मानसिक डिटॉक्स : एक सकारात्मक पुनरुज्जीवन
प्रत्येक दिवस एक नवा आरंभ असतो. आपल्या जीवनात भूतकाळात कधी नकारात्मक किंवा वाईट घटना घडल्या असतील, तर त्या मागे सोडून नवीन सुरूवात करता आली पाहिजे. ज्या पद्धतीने आपण दररोज घराची स्वच्छता करतो, त्याच पद्धतीने आपले मनही स्वच्छ करणे आवश्यक आहे. भूतकाळातील घटनांना मागे सोडून, त्या घटनांवरून शिकून नवे ध्येय ठरवून पुढे जाता आले पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनात सकाळी घर स्वच्छ करणे हे अत्यंत महत्वाचे असते, तसंच आपल्या मनाची स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे. प्रत्येक दिवस एक नवीन संधी आहे, एक नवीन सुरुवात आहे. त्यामुळे, नवीन दिवस सुरू करताना मी स्वतःला सांगतो, “मला भूतकाळ मागे सोडावा लागेल.” आणि नव्याने सुरुवात करायची आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवल्याने आपल्याला ताजेतवाने वाटते. स्वच्छतेवर विश्वास ठेवून जेंव्हा मन ही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा आपण अंतःकरणाने स्वच्छ बनतो. असा हा डिटॉक्स केवळ भौतिक शरीरासाठीच नाही तर नवीन जीवन जगण्यासाठी देखील आवश्यक आहे.
मानसिक डिटॉक्स : एक सकारात्मक पुनरुज्जीवन Read More »