन माहितीवर जास्त विश्वास ठेवतात. याचा परिणाम असा होतो की डॉक्टरांना रुग्णांना ‘हे काहीही गंभीर नाही’ हे सिद्ध करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. यामध्येच कोविड-१९ महामारीचा एक महत्त्वाचा पैलू आहे. लोक ऑनलाइन व्हिडिओ आणि बातम्या पाहून गडबडले होते, आणि त्यांना त्यांच्यात कोरोनाची लक्षणं असल्याचा समज झाला.
परिणामी, जे लोक खरोखर आजारी नाहीत, तेही रुग्णालयात तपासणीसाठी जात होते आणि तेथे संसर्ग होऊन त्यांच्या चाचण्या सकारात्मक येत होत्या. हे सर्व मानसिकतेशी निगडित आहे. कुठेतरी याबाबत जागरूकता असणे आवश्यक आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे काही लोकांचा असा समज असतो की, आपल्या शरीरावर जुनाट आजारांचा प्रभाव पालकांद्वारे मिळालेल्या जीन्समुळे होतो, यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या पालकांच्या आजारांची आणि परिस्थितीची छाया आपल्या जीवनावर असू शकते, पण हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, या आजारांना आपल्या आयुष्यात येऊ देणे आपल्या हातात आहे. आपल्याला आपल्या जीवनशैलीत बदल करणे आणि तंदुरुस्तीची काळजी घेणे हे आपल्याच हातात आहे. आपण अनेकदा आरामदायक जीवनशैलीसाठी धावतो, परंतु आपल्या संपूर्ण जीवनाचा केंद्रबिंदू हे आपले आरोग्यच असावे लागते. आरोग्याची योग्य काळजी घेतली, तर आपल्याला निरोगी जीवन जगण्याचा आनंद मिळू शकतो.
अशा अनेक रुग्णांना मी पाहतो, जे अजूनही आपल्या पालकांच्या आजारांच्या वारसाकडे पाहून अशा विचारांत अडकलेले असतात की त्यांना देखील हेच आजार होणार. त्यांचा विश्वास असतो की, वयस्कर पालकांना ज्या आजारांचा सामना करावा लागला, तोच आजार त्यांच्यासाठीही अपरिहार्य आहे. पण हे सत्य नाही. ‘वारसा संपत्ती’ जशी ऐकली जाते, तशी ‘वारसा रोग’ किंवा ‘पालकांमुळे रोग होणे’ असे काही नसते. होय, आपल्या पालकांकडून जे डीएनए मिळते, त्यात त्या आजारांची स्मृती असू शकते, पण त्याचा अर्थ असा नाही की ते आजार आपल्याला देखील होणारच आहेत. जेव्हा आपल्याला विश्वास होतो की आपल्या पालकांनी जे भोगले तेच आपल्यालाही भोगावे लागेल, तेव्हा आपण आपले भविष्य ठरवताना एक चुकीचा मार्ग स्वीकारतो. तसा विचार जर सारखा करत राहिलात तर न होनार्या आजाराला तुम्ही आकर्षित कराल म्हणून आपल्या जीवनावर नियंत्रण ठेवून, आपण आरोग्यदायी निवडी करणे आणि निरोगी जीवनशैली अंगीकारणे हे आपल्याच हातात आहे. आपल्या इच्छाशक्तीवर विश्वास ठेवून, आपण आपल्या जीवनशैलीत बदल करून, या आजारांना दूर ठेवू शकतो. आपण इच्छित असलेल्या सर्व सकारात्मक गोष्टी साध्य करू शकतो, पण त्यासाठी आपल्याला आपली मानसिकता बदलावी लागेल.
आपल्या मधुमेह, बी.पी., थायराइड, इत्यादि जीवनशैलीशी निगडित आजारांची मूळ कारणे आणि त्यावरील नैसर्गिक उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये शामिल व्हा. आमच्या वेबसाइट वर जाऊन मोफत आपला नाव रजिस्टर करा|
नियमित अपडेटसाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा!
DFF प्रोग्रॅम बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट https://drbhagyeshculkarni.com ला भेट द्या
अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबर वर संपर्क करा. 9511218891