उत्तम आरोग्यासाठी मार्गदर्शकाची आवश्यकता
प्रत्येकाला आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या वळणावर मार्गदर्शकाची गरज असते. जर जीवन जगणे ही एक कला आहे, शास्त्र आहे तर तेथे मग गुरु हा असलाच पाहिजे. संत ज्ञानेश्वर माउलींनी देखील गुरुचे महात्म्य त्यांच्या एक अभंगाद्वारे सांगितलेले आहे. ‘गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन। दर्शनी समाधान, आथी जैसे।‘ असे हे गुरु, मार्गदर्शक असतील तर आपला जीवनाचा प्रवास सोपा होतो आणि लवकर इच्छित ध्येय साध्य होते.









