fbpx

आपल्याकडून नकळत होणाऱ्या चुका आणि मधुमेह मुक्तीचे रहस्य

आपल्याकडून नकळत होणाऱ्या चुका आणि मधुमेह मुक्तीचे रहस्य 1 |

अनेक लोकांचा असा समज असतो की महागड़ी औषधे घेतली की आपला मधुमेह नियंत्रणात राहणार परंतु वास्तविकता ते सत्य नसते. मग हे लोक अगदी महागड़े उपाय देखील करतात औषधांचा अतिरेक देखील यांच्याकडून केला जातो पण शेवटी निराशा पदरात पडते. अशा भरकटलेल्या रुग्णांची अवस्था काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी असते. माणूस म्हणून आपण काय विचार करतो, आपल्याला असे का वाटते की आपल्याला मोठ्या समस्या येत असतील तर आपल्याला मोठे निराकरण करावे लागेल. पण प्रत्यक्षात मात्र याच्या उलट आहे. आपण फक्त छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष दिले आणि आपल्याकडून नकळत होणाऱ्या चुका जरी टाळाल्या तरी आपण मधुमेह मुक्ति प्राप्त करू शकतो ते कसे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, परंतु तुमच्या प्रश्नाचे निराकरण करण्या अगोदर मला इथे एक उदाहरण देणे जास्त इष्ट वाटते आपण अशा काही छोट्या छोट्या अनेक चुका करतो ज्यामुळे आपला डायबिटीस कधीच आपली साथ सोडत नाही. जर तुम्ही अशी व्यक्ती असाल ज्यांच्या जवळच्या कुटुंबातील सदस्यांना डायबिटीस आहे, तर मला खात्री आहे की तुमच्या कुटुंबातील डायबिटीस असलेली व्यक्ती अशा काही गोष्टी नियमितपणे करत असेल , ज्यामुळे त्यांची साखर वाढते. जर तुमचे डॉक्टर तुम्हाला फास्ट फूड टाळायला सांगत असतील, तर तुम्ही ते खाल का? नाही ना. पण खऱ्या आयुष्यात, आपण तेच फास्टफूड बाहेर जाऊन खातों का? तर होय. त्याचप्रमाणे, आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशा असंख्य चुका करतो ज्या विशेषतः डायबिटीस वाढवतात.

माझ्या सुरुवातीच्या रुग्णांपैकी एक म्हणजे श्रीमती चित्रा. त्यांच्या मधुमेह मुक्तीच्या प्रवासाच्या रूपात हा मुद्दा आपण समजून घेऊया.
श्रीमती चित्रा यांच्याकडे अनेक समस्यांची अक्षरशः संपूर्ण यादी होती, डायबिटीस, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, वजन वाढणे आणि रात्रीची झोप कमी होणे यासह अनेक समस्या होत्या. श्रीमती चित्रा मला भेटल्या तेव्हा त्या आधीच गेल्या २० वर्षांपासून डायबिटीस आणि संबंधित समस्यांनी त्रस्त होत्या. डायबिटीस, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल यासाठी (Heavy) औषधे घेण्याचा त्यांचा दिनक्रम होता त्या दररोज ८० युनिट्स इन्सुलिनवर होत्या. त्या सकाळी ४० युनिट्स आणि संध्याकाळी ४० युनिट्स आणि १२ गोळ्या सर्व उच्च डोसवर होत्या. हे सर्व औषधे असूनही, त्यांची साखरेची पातळी सुमारे ३०० होती आणि त्यांची सरासरी साखर सुमारे १० होती जी आदर्शपणे ६ किंवा ५.५ च्या आसपास असली पाहिजे. त्यांचे शरीर पूर्णपणे सुजले होते त्यामुळे त्या नैराश्याच्या अगदी उंबरठ्यावर होत्या.

जेव्हा त्या मला पहिल्यांदा भेटायला आल्या तेव्हा त्या माझ्या दवाखान्याच्या पायऱ्या चढू शकल्या नाही. त्यावेळी लिफ्टही बंद असल्याने त्यांच्या घरच्यांनी त्यांना माझ्याकडे उचलून आणले होते. जेव्हा आम्ही संवाद साधला तेव्हा त्यांनी मला सांगितले की त्या एक इंग्रजी शिक्षिका आहेत परंतु आता त्यांना या आजारा सोबत जगण्याची कोणतीही आशा नाही. त्यांच्या आहाराबद्दल, मला हे स्पष्ट होते की त्या खरोखर निरोगी आणि चांगले अन्न खात होत्या. त्या सकाळच्या नाश्त्यात दलिया, दुपारच्या जेवणात सॅलडसोबत चपाती आणि आठवड्यातून एकदा अधूनमधून मांसाहारी जेवण घ्यायचे. एक तास चालण्यासोबत इतर व्यायामाचाही समावेश करत असे, पण, औषधांच्या उच्च डोसमुळे, त्यांचे दिवसभराचे संपूर्ण आरोग्यदायी खाणे व्यर्थ जायचे कारण त्यांना रात्रीच्या वेळी प्रचंड खाण्याची इच्छा होत असे. त्यांना रात्री खूप खावेसे वाटायचे, विशेषतः गोड फराळ आणि पदार्थ त्यात त्यांच्या औषधांमुळे आलेली बंधने त्यांच्यासाठी हे सर्वकाही खूप कठीण झालेले होते यामुळे त्या या सर्व गोष्टींना थकल्या होत्या. 

श्रीमती चित्रा आल्या त्यावेळी थकलेल्या आणि झोपेत असल्यासारख्या दिसत होत्या. त्यांच्या मध्ये अजीबात त्राण दिसत नव्हता. घरचे लोक मला सांगत होते की त्या नेहमी चिडचिड करतात. त्यांचे सर्व अहवाल समजून घेतल्यावर आणि विश्लेषण केल्यावर, मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की त्या ‘रोगसूचक व्यवस्थापन’ करत होत्या. जसे आपण आधी बोललो होतो, तसे श्रीमती चित्रा यांच्या बाबतीत होते. वर्षानुवर्षे त्यांना जे काही आजार आणि विकार होत होते ते त्यांच्या औषधांनी त्यांना दाबण्याचा प्रयत्न करत होत्या. त्या का? शोधण्याचा प्रयत्न करत नव्हत्या. त्यांनी कोणताही विचार केला नाही की, हे फक्त त्यांच्यासोबतच का होत होते?

आमचा उपचारांचा पहिला मुख्य मार्ग त्यांच्या भूकेवर नियंत्रण ठेवण्याचा होता. रात्रीच्या वेळी त्यांची खाण्या विषयी अत्यधिक इच्छा मुख्य दोषी होती. त्यासोबतच त्यांना ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’ची समस्या होती. जेंव्हा ग्लुकोज तुमच्या शरीराच्या आवश्यक भागांपर्यंत पोहोचत नाही, त्यावेळी तुमच्या शरीराला आवश्यक ते ग्लुकोज मिळत नाही. आणि यामुळे, योग्य आणि सकस आहार घेतल्यानंतरही परिणाम मिळत नाही.

समुपदेशन आणि प्रोटोकॉल सह आमचे उपचार सुरू झाले. नियंत्रित भूक ठेऊन आम्ही त्यांची सूज कमी करू लागलो. आम्ही त्यांची औषधे देखील कमी केली तसेच त्यांच्या आहारात आवश्यकतेनुसार बदल केले आणि काही आरोग्यदायी पर्याय दिले. आमच्या प्लॅनिंग आणि प्रोटोकॉलसाठी त्यांचे अगदी समर्पण होते. ‘डायबेटिस फ्री फॉरएव्हर’ मध्ये आपण गोल कार्डने सुरुवात करतो. रुग्णाला प्रेरणा देण्यासाठी ते ध्येय कार्ड ६ महिने दररोज त्यांच्यासमोर ठेवण्यास सांगतो. नंतर आम्ही तुम्हाला अध्यात्म आणि तत्वज्ञानाचे समर्थन करतो जेणेकरून डायबिटीस रूग्णांचे मन त्यांच्या शरीरासारखे निरोगी असणे गरजेचे आहे. आम्ही आमच्या रूग्णांच्या आरोग्याचे पालनपोषण करतो कारण आम्ही रूग्णांना सतत आपल्या विवेकबुद्धीने पटवून देतो की त्यांच्या डायबिटीसवर उपचार करणे आणि त्यातून बरे होणे किती महत्त्वाचे आणि फायद्याचे आहे. मी आता तुम्हाला जे काही सांगणार आहे त्या गोष्टींवर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. ते म्हणजेच ‘डायबिटीस फ्री फॉरएव्हर’ सोबत प्रवास सुरू झाल्यानंतर अवघ्या ३० दिवसांत त्यांची सर्व खाणे आणि त्याविषयी असणारी अति लालसा निघून गेली. फक्त ९० दिवसांत आम्ही त्यांची सूज पूर्णपणे कमी करू शकलो. आणि ३ महिन्यांनी त्यांचे इन्सुलिन बंद झाले. ६ महिन्यांनंतर, १२ गोळ्यांपैकी आता फक्त दिवसातून २ गोळ्या त्या घेतात. आता श्रीमती चित्रा या खूप आनंदी स्थितीत आहे कारण त्यांचे सर्व पॅरामीटर्स सामान्य आहेत. त्यांना इन्सुलन्सची गरज नाही आणि दिवसातून अर्ध्या टॅब्लेटमध्ये, आता त्यांची साखर सामान्य आहे. त्यांचा २० वर्षांचा डायबिटीस चा त्रास हा फक्त ६ – ८ महिन्यांत ‘डायबिटीस फ्री फॉरएव्हर’ मध्ये झाला.

तात्पर्य काय?
सर्व डायबिटीस रुग्णांची कथा श्रीमती चित्रा यांच्या सारखीच असते. आम्ही येथे जो फरक केला, तो फक्त त्या समस्येच्या मूळ कारणावर उपचार करत होता. मूळ कारणांकडे दुर्लक्ष्य ज्यामुळे त्या दुर्दैवाने अनेक जेनेरिक उपचार पूर्ण करण्यात अयशस्वी ठरल्या. माणूस म्हणून आपण काय विचार करतो, आपल्याला असे का वाटते की आपल्याला मोठ्या समस्या येत असतील तर आपल्याला मोठे निराकरण करावे लागेल. अनेक लोकांना असे वाटते की जर त्यांना २-३ मोठ्या प्रमाणात विकार होत असतील तर त्यांना त्यासाठी १०-१२ औषधे घेणे बंधनकारक आहे. पण प्रत्यक्षात मात्र याच्या उलट आहे. तुम्हाला फक्त छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष द्यावे लागते, उदाहरणार्थ तुमच्या दैनंदिन जीवनात तसेच स्वयंपाकघरात तुम्ही जे काही शिजवता त्यात आपण छोटे छोटे बदल करतो त्याचप्रमाणेच असे अजून काही मार्ग आहेत ज्याद्वारे सर्वात मोठ्या समस्या देखील दूर होतील.
मुख्य गोष्ट म्हणजे श्रीमती चित्रा या बऱ्या झाल्या. आमच्या प्लॅनिंग आणि प्रोटोकॉलसाठी त्यांचे अगदी समर्पण होते आणि त्यांना विश्वास होता की त्या त्यांच्या समस्या आणि औषधांपासून मुक्त होण्यास पात्र आहे आणि हेच एकमेव कारण आहे ज्याद्वारे त्या हे करू शकल्या. योग्य मानसिकता असणे, तपशीलवार आणि संरचित योजना असणे हे डायबिटीस बरा होण्यासाठी खूप महत्वाचे असते. तसेच, तुमच्या कुटुंबाची मदत आणि त्यांचा सकारात्मक पाठिंबा खूप महत्वाचा असतो, परंतु तुमच्या आरोग्याच्या पुनर्प्राप्ती प्रवासाचा मुख्य चालक नेहमी तुम्हीच असता.

आपल्या मधुमेह, बी.पी., थायराइड, इत्यादि जीवनशैलीशी निगडित आजारांची मूळ कारणे आणि त्यावरील नैसर्गिक उपचार याविषयी सखोल मार्गदर्शन घेण्यासाठी आजच आमच्या ऑनलाईन वर्कशॉप मध्ये शामिल व्हा. आमच्या वेबसाइट वर जाऊन मोफत आपला नाव रजिस्टर करा|👉🏼 https://drbhagyeshkulkarni.com/dff-free-webinar-hindi/

नियमित अपडेटसाठी आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम वर फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चैनलला सब्सक्राइब करा!

DFF प्रोग्रॅम बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाइट https://drbhagyeshculkarni.com ला भेट द्या  

अधिक माहितीसाठी कृपया पुढील नंबर वर संपर्क करा.  9511218891

Open chat
1
We are available
Hello! How can i help you?