सहानुभूती आणि उपचार: एक प्रभावी उपचार दृष्टिकोन
“मी अँलोपॅथीक ग्रॅज्युएशन केले आहे, परंतु माझ्या कडे एक टीम आहे जी विविध प्रकारच्या चिकित्सा पद्धतींमध्ये प्रवीण आहे – अँलोपॅथी , निसर्गोपचार, आयुर्वेद, होमिओपॅथी इत्यादी. यातील प्रत्येक पद्धतींच्या विशिष्ट मर्यादा आणि फायदे आहेत, आणि प्रत्येक पद्धत जुनाट आजारांवर उपचार करण्याच्या वेगळ्या दृष्टिकोनावर आधारित आहे. माझ्याकडे येणारे रुग्ण नेहमी विचारतात की मी त्यांना कोणत्या उपचार पद्धतीचा वापर करून उपचार करणार आहे? आणि त्यांना माझं उत्तर नेहमीच असं असतं की सर्व पद्धती एकत्र केल्यास जुनाट विकारांवर अधिक परिणामकारक उपचार करता येऊ शकतात. मी त्यांना सांगतो की प्रत्येकजण वेगळा असतो आणि उपचार स्वीकारण्याची आणि प्रतिक्रिया देण्याची त्यांची पद्धतही वेगळी असते काही रुग्ण माइयावर विश्वास ठेवतात, तुम्ही ठीक होणार आहात असे सांगतो. त्यामुळे ते स्वत:कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतात आजारीपणा ते निरोगीपणा पर्यंत स्वतः ला पूर्णपणे बदलतात आणि सकारात्मक दृष्टीकोन घेतात, ज्यामुळे त्यांचे मानसिकतेत सुधारणा होते आणि ते शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी होतात.
सहानुभूती आणि उपचार: एक प्रभावी उपचार दृष्टिकोन Read More »