Kalonji Seeds Benefits in Marathi- कलौंजी ( काळे तिळ )
कलौंजी अर्थातच काळे तिळ
मसाल्याच्या जातकुळीत हा पदार्थ मोडतो. पण हा आरोग्यासाठी योग्य आणि असंख्य औषधी गुणांनी अक्षरश: भरलेला आहे. पूर्वापार तिळाचं महत्त्व आपल्याला सांगितलं जातं. ते योग्यच आहे. मात्र आधुनिक आहारातदेखील शास्त्रीय दृष्टिकोनातून तिळाचं महत्व काय…. तर ऐका… यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजांसह 100 पेक्षा जास्त संयुगे आहेत, ज्यात सुमारे 21% प्रथिने, 38% कार्बोहायड्रेट आणि 35% वनस्पती तेल आहे. आपलं शरीर हे काही कायम तरुण राहणारं नक्कीच नसतं. कायम बारीकही राहणारं नसतं वयानुरुप, वजानुरुप त्यात कमालीचा फरक पडत असतो, त्याचबरोबर त्याच्या व्याधीही वाढत असतात. मग अॅलो, होमियो, आयुर्वेद…. यांनी दाखवलेल्या पथावर चालावं लागतं, काही वेळा आरामही वाटतो, तर काही वेळा त्याचे साईड इफेंक्टही होतात. अशावेळी नैसर्गिक उपचारच कामी येतात. त्यापैक़ीच काळे तीळ…… त्याच्या औषधी गुणांविषयी थोडेसे….

मधुमेहींसाठी फायदेशीर……
आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियमित करण्यासाठी हे प्रभावी आहे. एक कप ब्लॅक टीमध्ये अर्धा चमचे काळ्या तिळाचे तेल मिसळा आणि सकाळी आणि झोपायच्या आधी प्या. साखर पातळी तपासा – साखरेची पातळी सामान्य असल्यास डोस बंद करा.
हृदयाच्या तक्रारीसाठी:
हे आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करुन हृदयाच्या आरोग्यास चालना देते. दररोज सकाळी गरम पेयात अर्धा चमचे काळ्या तिळाचे तेल मिसळावे, यामुळे चरबी तर कमी होईलच शिवाय रक्तवाहिन्या रुंद होण्यास मदत होईल.
उच्च रक्तदाब साठी:
काळ्या तिळाच्या सहाय्याने उच्चरक्तदाबाची लक्षणे नैसर्गिकरित्या नियंत्रित केली जाऊ शकतात. अर्धा चमचा तिळाचे तेल कधीही गरम पेया सह घ्या. आपल्या संपूर्ण शरीरावर तिळाचे तेल लावा. एक महिनाभर हा उपचार चालू ठेवा.
वजन कमी करण्यासाठी:
काळे तीळे गरम पाण्याबरोबर सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. हे अतिरिक्त चरबी कमी करण्यात मदत करते आणि आपल्याला स्लिम आणि ट्रिम करते.
इतर आरोग्यदायी फायदे:
- हे मूत्र विसर्जन, पोटशूळ वेदना, जंत काढून टाकण्यास, मासिक पाळीला उत्तेजन देण्यास देखील मदत करते.
- काळे तीळ आपली बौद्धीक पातळी वाढवते. आपली स्मरणशक्ती तेज होते.
- आपण आपल्या कॉफी किंवा चहामध्ये या तेलाचे काही थेंब जोडल्यास हे मज्जासंस्था, कोरडा खोकला, दमा आणि श्वासनलिकांसंबंधी श्वसन तक्रारी कमी करण्यास मदत करते.
- दंत रोगांवर उपचार करण्यासाठी काळे तीळ हा एक उत्कृष्ट नैसर्गिक उपाय आहे. हे आपल्याला दातदुखी थांबविण्यात देखील मदत करते.
- काळ्या तिळाबरोबर काळ्या चहाच्या सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या लवकर बरी होते.
- एक चमचा तिळाचे तेल आणि लिंबाचा रस असलेल्या कोमट पाण्यात पाय भिजवून ठेवल्यास त्यामुळे दुखर्या टाचांना खूप आराम मिळतो.
- काळ्या तिळाचा वापर टी-सेल गुणोत्तरात लक्षणीय सुधारणा करते आणि नैसर्गिक किलर सेल क्रिया वाढवितो. काळे तीळ कर्करोग आणि एड्सच्या उपचारातही मदत करते.
- काळे तीळ हे एक नैसर्गिक पेनकिलर आहे, ज्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी याचा चांगला वापर केला जातो. तसेच या तेलाचा उपयोग सांध्यातील वेदना दूर करण्यासाठीही केला जातो.
- काळ्या तिळामुळे त्वचा चमकदार तर होतेच शिवाय त्वचा स्वच्छ करण्यास याचा चांगला उपाय होतो. तसेच मुरुम, चट्टे, डाग ही कमी होतात. हेे तेल आपल्या फेसपॅकमध्ये घालून तो लेप चेहर्यावर लावावा.
थोडसं तिळाबद्दल……
आपल्याकडे थंडीच्या दिवसांत तिळाचं महत्त्व सांगितलं आहे. संक्रांतीच्या निमित्तानं तीळगूळ आणि त्याचे पदार्थ आपण पारंपरिक पद्धतीनं खातोच. तीळ आणि गूळ हे पदार्थ उष्ण मानले जातात आणि या दिवसांत शरीराला उष्णता मिळण्यासाठीच ते पूर्वापार आपल्या आहारात घ्यायला सांगितले असावेत. आयुर्वेदासारख्या पुरातन शास्त्रातही तिळाचं महत्त्व सांगितलेलं आहे.
तिळात कॅल्शियम आहे, ते आपल्या सर्वांना माहीतच आहे. याशिवाय मँगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ब गटातील जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थही आहेत. तीळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगलं तर आहेच, तसेच तिळात झिंक जास्त असते, जे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करते. थोडक्यातच स्त्रियांना याचा खूप फायदा होऊ शकतो. ज्यांना कॅल्शियमची कमतरता आहे किंवा मेनोपॉजमुळे हाडांचा ठिसूळपणा वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, त्यांच्यासाठी तीळ फार उपयोगी ठरतात.
तिळामुळे वेट लॉस…….?
तिळात तंतुमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात. तंतुमय पदार्थामुळे भूक कमी लागते, कारण त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं. वेट लॉसच्या डाएटमध्ये तुम्ही तिळाचा समावेश करू शकता. एक चमचा तिळात साधारण 50 उष्मांक मिळतात, त्यामुळे ते प्रमाणातच घ्या. वजन कमी करताना आपल्याला अनेक क्षार किंवा जीवनसत्वे कमी पडू न देणंही तितकंच महत्वाचं आहे, त्यामुळे थोडे तीळ रोजच्या आहारात घेतल्यास त्यामुळे फायदाच होईल.
वर्षभर घेतल्यानंही फायदा
तिळात जरी तेल आणि उष्मांक जास्त असले, तरीही काही प्रमाणात आपण वर्षभर ते घेत राहिलो, तर त्याचा फायदाच होईल. साधारण 1 ते 2 चमचे तीळ रोज घ्यायला हरकत नाही. आपल्याला आवश्यक ते जीवन सत्व आणि क्षार मिळावे म्हणून आपण कृत्रिम गोळ्या आणि व्हिटामिन्स घेतो. त्यापेक्षा निसर्गानं दिलेल्या पदार्थांचा आपण आहारात समावेश केला तर?
थोडेसे इकडेही लक्ष द्या……
- मुळव्याध होऊन सारखे रक्त पडत असेल तर काळे तीळ कुटून त्याची चटणी लोण्यासोबत खावी. मूळव्याधीचे मोड फार दुखत असेल, तर त्या ठिकाणी तीळ वाटून तयार केलेली चटणी थोडी गरम करून लेप लावण्याचा उपयोग होतो.
- जखम होऊन ती भरून येत नसेल तर तिळाची लगदी तिथे लावून ठेवावी. जखम फार चांगल्या पद्धतीने भरून येते.
- दातांच्या हिरड्याचे आयुष्य वाढून ते दात मजबूत व्हावेत यासाठी काळे तीळ चावून खावेत. दात हलत असल्यास किंवा हिरड्यातून रक्त वा पू येण्याची प्रवृत्ती असल्यास तीळ चावून खाण्याचा उपयोग होतो. एक-दोन चमचे तीळ चावून नंतर ते थुंकून दिले तरी चालतात. काळे तीळ नियमित चावून खाणार्या लोकांना दातांचे विकार शक्यतो होत नाहीत.
- तिळाच्या झाडाची पाने आणि मुळे यांचा काढा करून त्याने केस धुतल्यास काळेभोर आणि मुलायम होतात.
- जिम किंवा व्यायामशाळेत नियमित जाणार्या मुलांनी तिळाचे नियमित सेवन करावे याने शरीरातील मांसधातू उत्तम पद्धतीने वाढतो.
- लघवीतून पु जात असेल तर तिळाचे सेवन उपयुक्त आहे. तीळ शरीरातील सर्व धातूंना बलदायी असल्याने अशा त्रासदायक विकारात तीळ अमृतासारखा आहे.