fbpx

डायबिटीस रिव्हर्सलसाठी अंतिम उपाय

डायबिटीस रिव्हर्सलसाठी अंतिम उपाय |

खूप लोकांची त्यांचा जो डायबिटीस आहे त्यातून बाहेर पडण्याची जी आशा आहे ती हरवलेली आहे. हे लोक खूप सारा प्रयत्न करतात पण जो काही डायबिटीसवर त्यांना रिझल्ट मिळाला पाहिजे तो मिळत नाही किंवा वेगवेगळे उपाय करून ते थकून जातात त्यामुळे ते कंटाळून जातात आणि त्यांना मधुमेहातुन मुक्त होण्याची एक उमेद जी असते ती कुठे तरी हरवलेली असते. त्यामुळे जेंव्हा आपण डायबिटीस रिव्हर्सलचा विचार करतो किंवा डायबिटीस मधून बाहेर पडण्याचा विचार करतो त्या वेळेला बहुतांश वेळा फक्त मला माझी आर्थिक क्षमता किती आहे?, मी किती चांगल्या पद्धतीची गोळी घेतोय किंवा किती चांगल्या पद्धतीचे औषध घेतोय? यापेक्षा गोळ्या, औषधांपेक्षासुद्धा त्या डायबिटीसचे मूळ कारण काय आहे? नेमका मला डायबिटीज कशामुळे उद्भवला आहे? हे जोपर्यंत मी समजून घेत नाही आणि त्याच्यावरती मी जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत डायबिटीस रिव्हर्सलवर आपल्याला मार्ग सापडणार नाही. खरं तर आपली अवस्था “पोटीं कस्तुरी वासासाठी फिरे भीरभीरी” या म्हणीसारखी झालेली आहे. जेव्हा आपण औषधांबद्दल बोलतो त्या वेळेला ती धोकादायक आहेत किंवा त्याचे साइड इफेक्टस् आहेत हे केवळ माझं वैयक्तिक मत नाही तर ते वेगवेगल्या संशोधनातुन सिद्ध झालेले आहे की, जेवढा गोळ्यांऔषधांचा डोस वाढतो त्यावेळी त्या गोळ्यांऔषधांच्या इफेक्टबरोबर त्याचे साइड इफेक्ट्ससुद्धा वाढताना दिसून आलेले आहेत. फक्त औषधांचा विचार करून नाही चालणार किंवा लगेचच आज तुम्ही गोळ्या औषध बंद करावी असंही मी म्हणत नाहीये. 

तुमचा गोळ्या औषधांचा तुमच्या ट्रीटमेंटमध्ये 80 टक्के सहभाग असतो आणि 20 टक्केच जीवनशैलीचा भाग असतो. जेव्हा मी मधुमेह मुक्तीचा विचार करतो त्या वेळेला मला हे समीकरण उलटे करणे गरजेचे आहे. हे समीकरण बदलणे गरजेचे आहे. 80 टक्के किंवा किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त मी माझ्या जीवनशैलीच्या बदलावर काम केलं पाहिजे आणि मला 20 ते 25 टक्केच गोळ्या औषधांचा वापर करावा लागला पाहिजे. जसे जसे माझं वय वाढते तसे तसे माझे गोळ्या औषधांचे डोस कमी कमी होत गेले पाहिजे. जीवनशैलीमध्ये सुधार होत होत डायबिटीज रिवर्सलचा एकेक टप्पा पार केला पाहिजे आणि मधुमेहमुक्तीपर्यंत निरोगी आयुष्याकडे मी वाटचाल केली पाहिजे. बर्याच वेळा असं दिसतं की डायबिटीस मध्ये किंवा जीवनशैलीतील काही सोपे आणि जे प्रभावी बदल आहे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि केवळ औषधांच्या दुष्टचक्रामध्ये बरेच सारखे डायबेटिक पेशंट्स अडकलेले दिसून येतात. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा मनाने आणि शरीराने दोन्ही दृष्ट्या तयार होणं गरजेचं आहे आणि त्यातला पहिला उपाय म्हणजे मधुमेह मुक्तीसाठी तुम्ही तुमची मानसिकता ही ‘मला आनंदी जगायचं आहे, मला निरोगी जगायचे आहे, मला एक मधुमेहमुक्त आयुष्य प्राप्त करायचे आहे आणि जो काही परमेश्वराने मला हा सुंदर देह दिलेला आहे सुंदर शरीर दिलेले आहे त्याला मला चांगल्या पद्धतीने जपायचे आहे’. अशा प्रकारची मानसिकता पहिल्यांदा करणं आवश्यक आहे आणि तशी दृढ़ इच्छाशक्ती असली पाहिजे. अनेकदा मधुमेह आणि संबंधित विकारामुळे आधीच आपली अवस्था खूप त्रस्त झालेली असते. सतत दू:ख, तणाव, चिडचिड आणि एक प्रकारचा निरुत्साह हा आपल्या आयुष्यामध्ये डायबिटीस मुळे आलेला असतो. त्यामुळे जेव्हा पण डायबिटीस मुक्तीचा विचार करतो त्या वेळेला ती मानसिकता सकारात्मक होण्यासाठी आणि आपलं आरोग्य आपल्याला पुन्हा मिळवण्यासाठी आशावादी होणे, प्रेरणादायी राहणे हे खूप गरजेचे आहे आणि महत्वाचे म्हणजे मूळ कारणांवर जास्त काम करणे गरजेचे आहे. लक्षणांवर काम करत असताना मी ज्या काही गोळ्याऔषधे घेतो त्याच्या पलीकडे जाऊन जीवनशैलीतील बदल हे मला माझ्या आजारमुक्तीसाठी कशा पद्धतीने मदत करणार आहेत याचाही आपण विचार करायला पाहिजे.

आपण औषधोपचार गैरसमजा विषयी आधीच बोललो आहोत, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्हाला आजच तुमची औषधे बंद करावी लागतील आणि तुमच्या डॉक्टरांकडे जाणे थांबवावे लागेल का? तर नाही. तुमचे डॉक्टर देखील तुमच्या बरे होण्यात महत्वाचे योगदान देत आहेत आणि तुम्हाला उपाय मिळावा अशीच त्यांची इच्छा आहे. म्हणून, तुम्हाला तुमची औषधोपचार हे चालू ठेवावे लागतील. परंतु ते वाढू न देणे हे तुमचे ध्येय असले पाहिजे कारण औषधे म्हणजे मधुमेह नियंत्रण हा गैरसमज आहे खरं तर औषधे आजची समस्या या उद्यावर ढकलत असतात आणि तात्पुरते नियंत्रण ठेवण्यास मदत करतात त्यामुळे निरोगी जीवनशैलीने काही महिन्यांत ते शक्य तितके कमी केले पाहिजे आणि आणि मूळ कारणावर काम केले पाहिजे म्हणून स्टेप टू स्टेप प्रक्रिया असावी, जिथे डीएफएफ सह आम्ही तुम्हाला या पायऱ्या पद्धतशीरपणे शिकवतो.

खरं तर पेशींमध्ये जमा होणारी अतिरीक्त चरबी काढून टाकणे महत्वाचे असते कारण यामुळे आपली इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढत असते. जास्त चरबीसाठी उत्तम, वैज्ञानिक शब्द म्हणजे इंट्रा-मायो-सेल्युलर लिपिड्स. (खराब कोलेस्टेरॉल). इंसुलिनचा प्रतिकार वाढवण्यासाठी हा प्रमुख घटक आहे कारण तो आपल्या स्नायूंच्या पेशींमध्ये जमा होतो. मी या अगोदर एका लेखात लॉक आणि की या मॉडेलबद्दल बोललेलो आहे त्यामुळे आता मला येथे काय बोलायचे आहे याची तुम्हाला कल्पना आहे., स्पष्टपणे सांगायचे तर, बरेच लोक प्राण्याची चरबी आणि प्रथिनांचा वापर करतात, ज्यामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा देखील समावेश आहे. आम्ही दुधाला शाकाहारी मानतो परंतु दुग्धजन्य पदार्थांचा पशु दुग्धजन्य पदार्थांतर्गत समावेश केला जातो. ही सर्व प्राणी-स्रोत उत्पादने या इंट्रा मायो-सेल्युलर लिपिड्समध्ये योगदान देतात. या गोष्टींचे रोजचे सेवन हे तुमची इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढवतात. अशा प्रकारे, जेव्हा एखादी व्यक्ती हे प्राणीजन्य पदार्थ खाणे थांबवते, तेव्हा ३ आठवड्यांच्या आत साखरेची पातळी सामान्य होऊ लागते, यामुळे वजन कमी होते बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवत नाही आणि त्याचा रक्तदाबावर सकारात्मक परिणाम होतो. तुमच्या डायबिटीस रिव्हर्सेलसाठी अंतिम उपाय म्हणजे शाकाहारी आहाराचा अवलंब करणे, वनस्पती-आधारित दूध वापरणे, तसेच मैदा,परिष्कृत तेल, काही धान्य यांचा वापर सहसा टाळने किंवा प्रक्रिया न केलेले पदार्थ घेणे, अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी तुम्ही गुरुत्वाकर्षण विरोधी व्यायाम देखील करू शकता. त्यासोबतच तुम्ही पुढील ३ गोष्टी देखील केल्या पाहिजे. त्या म्हणजे

1. ऍसिड काढून टाकुन शरीर क्षारीय बनवणे – यामुळे आपले शरीर अल्कलाइन होईल ज्यामुळे आपल्या शरीराची सूज कमी होईल 

2. पोषण वाढवणे- नैसर्गिक पूरक आहार, नैसर्गिक अन्न यांचा वापर हे पोषण वाढवण्यासाठी आवश्यक असतो.

3. तणावाच्या पातळीवर काम करणे- तुम्हाला मनाला सुखदायक व्यायाम करावा लागेल ज्यामुळे तुम्हाला कोर्टिसोलची मदत होईल जे रक्तातील साखरेची पातळी पातळी कमी होण्यास मदत करतात आणि या सारख्या अजून इतर काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला मोठ्या प्रमाणात मदत करतील अशाप्रकारे, या सोप्या गोष्टी, तुम्हाला निश्चितच मोठे परिणाम मिळविण्यात मदत करतील. तुमचा डायबिटीस मुक्तीचा प्रवास डीएफएफ सह अधिक यशस्वी होईल.

आपल्या मधुमेह, बी.पी., थायराइड, इत्यादि जीवनशैलीशी निगडित आजारांची मूळ कारणे आणि त्यावरील नैसर्गिक उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये शामिल व्हा. आमच्या वेबसाइट वर जाऊन मोफत आपला नाव रजिस्टर करा|👉🏼 https://drbhagyeshkulkarni.com/dff-free-webinar-hindi/

नियमित अपडेटसाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा!

DFF प्रोग्रॅम बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट https://drbhagyeshculkarni.com ला भेट द्या  

अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबर वर संपर्क करा.  9511218891

Open chat
1
We are available
Hello! How can i help you?