चरबी आणि मधुमेह : आहाराचे सजग समीकरण
आपल्या आहारातून मिळणाऱ्या पोषणतत्त्वांचे शरीरात रूपांतर विविध स्वरूपात होते. कार्बोहायड्रेट्सपासून शरीराला तात्काळ ऊर्जा देणारा ग्लुकोज, प्रथिनांपासून शरीरबांधणीसाठी आवश्यक असलेले ॲमिनो ॲसिड्स, आणि चरबीयुक्त अन्नामधून फॅटी ॲसिड्स तयार होतात.









