September 2024

Uncategorized

१०० वर्षे निरोगी आयुष्य जगण्याचे सूत्र

माझ्या प्रॅक्टिस मध्ये अनेक डायबिटीस रुग्णांवर उपचार करत असताना माझा जो या रुग्णांच्या बाबतीत अनुभव होता तो म्हणजे ते निराश नसतात पण ते उदासीन असतात. “हे सर्व माझ्या बाबतीतच का घडले किंवा मीच का? अशा तक्रारी स्वतःबद्दल ते करत असतात. जेव्हा मी डायबिटीस च्या रुग्णांवर उपचार करायला सुरुवात केली, तेव्हा सुरुवातीला उपचार फारसे यशस्वी होत नव्हते आणि जे परिणाम हवे होते ते येत नव्हते किंवा आले तर फार उशिरा येत होते. मी याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला; हे का होत आहे? म्हणून मी या माझ्या रूग्णांवर संशोधन आणि सर्वेक्षण सुरू केले, तेव्हा माझ्या लक्ष्यात आले की ते गोंधळलेले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्याकडे प्रेरणेचा अभाव आहे. स्वतः मधे काही सकारात्मक बदल होत आहे की नाही याबद्दल शंका आणि गोंधळामुळे ते औषधोपचार आणि सल्ले नीट पाळू शकत नाहीत आणि महत्वाचा मुद्दा असा की त्यांची या प्रक्रियेवर विश्वासाच्या बाबतीत कमतरता दिसून आली.

Uncategorized

डायबिटीस – एक निरोगी होण्याची संधी

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली ही चिडचिड, तोच प्रश्न आपण पुन्हा पुन्हा स्वतःला विचारतो. स्वतःला दोष देण्याऐवजी आणि हे प्रश्न विचारण्याऐवजी आपण स्वतः ला विचारले पाहिजे की यश म्हणजे काय आणि खरे यशस्वी लोक कोण आहेत? माझ्या मते खरे यशस्वी लोक ते आहेत जे समोर येणारे प्रश्न किंवा समस्या सोडवण्याकडे त्यांचा कल असतो स्वतःला दोष देऊन आत्मक्लेश करून घेऊन वेळ वाया घालवण्यात या लोकांना रस नसतो.

Uncategorized

वैयक्तिक थेरपी विरुद्ध गट थेरपी

माझ्या प्रॅक्टिस मध्ये अनेक डायबिटीस रुग्णांवर उपचार करत असताना माझा जो या रुग्णांच्या बाबतीत अनुभव होता तो म्हणजे ते निराश नसतात पण ते उदासीन असतात. “हे सर्व माझ्या बाबतीतच का घडले किंवा मीच का? अशा तक्रारी स्वतःबद्दल ते करत असतात. जेव्हा मी डायबिटीस च्या रुग्णांवर उपचार करायला सुरुवात केली, तेव्हा सुरुवातीला उपचार फारसे यशस्वी होत नव्हते आणि जे परिणाम हवे होते ते येत नव्हते किंवा आले तर फार उशिरा येत होते. मी याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला; हे का होत आहे? म्हणून मी या माझ्या रूग्णांवर संशोधन आणि सर्वेक्षण सुरू केले, तेव्हा माझ्या लक्ष्यात आले की ते गोंधळलेले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्याकडे प्रेरणेचा अभाव आहे. स्वतः मधे काही सकारात्मक बदल होत आहे की नाही याबद्दल शंका आणि गोंधळामुळे ते औषधोपचार आणि सल्ले नीट पाळू शकत नाहीत आणि महत्वाचा मुद्दा असा की त्यांची या प्रक्रियेवर विश्वासाच्या बाबतीत कमतरता दिसून आली.

Uncategorized

आरंभ नव्या दृष्टिकोणाचा

डायबिटीस नियंत्रणाचा संपूर्ण आधार योग्य आणि सकारात्मक अशी मानसिकता आहे. बरेच लोक, किंवा बरेच डॉक्टर, त्यांच्या रूग्णांच्या कल्याणासाठी किंवा त्यांच्या आरोग्यात योगदान देण्यासाठी त्यांच्या पद्धतींद्वारे काही मार्ग निवडण्यासाठी मदत करतात ज्यामुळे त्यांना केवळ पैसेच मिळत नाहीत तर अनेक रुग्णाकडून आशीर्वाद देखील मिळतात. डॉक्टर म्हणून, तुमचे ध्येय तुमच्या पेशंटला पुढील १५ ते २० दिवसांत फॉलो-अपसाठी येण्यास सांगणे नसून; तुमचे ध्येय रुग्णांवर उपचार करणे, त्यांच्या आयुष्यातील वेदना कमी करणे असले पाहिजे. तसेच लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणि आरोग्यरूपी मदत करत असताना रुग्णांना त्या आजाराबाबत ची भीती दूर करणे आणि शिक्षण देणे जेणेकरून त्यांना पुन्हा कधीही डॉक्टरांकडे जावे लागणार नाही असे असले पाहिजे.

Scroll to Top