औषधांवर जगायचं की आरोग्याने फुलायचं?

जीवनात उत्साही असलेली माणसे कोणतेही काम विलक्षण समजून करतात. त्यांच्या दृष्टीने, यशस्वी होण्यासाठी दररोज थोडा जास्त वेळ देणं हे त्यांचं कर्तव्यच असतं. जे लोक आपल्या ध्येयासाठी मनापासून झपाटलेले असतात, त्यांना कामाविना चैन पडत नाही. त्यांचं आयुष्य उर्जेने भरलेलं असतं, कारण ते निसर्गाशी जोडलेले असतात. निसर्गाशी असलेलं हे नातं त्यांना आतून स्फूर्ती देतं. मीही अशाच प्रकारे माझ्या आरोग्याला आणि जीवनशैलीला प्राधान्य देतो. जर तुमचे निर्णय आणि कृती या जगासाठी काही चांगलं निर्माण करत असतील, तर तुम्हाला बाहेरून प्रेरणा घेण्याची गरजच भासत नाही. तुमचा उद्देश जर तुमच्या वैयक्तिक यशापेक्षा मोठा असेल, तर तुमचं आयुष्य एका सकारात्मक ‘ऑटो पायलट’वर चालतं – जिथे तुम्हाला प्रयत्नही करावे लागतात आणि जगालाही तुमचं सर्वोत्तम द्यावं लागतं. मी नेहमी स्वतःचं संशोधन केलं, स्वतः बदल अनुभवला, आणि त्यानंतरच इतरांना शिकवण्याचा अधिकार मिळवला.
माझं दैनंदिन जीवन वेगळं नाही, पण ते अतिशय साधं आहे, कारण मी निसर्गाशी एकरूप झालो आहे. आजवर मी कधीच औषधं घेतली नाहीत, रुग्णालयात कधीच दाखल झालो नाही आणि आजारीही पडलो नाही. आज अनेक लोक आरोग्याच्या समस्यांमुळे नकारात्मक बनतात. त्यांच्यात सकारात्मकता निर्माण करणं हे माझं ध्येय बनलं आहे. म्हणूनच मी एक ठाम निर्णय घेतला, केवळ औषधोपचारांवर विश्वास न ठेवता, निरोगीपणाच्या मूलभूत संकल्पनांवर काम करण्याचा. एक डॉक्टर म्हणून मी औषधांपेक्षा आरोग्यवर्धनावर अधिक विश्वास ठेवतो. मी लोकांना केवळ बरे होण्यामध्ये नव्हे, तर त्याआधीच त्रास टाळण्यामध्ये मदत करतो. हेच माझं कार्य आहे, लोकांना त्यांचं जीवन बदलण्याची प्रेरणा देणं.
आरोग्य: जीवनाचं खरं भांडवल:
माझा एक प्रश्न आहे — जेव्हा तुमचा जन्म झाला, तेव्हा तुम्ही कोणाला सोबत घेऊन आलात का?
उत्तर: नाही.
आणि जेव्हा तुम्ही हे जग सोडाल, तेव्हाही तुम्ही कोणाला सोबत घेऊन जाणार आहात का?
उत्तर: नाही.
मग या मधल्या प्रवासात जन्म आणि मृत्यूच्या दरम्यान आपण राग, मत्सर, दुःख आणि तणावाची इतकी मोठी बॅग आपल्या मनात का साठवतो? आपण या जगात कोणत्याही आजाराशिवाय आलो, मग निघताना आपल्या आरोग्याचं नुकसान का करतो? माझ्या मते, परिपूर्ण आरोग्य ही फारशी क्लिष्ट संकल्पना नाही. जर तुम्हाला नीट झोप येत असेल, चांगली भूक लागत असेल आणि सुगम पचन होत असेल, तर तुम्ही निरोगी आहात. इतकं साधं आहे. पण ही साधी अवस्था गाठण्यासाठी तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनातून तणावाला अलविदा करावा लागेल. आज आपण आजारी पडतो, कारण तणावाचं ओझं आपल्यावर खूप जड झालेलं आहे. झोपेची गडबड, भुकेचा अभाव, पचनाच्या समस्या, या सगळ्याचा मुळ स्रोत म्हणजे तणाव. आपण लक्षात घेत नाही, पण हीच गोष्ट आपल्या यशातही अडथळा ठरते.
जर तुम्हाला जीवनात काही मोठं साध्य करायचं असेल, तर सर्वात आधी तुमचं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आरोग्य उत्तम असतं, तेव्हा मन आणि शरीर दोन्ही संपूर्ण क्षमतेने कार्य करतं. तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकता, ऊर्जा भरलेली असते, आणि तुमच्या ध्येयात भर घालू शकता. उत्साह हा फक्त प्रेरणेमुळे नाही, तर दररोज स्वतःला निरोगी ठेवण्याच्या सवयींमुळे निर्माण होतो. या उलट, अस्वास्थ्यकर व्यक्ती म्हणजे केवळ शारीरिक कमजोरी नाही, तर ती एक असंतुलित अवस्था असते. शरीर, मन आणि आत्म्याच्या एकतेचा अभाव.
माझे गुरू, आदरणीय डॉ. बी. एम. हेगडे यांचं एक सुंदर वाक्य आहे: “आपल्या जीवनाची किंमत ओळखा, कारण आपलं शरीर ही एक अमूल्य देणगी आहे.” खरंच, आपल्या शरीराची किंमत १०० कोटींपेक्षा जास्त आहे पण आपल्याला त्याची जाणीवच नसते, कारण ते आपल्याला ‘फुकट’ मिळालंय असं वाटतं.आपल्या आरोग्यावर प्रेम करावं लागतं. आपण अनेक वेळा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय इतरांच्या सल्ल्यावर घेतो, पण आरोग्याविषयी मात्र बेफिकीर राहतो. आणि एक दिवस जेव्हा आरोग्य हातातून निसटतं, तेव्हाच त्याचं खरं मोल कळतं. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. म्हणूनच मला असं वाटतं “आजारी पडल्यानंतर आरोग्य सुधारायचा विचार करू नका, आरोग्य टिकवण्याची कला शिकून ठेवा.” ही कला अवघड असू शकते, पण अशक्य नाही. ती फक्त दररोज थोडासा शिस्तबद्ध प्रयत्न मागते.
तुमचं आरोग्य, तुमचं उत्तरदायित्व:
प्रश्न एक सोपा आहे, पण विचार करण्यास भाग पाडणारा, तुम्हाला औषधोपचारांचा बळी व्हायचंय का? तुम्हाला एका रोगीप्रमाणे हतबलपणे मरण पत्करायचंय की तुमचं शरीर इतकं दुर्बल व्हावं की दैनंदिन आयुष्यात तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावं लागेल? हे वाचताना तुमचं अंतःकरण थोडं हलतंय का? कारण खरा प्रश्न असा आहे, तुम्हाला तुमचं आयुष्य अर्थपूर्ण जगायचंय का? तुम्ही तुमच्या कुटुंबावर प्रेम करता ना? त्यांची काळजी तुम्हाला आहे ना? मग एक सोपा प्रश्न, तुम्ही स्वतःची काळजी घेत आहात का? जर नाही, तर तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता, याचा अर्थ काय?
आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे आपल्या प्रियजनांवर एक अदृश्य ओझं टाकणं आहे. कारण, तुम्ही आजारी पडला की त्यांचीही काळजी सुरू होते. वेळ, पैसा, भावना हे सगळं खर्च होतं. सुरुवातीला सहनशीलता असते, पण हळूहळू मनात अस्वस्थता आणि थकवा दाटतो. प्रत्येकाचं आयुष्य स्वतंत्र आहे. आणि हे खरं आहे की आयुष्यभर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी झटता पण त्यांच्यावर कायम अवलंबून राहून त्यांचंही भविष्य संकटात टाकायचंय का? तुमचं शरीर ही एक अमूल्य देणगी आहे. आपण आपल्या घराची, गाडीची सेवा घेतो, त्यांची देखभाल करतो, मग आपल्याच शरीरासाठी आणि मनासाठी दररोज ३० मिनिटं का काढू शकत नाही? निरोगी जीवन म्हणजे एक गंतव्य नाही तो एक प्रवास आहे. हा प्रवास ‘सदैव फिटनेस’कडे जातो, जिथे आजारपण ही एक क्षणिक अडचण बनते आणि शांती ही आयुष्याची ओळख ठरते. शांत मन, चांगलं आरोग्य आणि संतुलित जीवन, या गोष्टी कुठे बाहेर मिळत नाहीत. त्या आपल्या सवयींमध्ये आणि दिनचर्येमध्ये निर्माण कराव्या लागतात.
८०% – २०% फॉर्म्युला वापरा :
तुमचं ८०% लक्ष तुमच्या आरोग्यावर केंद्रित ठेवा, चांगली झोप, स्वच्छ आहार, नियमित हालचाल, सकारात्मक विचार. बाकी उरलेल्या २०% त्रासदायक सवयी, आजारपण, टेन्शन, ते आपोआप निघून जातील. तुमचं आरोग्य हे तुमचं उत्तरदायित्व आहे, इतर कुणाचं नाही. जर तुम्ही स्वतःवर प्रेम करत असाल, तर त्या प्रेमाची पहिली पायरी आहे, स्वतःची काळजी घेणं.
निरोगी जीवनाबाबत जाता जाता इतकंच थोडक्यात सांगेल की,”झोपेच्या शांतीत, आहाराच्या शुद्धीत, सांभाळा आरोग्य, हीच खरी संपत्तीची सिद्धी.तणावाच्या काळोखातही उमलू शकतो स्वास्थ्याचा प्रकाश,फक्त तुमचं थोडंसं प्रयत्नशील, प्रेमळ आणि सचेत ‘आज’ लागतो त्यासाठी.कारण ह्या जीवनरूपी प्रवासात शरीरच आपला खरा ‘सहप्रवासी”.
आपल्या मधुमेह, बी.पी., थायराइड, इत्यादि जीवनशैलीशी निगडित आजारांची मूळ कारणे आणि त्यावरील नैसर्गिक उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये शामिल व्हा. आमच्या वेबसाइट वर जाऊन मोफत आपला नाव रजिस्टर करा| https://drbhagyeshkulkarni.com/dff-free-webinar-hindi/
नियमित अपडेटसाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा!
DFF प्रोग्रॅम बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट https://drbhagyeshculkarni.com ला भेट द्या
अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबर वर संपर्क करा. 9511218891