मधुमेहा संबंधित समज गैरसमज
दिवसेंदिवस मधुमेहाचे प्रमाण हे वाढत आहे. भारतातील सुमारे 77 दशलक्ष लोकांना मधुमेह आहे म्हणजेच हा आजार हा खूप सामान्य झाला आहे तरीही अनेकांना या बद्दल गांभीर्य दिसत नाही. बर्याच मधुमेहींना देखील याबद्दल जागरूकता दिसत नाही. रुग्ण जेव्हा कोणताही उपचार घेतात तेव्हा त्यांच्या मनात आधीपासून असलेले गैरसमज आणि चुकीच्या कल्पना काढून टाकणे हे खरं तर आव्हान असते परंतु जर नवा मार्ग शोधायचा असेल सकारात्मक उपचार करायचे असतील तर मार्गातील अडथळे हे मागे सोडावे लागतात.









