fbpx

या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात अंमलात आणल्या पाहिजेत

या गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात अंमलात आणल्या पाहिजेत |

आपली सवय ही आपले आयुष्य ठरवते. अगदी तसेच आपले आरोग्य कसे आहे किंवा असणार आहे हे आपल्या आहाराच्या सवयींवर अवलंबून असते. सतत जंकफूड, ड्रिंक्स, हॉटेलिंग,पार्टया या कधीतरी होत असतील तर ठीक वाटतात पण त्या आपल्या सवयींचा भाग असतील तर आपण चांगल्या आरोग्याची अपेक्षा करू शकत नाही. काही सात्विक सवयी या आपल्याला जाणीवपूर्वक जीवनात अवलंबवाव्या लागतात. समतोल आहार असणे हे चांगल्या आरोग्याचे सूत्र आहे. थोर तत्ववेत्ते सद्गुरु श्री वामनराव पै सांगतात शरीर साक्षात परमेश्वर आहे आणि माणसाने शरीराची उत्तम व उत्कृष्ट पद्धतीने सेवा केली म्हणजेच त्याला चांगल्या सवयी लावल्या तर शरीररूपी परमेश्वराकडून अनुकूल प्रतिसाद मिळून माणसाचे जीवन सुखी, यशस्वी व समृद्ध होते. याच्या उलट शरीराला वाईट सवयी, द्वेष किंवा गलिच्छ व्यसनांद्वारे त्यांची अवहेलना केली तर तेच शरीर सैतान रूपाने माणसाला सतत सतावत राहते मग वेगवेगळया आजारांद्वारे माणसाला त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. म्हणून समतोल आहार घेणे हा आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असला पाहिजे.

तसेच मी शाकाहारी आहार घेण्याबद्दल आणि प्राणी-आधारित उत्पादने टाळण्याबद्दल अनेकदा बोलतो, त्यामुळे तुम्ही कदाचित असा विचार करत असाल की मी मांसाहाराच्या विरोधात आहे किंवा मी स्वतः शाकाहारी असणार. पण नाही, मला पूर्वी मासे आणि इतर मांसाहार पदार्थ खूप आवडायचे परंतु काही कालवाधीसाठी अध्यात्मिक कारणास्तव, मी ते सर्व सोडण्याचा निर्णय घेतला परंतु त्याचे मला आरोग्याच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम दिसू लागले मग यामुळे काही फायदा होत आहे की नाही हे समजून घेण्यासाठी या गोष्टी आणखी अंमलात आणाव्यात असे मला वाटले आणि त्याचे मला वैद्यकीय दृष्टिकोनातुन आरोग्यासाठी फायदे होताना आणि तसेच अनेक अभ्यासात सुद्धा त्याबद्दल सकारात्मक माहिती मिळाली म्हणून मी तुम्हाला नक्कीच सल्ला देईल की तुम्हीही त्या गोष्टी तुमच्या जीवनात अंमलात आणाव्यात आणि त्याचे फायदे अनुभाववेत.

आयुष्यात कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही तर त्यासाठी तुम्हाला त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावे लागतात त्या दिशेने मार्गक्रमन करणे गरजेचे असते आणि जो पर्यंत ती प्राप्त होत नाही तो पर्यंत सातत्य ठेवावे लागते. या जीवनशैलीच्या आजारापासून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीत बदल करावा लागेल. तुम्ही या गोष्टी करत राहिल्यास डायबिटीस दूर जाईल पण महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला त्या गोष्टींचा जीवनात सराव करणे आणि त्यांची सवय करून घेणे गरजेचे असते. जसे मी अति चरबीच्या बाबतीत मागील एका लेखात सांगितले होते, तसेच आपल्या आहाराशी संबंधित इतर अनेक गोष्टींसाठीही ते खरे आहे. प्राण्यांच्या स्त्रोतांमधले पशुजन्ययुक्त अन्न आपल्या शरीरात पचायला २२-२६ तास लागतात. माझ्यासाठी माझी मानसिकता बदलण्यासाठी हा एक मुख्य योगदान देणारा घटक होता. एवढा वेळ लागतो तर मग आपल्या शरीरावर काम करण्यासाठी इतका भार का टाकायचा? हे मुद्दाम तुमच्या शरीराला ओव्हरटाईम ड्युटी देण्यासारखे आहे. असे तुम्हाला पण नाही वाटत का?

काही गोष्टींमुळे किंवा काही प्रोटोकॉल फॉलो केले तर तुमच्या साखरेची पातळी, रक्तदाब, थायरॉईड इत्यादींमध्ये लक्षणीय घट होईल, पण त्यासाठी किमान दोन आठवडे लागतात. जेव्हा तुम्ही त्या प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष करता आणि तुमच्या रुटीनवर परत जाता, तेव्हा तुमचे स्तर पूर्ववत होण्यासाठी एक आठवडा खूप झाला. म्हणजेच याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्या गोष्टी आयुष्यात कधीच नाही खाल्या पाहिजे आणि तुमच्या जीवनात त्या गोष्टींचा आनंद घेऊ नये. या विकारांपासून १००% बरे झाल्यानंतर तुम्ही ते हळूहळू कमी प्रमाणात त्या गोष्टी खाणे सुरू करू शकता. डीएफएफ मध्ये आम्ही तुम्हाला प्राण्यांवर आधारित उत्पादने किंवा तुमच्या आवडीचे काही गोड पदार्थ देखील पुन्हा तुमच्या जीवनात समाविष्ट करण्याचे उपाय सांगू कारण ज्या लोकांना त्या संबंधित अन्नपदार्थ खायला आवडतात अशा लोकांची मानसिकता मी समजु शकतो.

निसर्गातील मांसाहारी प्राणी देखील दररोज प्राणी खात नाहीत, ते वेळोवेळी त्यांचा आहार बदलतात. तुम्हाला ते अन्न तुमच्या आयुष्यात कसे परत आणायचे आणि केव्हा आणायचे याचे योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे असते, अन्यथा तुमच्या आरोग्य पुनर्प्राप्तीच्या प्रयत्नांवर त्याचा सकारात्मक परिणाम होणार नाही. इथे मी एक उदाहरण देतो म्हणजे मला नक्की काय म्हणायचे आहे ये तुमच्या लक्षात येईल. जर तुमचा घसा खवखवत असेल आणि तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर तुमचा घसा खवखवणे निघून जाण्यासाठी डॉक्टर तुम्हाला काही औषधांसोबत ५ दिवस आइस्क्रीम सारख्या गोठवलेल्या वस्तू खाणे बंद करण्यास सांगतील. पण तुम्हाला आईस्क्रीमची खूप इच्छा आहे, म्हणून तुम्ही नियंत्रण न ठेवता दररोज थोडेसे का होइना आइस्क्रीम खाता. मग तुम्ही पुन्हा डॉक्टरांकडे जाता आणि त्यांना सांगता की तुमचा घसा खवखवणे सुधारले नाही. मग डॉक्टर पटकन समजतील की तुम्ही थंड वस्तू खाल्ल्या आहेत, ते तुमची औषधे थोडी वाढवतील आणि तुमचा घसा बरा होईपर्यंत पुन्हा थंड पदार्थ खाऊ नका असे सांगतील. तुम्ही बरे झाल्यावर, तुम्ही अर्थातच आइस्क्रीम खाण्यास सुरुवात करता, परंतु तुम्ही ते काही काळानंतर, प्रथम अगदी थोड्या प्रमाणात आणि योग्य अंतराने कराल पण ते मर्यादित स्वरूपात का होइना तुम्ही खाऊ शकता अगदी तसेच डायबिटीस आणि त्या संबंधित विकारांमध्येही तुम्ही तुमच्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. परंतु आपण १००% आरोग्य पुनर्प्राप्त करू इच्छित असल्यास आपण ते करू शकत नाही. जर तुम्हाला १००% आरोग्य पुनर्प्राप्त करायचे असेल, तर तुम्हाला १००% या गोष्टी टाळाव्या लागतील म्हणजेच ते पदार्थ खाणे टाळावे लागतील. आणि मग एकदा का तुम्ही बरे झालात की योग्य मार्गदर्शनाने तुम्ही त्या खाऊ शकता.

तसेच आपण यापूर्वी पोषक तत्त्वे वाढविण्याबद्दल बोललो होतो, आपल्याला ते जीवनात देखील लागू करावे लागेल. डायबिटीस वरील पोषक तत्वांची कमतरता ही इन्सुलिनच्या प्रतिकारासोबतची प्रमुख समस्या आहे. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी १२ हे डायबिटीस नसलेल्यांच्या तुलनेत ९५% डायबिटीस रुग्णांमध्ये यांची कमतरता असल्याचे नोंदवलेले पुरावे आहेत. त्यासोबतच झिंक, क्रोमियम, फॉलिक अॅसिड, व्हॅनेडियम ही खनिजे आहेत जी डायबिटीस च्या रुग्णांमध्ये कमी असतात. पहिले महत्त्वाचे कारण म्हणजे अर्थातच डायबिटीस रुग्णांचे शरीर आम्लयुक्त असते. आणि अम्लीय शरीराची समस्या कमी शोषित आहे. पूरक आहार आणि योग्य आहार, जरी योग्यरित्या केले तरीही ते आपल्या शरीराद्वारे शोषले जात नाही. आणि दुसरे म्हणजे, आपण कच्च्या अन्नापेक्षा शिजवलेले अन्न जास्त खात आहोत. अशा प्रकारे, ४६ डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त शिजवलेले कोणतेही पदार्थ हे त्यातील किमान ८०% पोषक गमावतात.

त्यामुळे योग्य ते पोषण मिळत नाही. म्हणून, तुम्हाला काही चांगल्या गोष्टी, सवयी अंमलात आणाव्या लागतील, निरोगी जीवनशैली सोबतच तुमच्या शरीरात काही कमतरता किंवा जसं की व्हिटॅमिन,मिनरल्स चे प्रमाण कमी असल्यास तुम्हाला पूरक आहार घ्यावा लागेल आणि मग तुम्ही तुमच्या डायबिटीस रिवर्सल प्रवासासह इतरही आरोग्याच्या दृष्टिकोणातुन सकारात्मक परिणाम प्राप्त करण्यास सक्षम असाल अशी मला नक्कीच खात्री आहे.

आपल्या मधुमेह, बी.पी., थायराइड, इत्यादि जीवनशैलीशी निगडित आजारांची मूळ कारणे आणि त्यावरील नैसर्गिक उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये शामिल व्हा. आमच्या वेबसाइट वर जाऊन मोफत आपला नाव रजिस्टर करा|👉🏼 https://drbhagyeshkulkarni.com/dff-free-webinar-hindi/

नियमित अपडेटसाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा!

DFF प्रोग्रॅम बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट https://drbhagyeshculkarni.com ला भेट द्या  

अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबर वर संपर्क करा.  9511218891

Open chat
1
We are available
Hello! How can i help you?