१०० वर्षे निरोगी आयुष्य जगण्याचे सूत्र
माझ्या प्रॅक्टिस मध्ये अनेक डायबिटीस रुग्णांवर उपचार करत असताना माझा जो या रुग्णांच्या बाबतीत अनुभव होता तो म्हणजे ते निराश नसतात पण ते उदासीन असतात. “हे सर्व माझ्या बाबतीतच का घडले किंवा मीच का? अशा तक्रारी स्वतःबद्दल ते करत असतात. जेव्हा मी डायबिटीस च्या रुग्णांवर उपचार करायला सुरुवात केली, तेव्हा सुरुवातीला उपचार फारसे यशस्वी होत नव्हते आणि जे परिणाम हवे होते ते येत नव्हते किंवा आले तर फार उशिरा येत होते. मी याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला; हे का होत आहे? म्हणून मी या माझ्या रूग्णांवर संशोधन आणि सर्वेक्षण सुरू केले, तेव्हा माझ्या लक्ष्यात आले की ते गोंधळलेले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्याकडे प्रेरणेचा अभाव आहे. स्वतः मधे काही सकारात्मक बदल होत आहे की नाही याबद्दल शंका आणि गोंधळामुळे ते औषधोपचार आणि सल्ले नीट पाळू शकत नाहीत आणि महत्वाचा मुद्दा असा की त्यांची या प्रक्रियेवर विश्वासाच्या बाबतीत कमतरता दिसून आली.